11 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
11 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2022)
न्या. यू. यू. लळित यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती :
- न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांची बुधवारी देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- ते देशाचे 49 वे सरन्यायाधीश आहेत.
- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळित यांच्या नियुक्तीपत्रावर स्वाक्षरी केली.
- 27 ऑगस्ट रोजी न्या. लळित यांचा शपथविधी होणार आहे.
- सध्याचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ 26 ऑगस्ट रोजी समाप्त होत असल्याने दुसऱ्या दिवशी न्या. लळित कार्यभार स्वीकारतील.
- तर केवळ तीन महिने न्या. लळित या पदावर असतील. 8 नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे.
- न्या. लळित हे दुसरे सरन्यायाधीश असतील, ज्यांना वकिलांमधून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात स्थान देण्यात आले.
- 1971 मध्ये एस. एम. सिक्री यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली, जे मार्च 1964मध्ये थेट सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात नियुक्त झालेले पहिले वकील होते.
Must Read (नक्की वाचा):
सेरेना विल्यम्स लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार :
- 23 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी सेरेना विल्यम्स लवकरच टेनिसमधून निवृत्ती घेणार आहे.
- सेरेनानं मंगळवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
- यावर्षी शेवटी होणाऱ्या यूएस ओपननंतर टेनिस स्पर्धेतून निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचं तिने सांगितलं आहे.
- सेरेनाने 1999 मध्ये पहिल्यांदा यूएस ओपन स्पर्धा जिंकली होती.
- यावर्षी सेरेना विल्यम्सनं ‘विम्बल्डन ओपन’ स्पर्धेत भाग घेतला होता. पण पहिल्याच फेरीत तिला बाहेर पडावं लागलं.
ट्रेंट बोल्टने न्यूझीलंड क्रिकेट मंडळासोबत संपवला करार :
- काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा आक्रमक खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.
- आता पुन्हा जागतिक क्रिकेटमधील एक प्रमुख खेळाडू निवृत्तीच्या विचारात असल्याचे म्हटले जात आहे.
- न्यूझीलंडचा प्रमुख गोलंदाज आणि आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ट्रेंट बोल्टने क्रिकेट मंडळासोबत करार संपवला आहे.
- न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.
- न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने 33 वर्षीय ट्रेंट बोल्टला केंद्रीय करारातून मुक्त केले आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीमध्ये ट्रेंट बोल्ट सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना मिळणारी मदत दुप्पट :
- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिंदे-भाजपा सरकारची मंत्रीमंडळ बैठक पार पडली.
- यावेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि मुंबईतील मेट्रो-3 च्या कामासाठी लागणारा खर्च याबाबत राज्य सरकारने दोन मोठे निर्णय घेतले आहेत.
- तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही दुप्पट करण्यात आली आहे.
- तसेच मेट्रो-3 च्या कामासाठी 10 हजार कोटी रुपये वाढवून देण्यात आले आहेत.
- तशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दिनविशेष :
- सन 1943 मध्ये सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
- दादरा व नगर हवेली हा भाग सन 1961 मध्ये भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
- सन 1999 बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या ‘परिमार्जन नेगी‘ याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
- डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे 11 ऑगस्ट 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.