14 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
14 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (14 जुलै 2020)
भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे:
- भारतात बायोकॉन करोनावर एक नवीन औषध आणत आहे.
- बायोटेक्नोलॉजी क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या बायोकॉनने इटोलीझुमॅब हे इंजेक्शन बाजारात आणणार असल्याचे जाहीर केले आहे.
- COVID-19 ची सामान्य ते गंभीर लक्षण असणाऱ्या रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात येईल. या एका इंजेक्शनची किंमत आठ हजार रुपये आहे.
- बायोकॉनला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून इटोलीझुमॅब इंजेक्शनसाठी मंजुरी मिळाली आहे.
Must Read (नक्की वाचा):
“गुगल भारतात करणार 75 हजार कोटीची गुंतवणूक:
- गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी गुगल भारतामध्ये डिजीटलायझेशनसाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली आहे.
- पुढील पाच ते सात वर्षांमध्ये ही गुंतवणूक केली जाणार असल्याचे पिचई यांनी स्पष्ट केलं आहे.
- गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत 10 बिलीयन डॉलरच्या (75 हजार कोटी रुपये) गुंतवणूकीची घोषणा केली.
‘बीएमडब्ल्यू’ गाडी विकण्याचा निर्णय घेतला- भारताची धावपटू द्युती चंदने:
- भारताची अव्वल महिला धावपटू द्युती चंदने तिची आलिशान ‘बीएमडब्ल्यू’ गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
- टोक्यो ऑलिम्पिकची तयारी करण्यासाठी पैसेच शिल्लक राहिले नसल्याने गाडी विकण्याचा निर्णय नाइलाजास्तव घ्यावा लागत असल्याचे 24 वर्षीय द्युतीने म्हटले आहे.
- आलिशान बीएमडब्ल्यू ही 30 लाखांची गाडी विकण्याचा निर्णय घेतला आहे.
- देशासाठी भविष्यात आणखी पदके जिंकून जेव्हा मी चांगली कमाई करेन त्यानंतर पुन्हा आलिशान गाडी विकत घेईन.
दिनविशेष :
- थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी झाला.
- महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म 14 जुलै 1884 मध्ये झाला.
- सन 2003 या वर्षी जागतिक बुद्धिबळ महासंघ व्दारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
- डाकतार विभागाची 163 वर्षांपासूनची तार सेवा 14 जुलै 2013 मध्ये बंद झाली.