10 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

सिप्लाच्या रेमडेसिविरची किंमत 4 हजार रुपये दराने ते उपलब्ध केले जाणार:
सिप्लाच्या रेमडेसिविरची किंमत 4 हजार रुपये दराने ते उपलब्ध केले जाणार:

10 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 जुलै 2020)

सिप्लाच्या रेमडेसिविरची किंमत 4 हजार रुपये दराने ते उपलब्ध केले जाणार:

 • करोनावर काही प्रमाणात उपयुक्त असलेल्या रेमडेसिविर औषधाची प्रजातीय आवृत्ती सिप्ला या बहुराष्ट्रीय कंपनीने उपलब्ध केली असून, एका कुपीसाठी 4 हजार रुपये दराने ते उपलब्ध केले जाणार आहे.
 • अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने करोनावरील आपत्कालीन उपचारांकरिता रेमडेसिविर औषधाला मान्यता दिली होती.
 • याआधी कंपनीने शंभर मि.ग्रॅ.च्या कुपीसाठी पाच हजार रुपये आकारले होते व पहिल्या महिन्यात 80 हजार कुप्यांची विक्री करण्याचा उद्देश होता.
 • सिप्लाचे कार्यकारी उपाध्यक्ष निखिल चोप्रा यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने ‘सिप्रीमी’ नावाने रेमडेसिविरची प्रजातीय आवृत्ती जारी केली असून ती जगात सर्वात कमी किमतीची आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 जुलै 2020)

महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी कार्यपद्धती जाहीर:

 • महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत अद्यापही संभ्रमता कायम असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली.
 • यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणं गरजेचं आहे, असं केंद्रीय गृह मंत्रलयाचं म्हणणं आहे.
 • त्यामुळे यासंदर्भात यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणं अत्यंत गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
 • केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं म्हटलंय की, करोनाबाबत आरोग्य मंत्रालयाच्या नियमावलीचे सर्वांना पालन करावे लागेल.
 • यामध्ये दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूचे दुसरी लक्षणं आहेत, त्यांना दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे किंवा दुसऱ्या वर्गात बसून द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर परीक्षकांनाही मास्क आणि हातात ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

सीईओ राहुल जोहरींचा राजीनामा BCCI कडून मंजूर:

 • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
 • जोहरी यांनी काही महिन्यांपूर्वी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्याकडे आपला राजीनामा दिला होता.
 • जोहरी यांची २०१६ मध्ये बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दिनविशेष :

 • सन 1940 मध्ये बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.
 • सन 1973 मध्ये पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
 • सन 1978 मध्ये मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.
 • सन 1992 आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
 • तसेच सन 1992 मध्येह संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-2ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 जुलै 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.