1 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2018)

1 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 सप्टेंबर 2018)

आशियाई स्पर्धेत भारतीय महिला बॉक्सर्सना सुवर्णपदक:

  • बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या Youth Boxing Championship स्पर्धेत भारताच्या महिला बॉक्सर्सनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. 57 किलो वजनी गटात भारताच्या साक्षी चौधरीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
  • साक्षीने क्रोएशियाच्या निकोलीना कॅसिकचा पराभव केला. 31 ऑगस्टला याच स्पर्धेत भारताच्या नितूने सुवर्णपदकाची कमाई केली होती. Nitu-Boxer
  • दुसरीकडे भारताच्या अनामिका आणि मनिषा या बॉक्सर्सना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 51 किलो वजनी गटात अनामिकाला अमेरिकेच्या डेस्टिनी ग्रेशियाकडून अटीतटीच्या लढाईमध्ये हार पत्करावी लागली. मात्र 64 किलो वजनी गटात इंग्लंडच्या गेमा रिचर्डसनने मनिषावर एकतर्फी मात केली.
  • तसेच यासोबत भारताच्या जॉनी, अस्था पहावा, भावेश कट्टीमणी, अंकित खटाना, नेहा यादव, साक्षी गायधनी या बॉक्सर्सना उपांत्य फेरीतील पराभवामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2018)

विधि आयोगाचा महत्वपूर्ण अहवाल:

  • समान नागरी कायद्याची आवश्यकता नाही असे मत व्यक्त करून विधि आयोगाने विवाह, घटस्फोट, पुरुष व स्त्रियांचे विवाहाचे वय यात काही बदल करणाऱ्या शिफारशी केल्या आहेत.
  • विधी आयोगाचा कार्यकाल 31 ऑगस्ट रोजी संपला. आयोगाने सल्ला व सूचनावजा अहवाल जारी करताना धर्मस्वातंत्र्य व प्रसाराचा धर्मनिरपेक्ष लोकशाहीतील अधिकार मान्य केला आहे.
  • धार्मिक रूढीच्या नावाखाली तिहेरी तलाक, बालविवाह हे सामाजिक गैरप्रकार मान्य करता येणार नाहीत असेही आयोगाने म्हटले आहे.
  • धर्माच्या नावाखाली अनिष्ट बाबींना संरक्षण मागणे चुकीचे आहे असे रिफॉर्म ऑफ फॅमिली लॉ या अहवालात म्हटले आहे.
  • विधी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश बी.एस. चौहान यांनी समान नागरी कायद्याची शिफारस करण्याऐवजी व्यक्तिगत कायद्यांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल करण्याची सूचना केली असून आता यातील अंतिम अहवाल बारावा विधी आयोग सादर करणार आहे.

राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज कालवश:

  • राष्ट्रसंत जैन मुनी तरूण सागर महाराज यांचे दिल्लीमध्ये 1 सप्टेंबर रोजी निधन झाले. ते 51 वर्षांचे होते. गेल्या 20 दिवसांपासून तरूण सागर काविळीने त्रस्त होते. कावीळेमुळे तरूण सागर यांना अशक्तपणा आला होता.
  • पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर येथील राधापुरी जैन मंदिरात तरुण सागर यांनी अखेरचा श्वास घेतला. तरूण सागर महाराज यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त जमण्यास सुरूवात झाली आहे. Jain-Muni-Tarun-Tagar-Maharaj
  • मुनी तरुण सागर यांचे नाव पवन कुमार जैन आहे. त्यांचा जन्म 26 जून 1967 रोजी मध्य प्रदेशातील दमोह इथल्या गुहजी गावात झाला. त्यांच्या आईचे नाव शांतीबाई आणि वडिलांचं नाव प्रताप चंद्र आहे. मुनीश्री तरुण सागर यांनी 8 मार्च 1981 रोजी गृहत्याग केला. त्यानंतर त्यांनी छत्तीसगडमध्ये दीक्षा घेतली.
  • तरुण सागर यांनी मध्य प्रदेश आणि हरियाणा विधानसभेतही प्रवचन दिलं होतं. हरियाणा विधानसभेतील प्रवचनावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मध्य प्रदेश सरकारने 6 फेब्रुवारी 2002 रोजी त्यांना राजकीय अतिथीचा दर्जाही दिला होता.

सेलिंग (Sailing) क्रीडा प्रकारात भारताला 3 पदक:

  • इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने Sailing क्रीडा प्रकारात 3 पदकांची कमाई केली आहे.
  • 49er FX Women’s प्रकारात भारताच्या वर्षा गौतम आणि श्वेता शेर्वेगर जोडीने रौप्य पदकाची कमाई केली.
  • Sailing क्रीडा प्रकारात यंदाच्या स्पर्धेतले भारताचे हे पहिले पदक ठरले. यानंतर भारताच्या हर्षिता तोमरने Open Laser 4.7 प्रकारात कांस्यपदक पटकावले. याचसोबत वरुण ठक्कर आणि गणपती चेंगप्पा जोडीने 40er Mens प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली.

अमेरिकेकडून व्हिसा धोरणात बदल न करण्याचे संकेत:

  • भारत व अमेरिका यांच्या दरम्यान टू प्लस टू संवाद सप्टेंबरमध्ये होणार असला तरी त्या पाश्र्वभूमीवर सध्याच्या कडक एच 1 बी व्हिसा धोरणात कुठलेही बदल करण्यात येणार नाहीत. त्यात देशी कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका कायम राहील, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
  • भारतीय माहिती तंत्रज्ञांना अमेरिकेत मोठी मागणी असून ते एच 1 बी व्हिसावर तेथे जात असतात, त्यामुळे सप्टेंबरमधील संवादात भारत हा मुद्दा चर्चेत उपस्थित करण्याची शक्यता आहे. एच 1 बी व्हिसा धोरणाचा फेरविचार करून त्यात अमेरिकी कामगारांचे हित जोपासण्यात आले आहे. BH1
  • एच 1 बी व्हिसा हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्या परदेशी कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू शकतात, पण ते सैद्धांतिक व तांत्रिक विषयात तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. दरवर्षी भारत व चीन या देशांचे अनेक कर्मचारी अमेरिकेत नोकरीसाठी जात असतात.
  • ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे, की एच 1 बी व्हिसा व्यवस्थेत सुधारणा करण्यात आल्या असून अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकी लोकांना नोकऱ्या नाकारून या व्यवस्थेचा गैरवापर करतात.

दिनविशेष:

  • हरेकृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद यांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 मध्ये झाला.
  • सन 1906 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अॅटॉर्नीची स्थापना झाली.
  • पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात सन 1911 मध्ये भारत गायन समाजाची स्थापना केली.
  • 1 सप्टेंबर 1956 मध्ये भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.