12 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

आयएनएस विक्रांत
आयएनएस विक्रांत

12 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 जुलै 2022)

नवीन संसद भवनासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय मानचिन्हाचे अनावरण :

 • नवीन संसद भवनावर उभारण्यासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी अनावरण करण्यात आले.
 • कांस्य धातूपासून निर्मिती केलेल्या या बोधचिन्हाचे वजन साडेनऊ हजार किलो आहे आणि त्याची उंची साडेसहा मीटर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
 • नवीन संसद भवनाच्या दर्शनी भागावर हे राष्ट्रीय बोधचिन्ह उभारले जाणार आहे.
 • तर त्याला आधार देण्यासाठी सुमारे सहा हजार किलो वजनाची पोलादी रचना तयार करण्यात आली आहे.
 • नवीन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बोधचिन्ह निर्मितीची प्रक्रिया या चिन्हाचे मातीचे प्रारूप, संगणकीय रचनेपासून ते कांस्य धातूचे ओतकाम (कास्टिंग) आणि मुलाम्यापर्यंत विविध आठ टप्प्यांत झाली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2022)

INS Vikrant ची शेवटची चाचणी यशस्वी :

 • नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आता नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे.
 • 10 जूलैला आयएनएस विक्रांतची चौथी आणि अखेरची चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
 • भर समुद्रात विविध उपकरणांच्या चाचण्या झाल्यावर विक्रांत काल कोच्ची बंदरातल्या कोच्ची शिपयार्डच्या तळावर परतली.
 • तर जुलै महिन्याच्या अखेरीस विक्रांत ही नौदलाकडे सूपुर्त केली जाईल.
 • तसेच येत्या 15 ऑगस्टला आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेते दाखल करत ‘आझादी का अमृतमहोत्सव ‘ कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.
 • नौदलात एखादी युद्धनौका-पाणबुडी ही सेवेतून निवृत्त झाली की तेच नाव कालांतराने त्याच प्रकारच्या श्रेणीतील युद्धनौकांना द्यायची प्रथा आहे.
 • नवी आयएनएस विक्रांतची बांधणी ही स्वबळावर, स्वबळावर आरेखन करत, स्वदेशी तंत्रज्ञान वापरत करण्यात आली आहे.

अण्णाद्रमुकचे नेतृत्व पलानीस्वामी यांच्याकडे :

 • अण्णाद्रमुकच्या महापरिषदेने सोमवारी पक्षाचे हंगामी सरचिटणीस म्हणून इडापडी के. पलानीस्वामी यांची निवड करण्यात आली.
 • तर त्याचवेळी ओ. पनीरसेल्वम यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.
 • तत्पूर्वी पनीरसेल्वम यांनी पक्षाच्या महापरिषदेची सभा होऊ नये यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती, पण न्यायालयाने ही मागणी फेटाळली.
 • महापरिषदेत हे ठराव मंजूर झाल्याने आता इ. पलानीस्वामी हेच पक्षाचे एकमेव नेते बनले आहेत.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात अर्जुनला सुवर्णपदक :

 • भारताचा युवा नेमबाज अर्जुन बबुताने चँगवॉन येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
 • सुवर्णपदकाच्या लढतीत अर्जुनने टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या लुकास कोझेनिस्कीला 17-9 असा पराभवाचा धक्का दिला.
 • अझरबैजानच्या गबाला येथे 2016मध्ये झालेल्या कनिष्ठ विश्वचषक नेमबाजीत सुवर्णपदक जिंकणाऱ्या अर्जुनचे वरिष्ठ गटातील हे पहिले पदक ठरले.
 • अर्जुनने भारताला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून दिले.

महिला विश्वचषक हॉकी स्पर्धात भारताचे आव्हान संपुष्टात :

 • स्पेनकडून बाद फेरीच्या (क्रॉसओव्हर) सामन्यात 0-1 असा पराभव पत्करल्यामुळे भारताचे ‘एफआयएच’ महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
 • तर या सामन्याच्या तीन सत्रांमध्ये भारताच्या बचाव फळीने अप्रतिम खेळ करत स्पेनला गोल करण्यापासून रोखले.
 • चौथ्या सत्रातही भारताने उत्तम खेळ केला. मात्र, सामना संपण्यासाठी तीन मिनिटे शिल्लक असताना मार्टा सेगूने गोल झळकावत स्पेनला हा सामना जिंकवून दिला.
 • यानंतर भारताने आक्रमणाची गती वाढवण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही.
 • मंगळवारी भारतीय संघ कॅनडाविरुद्ध नवव्या ते 16व्या स्थानासाठी सामना खेळेल.

दिनविशेष :

 • सन 1920 मध्ये पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.
 • राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना 12 जुलै 1982 मध्ये झाली.
 • सन 1985 या वर्षी पी.एन. भगवती भारताचे 17वे सरन्यायाधीश झाले.
 • सन 1995 मध्ये अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
 • महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार ‘सुनील गावसकर‘ यांना 12 जुलै 1999 मध्ये प्रदान झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.