MHT CET चे संभाव्य वेळापत्रक जाहीर, PCMB ग्रुपची यावर्षी परीक्षा होणार नाही

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे नियोजन योग्य रीतीने करता यावे म्हणून सीईटी सेलकडून उच्च शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या ८ व्यावसायिक परीक्षेंचे व तसेच ६ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे.

MHT CET Timetable
MHT CET परीक्षेचे वेळापत्रक प्रकाशित

मुंबई : महाराष्ट्र राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमएचटी सीईटी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून मागील वर्षीपेक्षा काही बदल करण्यात आले आहेत. या बरोबरच सीईटी सेलने १४ इतर परीक्षांचे वेळापत्रक देखील प्रकाशित केले आहे. यामधील सर्वात महत्वाची मानल्या जाणारी MHT CET परीक्षा (पीसीएम व पीसीबी ग्रुप) १३ ते २३ एप्रिल २०२० या दरम्यान होणार आहे. तर एमबीए ची सीईटी परीक्षा १४ आणि १५ मार्चला होणार आहे. 

विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना अभ्यासाचे नियोजन योग्य रीतीने करता यावे म्हणून सीईटी सेलकडून उच्च शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या ८ व्यावसायिक परीक्षेंचे व तसेच ६ तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रकाशित करण्यात आले आहे. प्रवेश नियंत्रण प्राधिकरनासमावेत राज्य प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकाऱ्यांची झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावर्षीही मागील वर्षाप्रमाणे पर्सेंटाईल पद्धतीने निकाल प्रकाशित करण्यात येणार आहे व ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.

यावेळी सीईटी सेलचे आयुक्त संदीप कदम म्हणाले कि, विद्यार्थ्यांनी विविध सीईटी परीक्षेसाठी अर्ज करण्याची तारीख व परीक्षांचे अचूक वेळापत्रकाविषयी सविस्तर माहिती हि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.

राज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तीन व पाच वर्षीय विधि (लॉ), बीई/बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड या सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठीचे वेळापत्रक प्रकाशित केले आहे.

विविध सीईटी परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे :

एमएचटी सीईटी १३ ते २३ एप्रिल २०२०
एमबीए/एमएमएस १४ आणि १५ मार्च २०२०
मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट  १६ मे २०२०
एमसीए  २८ मार्च २०२०
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट  १० मे २०२०
एलएलबी ५ वर्षे  १२ एप्रिल २०२०
एलएलबी ३ वर्षे  २८ जून २०२०
बीएड/एमएड  १२ मे २०२०
बीपीएड  ११ मे २०२०
एमपीएड  १४ मे २०२०
बीए/बीएससी बीएड  २० मे २०२०
एमएड  २६ मे २०२०

सीईटी सेल तर्फे विद्यार्थांना वेळापत्रक डाउनलोड करण्याची सोय http://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून, विद्यार्थांनी संकेतस्थळाला भेट द्यावी असे सीईटी सेल मार्फत सांगण्यात आले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.