11 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

रघुराम राजन
रघुराम राजन

11 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 एप्रिल 2020)

नाणेनिधीच्या सल्लागार गटात रघुराम राजन यांचा समावेश :

 • करोनामुळे जगासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक मुद्दय़ांवर सल्लामसलतीसाठी एका गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे.
 • तर त्यात रिझर्वबँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह 11 जणांची नेमणूक केली आहे.
 • नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी ही निवड केली असून, इतर सदस्यात सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री थरमन शण्मुगरत्नम, मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक क्रिस्टिन फोर्बस, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हीन रूड, संयुक्त राष्ट्रांचे माजी उप महासचिव लॉर्ड मार्क मलोच ब्राऊन यांचा समावेश आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 एप्रिल 2020)

दैनंदिन वापरातील वस्तूंचे निर्जतुकीकरण करणारे यंत्र विकसित :

 • आपण आणलेले किराणा सामान तसेच चलनी नोटा निर्जतुक करण्यासाठी रोपड येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वैज्ञानिकांनी एक निर्जतुकीकरण पेटी तयार केली आहे.
 • करोना विषाणूच्या प्रसारामुळे बाहेरून आणलेले पदार्थही निर्जतुक करण्याची विशेष गरज निर्माण झाली आहे.
 • तर आयआयटीच्या मते ही पेटी व्यावसायिक वापरात आली तर तिची किंमत पाचशे रुपयांपर्यंत कमी ठेवता येईल. या यंत्राच्या मदतीने बाहेरून आणलेला भाजीपालाच नव्हे तर चलनी नोटाही निर्जतुक करता येतात.
 • तसेच या यंत्रात पैशांचे पाकिट, चलनी नोटा, भाज्या, दुधाच्या पिशव्या, मनगटी घडय़ाळ, मोबाईल फोनसह कोणतीही कागदपत्रे निर्जतुक करता येतात.
 • ही निर्जतुकीकरण पेटी जंतूंना मारणाऱ्या अतिनील किरणांचा मारा करू शकणाऱ्या प्रारूण तंत्रज्ञानावर आधारित आहे. या पेटीतील प्रकाशाकडे थेट डोळ्यांनी पाहू नये, त्यामुळे इजा होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे.

आशियाई विकास बँक भारताच्या मदतीला :

 • आशियाई विकास बँकेने भारताला 2.2 अब्ज डॉलरची मदत करोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे. या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करोना विरोधात लढण्यासाठी 2.2 अब्ज डॉलर म्हणजे 16500 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.
 • तर असाकावा यांनी सीतारामन यांना दूरध्वनी करून भारताने करोनाविरोधात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
 • त्याचबरोबर कर कपात व इतर सवलतींसह 1.7 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे.
 • 26 मार्च रोजी सीतारामन यांनी ही 1.7 लाख कोटींची मदत योजना जाहीर केली होती.

पंजाबमध्ये 1 मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा :

 • पंजाब सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये आता एक मे पर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.
 • पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी लॉकडाउन वाढवण्याचे संकेत दिले होते. पंजाबमध्ये Covid-19 चाी लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे.
 • तर पंजाबमध्ये 100 पेक्षा जास्त नागरिकांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी खबरदारी म्हणून लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेक्सिको वगळता इतर देशांची तेल उत्पादन घटवण्यास मान्यता :

 • मेक्सिको वगळता इतर प्रमुख तेल उत्पादक देशांमध्ये तेलाच्या उत्पादनात कपात करण्याच्या निर्णयावर मतैक्य झाले आहे.
 • ओपेक या तेल उत्पादक व निर्यातदार देशांची बैठक होऊन त्यात जुलैपर्यंत तेलाचे उत्पादन दर दिवशी 1 कोटी पिंपे व वर्षअखेरीपर्यंतच्या काळात 80 लाख पिंपांनी कमी करण्यावर मतैक्य झाले. पण त्याला मेक्सिकोने मान्यता दिलेली नाही.
 • ओपेक व रशियासह काही मित्र देश यांची आभासी बैठक गुरुवारी झाली. तेलाचे दर दोन दशकातील नीचांकी होत आले असून घसरण रोखण्यासाठी तेलाचे उत्पादन कमी करणे गरजेचे आहे, पण मेक्सिकोने त्यासाठी मान्यता देणे गरजेचे आहे. मेक्सिकोने त्यांच्या वाटय़ाचे तेल उत्पादन दिवसाला चार लाख पिंपानी कमी करणे गरजेचे आहे.

दिनविशेष:

 • 11 एप्रिल हा ‘दिवस जागतिक पार्किन्सन दिन’ आहे.
 • कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे हे सिद्ध करणारे शास्त्रज्ञ जेम्स पार्किन्सन यांचा जन्म 11 एप्रिल 1755 रोजी झाला.
 • श्रेष्ठ समाजसुधारक तसेच श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत ज्योतीराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला.
 • कस्तुरबा गांधी यांचा जन्म 11 एप्रिल 1869 मध्ये झाला होता.
 • सन 1919 मध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची स्थापना झाली.
 • सन 1999 मध्ये अग्नी-2 या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.