10 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जगनमोहन रेड्डी
जगनमोहन रेड्डी

10 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 जुलै 2022)

ट्वीटर खरेदी व्यवहारातून इलॉन मस्क यांची माघार :

  • टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी करण्याचा व्यवहार रद्द करत असल्याचे शुक्रवारी सांगितले.
  • ट्विटरने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला.
  • ट्विटरकडून बनावट खात्यांची माहिती देण्यात येत नसल्याचे कारण देत मस्क यांनी ट्विटर खरेदीच्या व्यवहारातून माघार घेतली.
  • दुसरीकडे ट्विटर हा करार लागू करण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबण्याच्या तयारीत आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जुलै 2022)

जगनमोहन रेड्डी वायएसआर काँग्रेसचे आजीवन अध्यक्ष :

  • आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांची शनिवारी युवाजन श्रमिक रायथू काँग्रेसच्या (वायएसआर काँग्रेस) आजीवन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
  • पक्षाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या समारोपाच्या दिवशी पक्षातर्फे ही निवड करण्यात आली.
  • जगन यांची आजीवन अध्यक्षपदी निवड व्हावी यासाठी यापूर्वी पक्षाच्या घटनेत दुरुस्ती करण्यात आली होती.
  • जगनमोहन यांनी 2011 मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर ‘वायएसआर काँग्रेस’ची स्थापना केली आणि तेव्हापासून ते पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांची आई विजयम्मा या मानद अध्यक्ष आहेत.
  • जगन यांची यापूर्वी 2017 मध्ये पक्षाच्या अधिवेशनात पक्षाध्यक्षपदी निवड झाली होती.

ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या क्रांतिकारकांच्या कविता भारत सरकार करणार प्रकाशित :

  • भारतीय स्वातंत्र चळवळीच्या काळात अनेक क्रांतीकारकांनी लिहिलेल्या कविता आणि लेखांवर ब्रिटीशांनी बंदी आणली होती.
  • तर या कविता आणि लेख भारत सरकार पुन्हा प्रकाशित करणार आहे.
  • स्वातंत्र्या अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने हा निर्णय घेतला आहे.
  • अमृत महोत्सवानिमित्ताने भारत सरकारने एक संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर एक वेगळा सेक्शन तयार करण्यात आला आहे.
  • तसेच याच सेक्शनमध्ये 1947 पूर्वी क्रांतीकारकांनी लिहिलेल्या कविता आणि लेख प्रकाशित करण्यात येणार आहे.
  • तर हे सर्व साहित्य बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मराठी, ओडीया, पंजाबी, सिंधी, तामिळ, तेलुगू आणि उर्दू भाषेत प्रकाशित करण्यात येईल.
  • यासोबत अनेक कवितांचे व्हिडीओ देखील येथे प्रकाशित करण्यात आले आहे.

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-20 मालिका :

  • रवींद्र जडेजाच्या फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने शनिवारी दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर 49 धावांनी मात केली.
  • तर या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे.
  • तर या मालिकेतील तिसरा सामना रविवारी खेळवण्यात येईल.
  • बर्मिगहॅम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 17 षटकांत 121 धावांत गारद झाला.

विम्बल्डन टेनिस स्पर्धात रायबाकिनाला ऐतिहासिक जेतेपद :

  • रशियाची माजी खेळाडू आणि आता कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एलिना रायबाकिनाने ऐतिहासिक अधिराज्य गाजवताना विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात तिने पिछाडीवरून तिसऱ्या मानांकित टय़ुनिशियाच्या ओन्स जाबेऊरला पराभवाचा धक्का देत पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा केला.
  • तसेच ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ती कझाकस्तानची पहिली टेनिसपटू ठरली.
  • रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विम्बल्डनमध्ये रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती.
  • मात्र, 2018पासून रशियन रायबाकिना कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिला यंदाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने या संधीचे सोने केले.
  • 11 विम्बल्डन स्पर्धा जिंकणारी 23 वर्षीय रायबाकिना ही गेल्या 11 वर्षांतील सर्वात युवा महिला टेनिसपटू ठरली आहे.

दिनविशेष :

  • सन 1940 मध्ये बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
  • सन 1973 मध्ये पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
  • सन 1978 मध्ये मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.
  • सन 1992 आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
  • तसेच सन 1992 मध्येह संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-2ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.