10 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

लॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहून काढली- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई:
लॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहून काढली- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई:

10 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2020)

१०१ शस्त्रे व लष्करी उपकरणांना आयातबंदी- संरक्षणमंत्री राजनाथ सिंह:

 • 2014 साली जाहीर करण्यात आलेल्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचा उद्देश स्वदेशी संरक्षण उद्योग विकसित करण्याचा होता, मात्र ही योजना लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरली.
 • संरक्षण क्षेत्रातील 101 शस्त्रे व लष्करी उपकरणांना आयातबंदी करण्याची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची घोषणा ही ‘आत्मनिर्भर भारत’च्या दिशेने मोठे पाऊल असून ते वरील विचारसरणीला अनुसरूनच आहे.
 • अशी बंदी हे एक प्रकारे उदारीकरणापूर्वीच्या ‘लायसन्स परमिट राज’कडे परत जाणे आहे; मात्र संरक्षण उद्योगाकडून आलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे सरकारला गुंतागुंतीच्या अशा संरक्षण उद्योग क्षेत्रात हस्तक्षेप करणे भाग पडले आहे.
 • आता काही वस्तूंचा ‘व्यापारबंदी यादीत’ समावेश करून आणि देशांतर्गत खरेदीसाठी अर्थसंकल्पात वेगळी तरतूद करून सरकारने स्वदेशी उद्योगाला संदेश दिला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2020)

17 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा- नरेंद्र मोदी:

 • मागील दीड वर्षात 75 हजार कोटींचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. त्यातले 22 हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.
 • एवढंच नाही तर साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने 17 हजार कोटी रुपये जमा करताना मला आनंद होतो आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा केल्या.

लॉकडाउन मध्ये 13 पुस्तके लिहून काढली- मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई:

 • मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चक्क 13 पुस्तके लिहून काढली आहेत.
 • करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पिल्लई यांनी पुस्तके आणि कविता लिहिल्या आहेत.
 • मार्च महिन्यापासून आतापर्यंत पिल्लई यांनी 13 पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील कविता संग्रहाचाही समावेश आहे.
 • पिल्लई हे मागील तीन दशकांपासून लिखाण करत आहेत. त्यांचे पहिले पुस्तक 1983 मध्ये प्रकाशित झालं होतं.
  राज्यपाल पदावर नियुक्त होण्याआदी त्यांची 105 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण 121 पुस्तके लिहिली आहेत.

100 दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही:

 • भारत आणि न्यूझीलंड या देशात जवळपास एकाचवेळी लॉकडाउन घेण्यात आला होता. भारतामध्ये अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे पण करोनाचा प्रादुर्भाव अद्याप तसाच आहे.
 • याउलट अनलॉक होताना देशातील करोनाचा संसर्ग वेगानं होत असल्याचं समोर आलं आहे. याउलट न्यूझीलंड सारख्या छोट्या देशानं करोनावर यशस्वी मात केली आहे.
 • trtworld च्या वृत्तानुसार, भारतासोबतच लॉकडाउन करणाऱ्या न्यूझीलंडमध्ये गेल्या 100 दिवसांपासून एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही.
 • जगातील इतर देशांपुढे न्यूझीलंडनं आज एक आदर्श ठेवला आहे.

खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचे स्वप्न:

 • खाशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचे स्वप्न मी जोपासले आहे.
 • स्वत:चा सराव आणि महाराष्ट्रातून दर्जेदार कुस्तीपटू घडावेत, यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची अकादमी स्थापन करण्याची माझी इच्छा आहे, असा निर्धार कुस्तीपटू नरसिंह यादवने व्यक्त केला.
 • 2016 मध्ये उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) घातलेली नरसिंहवरील चार वर्षांची बंदी काही दिवसांपूर्वी संपली आहे.
 • या बंदीमुळे रिओत पोहोचूनही ऑलिम्पिक सहभागाची त्याची संधी हिरावली होती. पण टोक्यो ऑलिम्पिक लांबणीवर पडताच बंदी संपल्यामुळे आता पात्रतेचे स्वप्न त्याला खुणावते आहे.

दिनविशेष :

 • 10 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन‘ आहे.
 • सन 1675 मध्ये चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
 • स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना 10 ऑगस्ट 1810 मध्ये झाली.
 • सन 1821 मध्ये मिसुरी हे अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.
 • भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म 10 ऑगस्ट 1963 मध्ये झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.