1 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

पीआर श्रीजेश
पीआर श्रीजेश

1 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (1 फेब्रुवारी 2022)

जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी 20 राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या :

  • जिल्हा नियोजन समितीवर 20 राजकीय पदाधिकाऱ्यांची सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
  • जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्यामुळे सहाजिकच या समितीवर राष्ट्रवादीचाच वरचष्मा आहे.
  • तर या समितीचे अध्यक्षपद पालकमंत्र्यांकडे तर सचिवपद जिल्हाधिकाऱ्यांकडे आहे.
  • तसेच राज्य सरकारकडून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांच्या निधीचे वितरण या समितीच्या माध्यमातून केले जाते.
  • समितीवर विधानसभा सदस्य व संसद सदस्य या प्रवर्गातून नियुक्त करायचे 2, जिल्हा नियोजनाबद्दल ज्ञान असलेले 4 व विशेष निमंत्रित म्हणून 14 अशा एकूण 20 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताचा श्रीजेश वर्षांतील सर्वोत्तम क्रीडापटू :

  • भारतीय हॉकी संघाचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धामधील 2021 वर्षांतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.
  • तर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जिंकणारा तो केवळ दुसरा भारतीय क्रीडापटू आहे.
  • 2020 मध्ये भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने हा पुरस्कार पटकावला होता.
  • श्रीजेशने हा पुरस्कार मिळवताना स्पेनचा स्पोर्ट्स क्लाइिम्बगपटू अ‍ॅल्बर्ट गिनेस लोपेझ आणि इटलीचा वुशूपटू मिशेल जिओर्डानो यांना मागे टाकले.

भारतीय महिलांकडून चीनचा 7-1 असा धुव्वा :

  • भारतीय महिला संघाने सोमवारी ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकीमध्ये विजयी पर्दापण करताना सलामीच्या लढतीत चीनचा 7-1 असा धुव्वा उडवला.
  • यंदा मस्कत (ओमान) येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रो लीग हॉकी स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून भारतीय महिला संघाला प्रथमच यामध्ये खेळण्याची संधी लाभत आहे.
  • तर त्यांनी चीनविरुद्धच्या सामन्याला आक्रमक सुरुवात केली.
  • तसेच पाचव्या मिनिटाला नवनीत कौरने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली.
  • तर 52व्या मिनिटाला सुशिलाने गोल झळकावल्याने भारताने हा सामना 7-1 असा फरकाने जिंकला.

रणजी हंगाम 16 फेब्रुवारीपासून :

  • स्थानिक क्रिकेटमध्ये मानाचे स्थान असलेल्या रणजी करंडक स्पर्धेच्या बहुप्रतीक्षित हंगामाला 16 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी जाहीर केले.
  • तर 5 मार्चपर्यंत या स्पर्धेचे साखळी सामने होतील.
  • तसेच करोनामुळे गेल्या वर्षी रणजी स्पर्धेचे आयोजन करणे शक्य झाले नाही.
  • 2019-20 मध्ये झालेल्या अखेरच्या रणजी स्पर्धेतील अंतिम फेरीत सौराष्ट्रने बंगालला नमवले होते.

दिनविशेष:

  • 1 फेब्रुवारी हा दिवस 2013 या वर्षीपासून ‘जागतिक बुरखा/हिजाब दिन’ म्हणून पाळला जातो.
  • सन 1884 मध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
  • सुधी रंजन दास यांनी सन 1956 मध्ये भारताचे 5वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • 1 फेब्रुवारी सन 2003 रोजी अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट यात भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांच्यासह सहा अंतराळवीर मृत्युमुखी पडले.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.