10 मार्च 2022 चालू घडामोडी – Current Affairs

10 March 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 मार्च 2022)

कोव्होवॅक्स लशीला मंजुरी :

 • सीरम इन्स्टिटय़ूटच्या 12 ते 17 वर्षे वयोगटासाठीच्या कोव्होवॅक्स लशीचा आपत्कालीन वापराचा मार्ग मोकळा झाला आहे.
 • करोनाविषयक तज्ज्ञ समितीने गेल्या आठवडय़ात या वयोगटासाठी कोव्होवॅक्स लशीच्या आपत्कालीन वापरास मंजुरीची शिफारस केली होती़ त्यानुसार केंद्रीय औषध महानियंत्रकांकडून ही मंजुरी मिळाली आहे.
 • 12 ते 17 वर्षे वयोगटातील सुमारे दोन हजार 707 मुलांवरील दोन अभ्यासांमधील आकडेवारीनुसार कोव्होवॅक्स अत्यंत प्रभावी, रोगप्रतिबंधक, सुरक्षित असल्याचे औषध महानियंत्रकांकडे करण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्यात आले होत़े.
 • 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणासाठी आपत्कालीन वापराची परवानगी मिळालेली कोव्होवॅक्स ही चौथी लस आह़े

आंतरराष्ट्रीय विमान सेवा 27 मार्चपासून पूर्ववत :

 • करोनाकाळातील दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला आकाश मोकळे झाले आह़े
 • तर 27 मार्चपासून ही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे हवाई वाहतूक मंत्रालयाने जाहीर केल़े.
 • तसेच करोना प्रादुर्भावामुळे भारताने आंतरराष्ट्रीय विमानसेवा 23 मार्च 2020 रोजी स्थगित केली होती़.
 • मात्र, जुलै 2020 पासून 37 देशांशी कराराद्वारे भारताने विशेष विमानसेवा सुरू ठेवली होती़.
 • तर आता करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने 27 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यात येत आहे, असे हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितल़े.

खेळभावनेविरोधात नसल्याचा ‘एमसीसी’च्या नव्या नियमांत निर्वाळा :

 • गोलंदाजी करताना नॉन-स्ट्रायकर फलंदाजाने क्रिझ सोडल्यास ‘मंकिडग’ पद्धतीने बाद केल्यास ते खेळभावनेच्या विरोधात मानले जायचे.
 • परंतु मेरिलिबोन क्रिकेट क्लबने (एमसीसी) घोषित केलेल्या नव्या नियमांत या बादपद्धतीला धावचीत ठरवले आहे.
 • तर येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या या नियमांत चेंडूच्या लकाकीसाठी लाळेच्या वापरास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
 • ‘मंकिडग’ पद्धतीने नॉन-स्ट्रायकर फलंदाज बाद केल्यास गोलंदाजाने खेळभावनेला काळिमा फासल्याप्रमाणेच त्याच्याविषयी बोलले जायचे.
 • परंतु कलम क्रमांक 41.16 हे नॉन-स्ट्रायकर फलंदाजाला बाद करण्याबाबतचा खेळभावनेविरोधातील नियम आता कलम क्रमांक 38नुसार धावचीत असा बदलण्यात आला आहे.

अष्टपैलू जडेजाची अग्रस्थानी झेप :

 • भारताचा रवींद्र जडेजा बुधवारी ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अग्रस्थानी विराजमान झाला.
 • श्रीलंकेविरुद्ध मोहाली येथे झालेल्या कसोटीत नाबाद 175 धावांची खेळी साकारण्यासह नऊ बळी मिळवल्याने डावखुऱ्या जडेजाने 406 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.
 • वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर आणि भारताचा रविचंद्रन अश्विन यांची अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी घसरण झाली.
 • तर 32 वर्षीय जडेजाने कारकीर्दीत दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला.
 • यापूर्वी, ऑगस्ट 2017मध्ये जडेजा एका आठवडय़ासाठी अग्रस्थानी होता.

विश्वचषक नेमबाजी स्पर्धात रिदम-अनिष जोडीला सुवर्ण :

 • भारताच्या रिदम सांगवान आणि अनिष भानवाला या जोडीने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशी 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक आपल्या नावे केले.
 • रिदम-अनिष या जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत थायलंडच्या पादुका चाविसा आणि राम खांहाएंग या जोडीला 17-7 अशी धूळ चारली.
 • तर त्यांच्या या कामगिरीमुळे विश्वचषकाअखेरीस भारताने चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशा सात पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले.
 • रिदम-अनिष या जोडीने 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल मिश्र सांघिक गटातील पात्रतेच्या दुसऱ्या फेरीत 400 पैकी 370 गुणांसह दुसरे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

दिनविशेष :

 • 10 मार्च 1897 हा दिवस पहिल्या महिला शिक्षिका आणि समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन आहे.
 • प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना 10 मार्च 1922 रोजी 6 वर्षांची शिक्षा झाली.
 • ‘ट्विटर’चे सहसंस्थापक बिझ स्टोन यांचा जन्म 10 मार्च 1974 रोजी झाला.
 • युरेनस ग्रहाला शनी ग्रहासारखी कडी असल्याचा शोध 10 मार्च 1977 रोजी लागला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मार्च 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.