13 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ:
निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ:

13 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 जुलै 2020)

करोना लस संशोधनात रशियाने मारली बाजी:

  • या व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
  • पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे.
  • सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
  • चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल.
  • एएनआयने हे वृत्त दिले आहे. रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने 18 जून रोजीच सुरु केल्या होत्या.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2020)

फॉक्सकॉनची भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची योजना:

  • आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अ‍ॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट करत आहे.
  • अ‍ॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे.
  • चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे.
  • भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अ‍ॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.

निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ:

  • निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येतअसून तो रात्रीच्या वेळी विलोभनीय दर्शन देत आहे.
  • त्याची शेपटी पिसाऱ्यासारखी आहे.जुलैत महिनाभर तो भारतातून सूर्यास्तानंतर दिसणार आहे.
  • धूमेकतूला दोन शेपटय़ा आहेत. उत्तर अर्धगोलार्धात हा धूमकेतू दिसत असून तो गेल्या आठवडय़ात बुध ग्रहाच्या कक्षेत होता.
  • धूमकेतूची जाडी 5 किलोमीटर आहे. त्याचे केंद्रक काजळीसदृश पदार्थाचे असून हा धूमकेतू सौरमालेच्या 4.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या जन्माशी नाते सांगणारा आहे.

मुंबई हॉकीचे मोठे नुकसान होणार- एक राज्य, एक मत:

  • एक राज्य, एक मत’ या नव्या संकल्पनेमुळे मुंबई हॉकीचे मोठे नुकसान होणार आहे.
  • मुंबई या देशातील सर्वात जुन्या हॉकी संघटनेला आता संलग्न सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धामध्ये मुंबईचा संघ पाठवता येणार नाही.
  • ‘‘गेल्या 10 वर्षांत मुंबईतील हॉकीला घरघर लागली असून राष्ट्रीय शिबिरातील मुंबईकर हॉकीपटूंची संख्या रोडावत चालली आहे.
  • क्रीडा मंत्रालयाच्या नव्या नियमांविषयी आणि मुंबईतील हॉकीच्या सद्य:स्थितीविषयी 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते हॉकीपटू सोमया यांच्याशी केलेली ही बातचीत.

दिनविशेष :

  • 13 जुलै 1660 मध्ये पावनखिंड लढवून ‘बाजीप्रभू देशपांडे‘ यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
  • सन 1908 या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी मिळाली.
  • जतिंद्रनाथ दास यांनी सन 1929 मध्ये लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.