13 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

‘ईओएस-03
‘ईओएस-03

13 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (13 ऑगस्ट 2021)

‘ईओएस-03’उपग्रह अंतराळात पाठवण्यात अपयश :

  • प्रक्षेपण यानाचे क्रायोजेनिक टप्प्यावर प्रज्ज्वलन करण्यात अपयश आल्यामुळे देशाचा सर्वात अलीकडचा ‘ईओएस-03’हा भूनिरीक्षण उपग्रह अंतराळात पाठवण्यास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) जीएसएलव्ही प्रक्षेपक गुरुवारी अयशस्वी ठरला.
  • तथापि, प्रक्षेपण यानाचा पहिला व दुसरा टप्पा सामान्य रीतीने पार पडला, असे इस्रोने सांगितले.
  • तर नियोजित वेळापत्रकानुसार जीएसएलव्ही-एफ 10 चे प्रक्षेपण आज पहाटे 5 वाजून 43 मिनिटांनी पार पडले.
  • पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील कामगिरी नियोजनानुसार झाली. मात्र क्रायोजेनिक ऊर्ध्व टप्प्यातील प्रज्वलन तांत्रिक बिघाडामुळे होऊ शकले नाही. ही मोहीम ठरल्यानुसार पूर्ण होऊ शकली नाही असे इस्रोने एका निवेदनात सांगितले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2021)

चंद्रावर पाण्याचे आढळले अंश :

  • इस्त्रोच्या चांद्रयान-2 चे ऑरबिटर हे यान चंद्राभोवती सुमारे 100 किलोमीटर उंचीवर फिरत आहे.
  • तर या ऑरबिटरवरील इमॅजिंग इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर या उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागाची असंख्य छायाचित्रे काढली.
  • या छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचा दावा इस्त्रोचे माजी अध्यक्ष एस एस. किरणकुमार यांनी केला आहे.
  • अर्थात हे पाणी पृथ्वीवर आढळणाऱ्या प्रवाही, गोठलेल्या किंवा वाफेच्या स्वरुपात नाहीये. तर छायाचित्रांच्या अभ्यासाद्वारे plagioclase (प्लेगियोक्लेज ) प्रकारच्या खडकांत हायड्रोक्सिल (OH) आणि पाणी (H2O) यांचे रेणू आढळले आहेत.
  • तसेच ऑरबिटरवरने काढलेल्या छायाचित्रांचा अभ्यास करत एक शोधनिबंध नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.

सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश रोहिंटन नरिमन निवृत्त :

  • भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश रोहिंटन फली नरिमन गुरुवारी निवृत्त झाले.
  • न्यायमूर्ती नरिमन त्यांनी हार्वर्ड लॉ स्कूलमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डिसेंबर 1993 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी त्यांची वरिष्ठ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होते.
  • तर तोपर्यंत नियमांनुसार साधारणपणे केवळ 45 वर्षांवरील व्यक्तीलाच ते पद दिलं जायचं.
  • न्यायाधीश रोहिंटन यांनी त्यांच्या सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय दिले. त्यांनी तब्बल 13 हजार 565 प्रकरण ऐकली. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासंदर्भातील खटल्यांचे निकाल दिले.
  • नरिमन सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील म्हणून प्रॅक्टिस करत असताना जुलै 2011 मध्ये त्यांची भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती झाली.

जागतिक क्रमवारीत नीरज दुसऱ्या स्थानी :

  • ऑलिम्पिक सुवर्णपदकामुळे भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक क्रमवारीत 14 स्थानांनी आगेकूच करीत दुसरे स्थान गाठण्याची किमया साधली आहे.
  • 23 वर्षीय नीरजने 87.58 मीटर अंतरावर भाला फेकून ऑलिम्पिक अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले पदक जिंकून दिले.
  • तर टोक्यो ऑलिम्पिकच्या आधी तो क्रमवारीत 16व्या स्थानावर होता.
  • तसेच जर्मनीचा जोहनीस व्हेटर हा क्रमवारीत अग्रस्थानावर आहे. पोलंड मार्सिन क्रुकोवस्की तिसऱ्या आणि चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच चौथ्या क्रमांकावर आहे.
  • ऑलिम्पिक आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धामुळे जागतिक क्रमवारीत अ‍ॅथलेटिक्सपटूंना अधिक गुण मिळतात.

दिनविशेष :

  • ‘क्रिस्टियन हायगेन्स‘ या शास्त्रज्ञाने 13 ऑगस्ट 1642 रोजी मंगळाच्या दक्षिण धृवावरील बर्फाच्या टोप्यांचा शोध लावला.
  • ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे‘ तथा ‘बालकवी‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1890 मध्ये झाला.
  • ‘कार्ल गुस्ताव्ह विट‘ याने सन 1898 मध्ये 433 Eros या पृथ्वीजवळच्या पहिल्या लघुग्रहाचा शोध लावला.
  • लेखक ‘प्रल्हाद केशव‘ तथा ‘आचार्य अत्रे‘ यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 मध्ये झाला.
  • सन 1918 मध्ये बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.