13 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

13 October 2019 Current Affairs In Marathi

13 October 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 ऑक्टोबर 2019)

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी अव्वल :

  • देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी अव्वल तर अदानींची दुसऱ्या क्रमांकावर झेप अंबानी आणि अदानीअदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे.
  • तर फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार 62 वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही 51.4 बिलियन डॉलर (अंदाजे 3 लाख 70 हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती 15.7 बिलियन डॉलर (अंदाजे 1
    लाख 15 हजार कोटी) इतकी आहे.
  • तसेच भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे नाव असणारे शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.
  • तर देशातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सहा जणांचा पहिल्यांदाच समावेश झाला आहे. यामध्ये बायजू या अॅपचे संस्थापक बायजू रविंद्रन, हल्दीरामचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, टाइल्स व अन्य उत्पादने करणारी जॅग्वार या कंपनीचे मालक राजेश मेहरा यांचा पहिल्यांदाच अव्वल 100 श्रीमंतांमध्ये समावेश झाला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑक्टोबर 2019)

ATMमधून पैसे काढणं अन् ऑनलाइन व्यवहाराबाबत मोठी बातमी:

  • भारतीय रिझर्व्ह बँकेनं ऑनलाइन आणि एटीएमच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे.
  • तर डेबिट कार्डसह इतर व्यवहार करत असताना ट्रान्झॅक्शनमध्ये येत असलेल्या अपयशावर बँकांना काही दिवसांतच निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. तशा प्रकारचे आदेशच आरबीआयनं दिले आहेत. म्हणजेच समजा आपण
    ऑनलाइन व्यवहार करत असताना खात्यातून पैसे कापले जातात, परंतु ते ग्राहकाला लागलीच परत मिळत नाहीत.
  • तसेच एटीएममध्ये डेबिट कार्ड स्वाइप केल्यानंतर बऱ्याचदा अशा घटना घडतात. त्यामुळे ग्राहकांचं टेन्शन भरपूर वाढतं. त्यामुळे आरबीआयनं बँकांना निर्देश देत यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं सुचवलं आहे. यावर तोडगा
    निघाल्यास ग्राहकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
  • एटीएममधून पैसे काढत असताना व्यवहार अयशस्वी झाल्यास पैसे कापले जातात, तसेच ते परत लगेचच ग्राहकाला मिळत नाहीत. मग तो व्यवहार निष्क्रिय समजला जातो. आरबीआयनं ई-कॉमर्स पेमेंट आणि कार्यवाही पूर्ण (टर्न अराउंड टाइम, TOT) करण्यासाठी नियमावली दिली आहे.
  • बँकांना ‘फेल्ड डेबिट कार्ड ट्राझॅक्शन्स’च्या प्रकरणांचा पाच दिवसांच्या आत निपटारा करावा लागणार आहे. तशा प्रकारचे आदेश केंद्रीय बँकेनंच दिले आहेत. त्यामुळे एटीएम, स्वाइप मशीन आणि आधार अनेबल्ड पेमेंट्स (AEPS)
    व्यवहाराचा मुद्दा पाच दिवसांच्या आत किंवा आयएमपीएसशी संबंधित अयशस्वी व्यवहाराचा मुद्दा एका दिवसाच्या आत बँकांना सोडवायचा आहे.

रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक :

  • मराठी रंगभूमीवरील सर्वात मानाचे समजले जाणारे विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जाहीर झाले आहे.
  • अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीने या पुरस्काराची घोषणा केली. रंगभूमिदिनी म्हणजेच 5 नोव्हेंबरला हट्टंगडी यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने दरवर्षी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारास विष्णुदास भावे गौरव पदकाने गौरविण्यात येते. प्रतिवर्षी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षांच्या हस्ते हे पदक
    प्रदान केले जाते. यंदा पाच नोव्हेंबरला नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्याहस्ते हट्टंगडी यांचा सन्मान होणार आहे.
  • तर दूरचित्रवाणी वाहिन्यांवरही त्यांनी काम केले असून चार दिवस सासूचे, वहिनीसाहेब, सख्या रे, होणार सून मी या घरची यासह अन्य मालिकांतील त्यांची भूमिका लक्षवेधी ठरली होती. अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या हट्टंगडी
    यांच्या रंगभूमीवरील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड :

  • भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेची प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. काही दिवासांमध्ये ते आपले पद सांभाळणार असून संघातील खेळाडूंना ते आता मार्गदर्शन करणार आहे.
  • रवी शास्त्री यांच्या पूर्वी कुंबळेने भारताचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. संघातील वादामुळे कुंबळेने प्रशिक्षकपद सोडले होते. पण आता कुंबळेला प्रशिक्षकपद देण्यात आले आहे.
  • आयपीएलमधील किंग्स इलेव्हन पंजाब या संघाने कुंबळेला मुख्य प्रशिक्षकपद लिलावापूर्वीच दिले आहे. आयपीएलच्या आगामी पर्वाचा लिलाव डिसेंबरमध्ये होणार आहे. या लिलावाच्यावेळी कुंबळे पंजाबच्या संघाच्या निवडीमध्ये पाहायला
    मिळेल.
  • आयपीएलमध्ये 2013 साली मुंबई इंडियन्सचे मार्गदर्शकपद कुंबळेने भुषवले होते. त्यावर्षी मुंबईच्या संघाने जेतेपद पटकावले होते. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्य संघाचे प्रशिक्षकपदही कुंबळेने भुषवले होते.

दिनविशेष:

  • 13 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन आहे.
  • स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1877 मध्ये झाला.
  • सन 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
  • सन 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑक्टोबर 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.