खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

खनिजद्रव्य व त्याचे उपयोग 

  • शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.
  • खनिज – फॉस्फरस  
  • उपयोग – हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता
  • अभावी होणारे परिणाम – हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात
  • स्त्रोत – अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या
  • खनिज – पोटॅशियम
  • उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता
  • अभावी होणारे परिणाम – चेतापेशीवर परिणाम होतो
  • स्त्रोत – सुकी फळे
  • खनिज – कॅल्शियम
  • उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता
  • अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.
  • स्त्रोत – तीळ व पालेभाज्या
  • खनिज – लोह
  • उपयोग – रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.
  • अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  
  • स्त्रोत – हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी
  • खनिज – तांबे
  • उपयोग – हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
  • अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.
  • स्त्रोत – पालेभाज्या
  • खनिज – सल्फर
  • उपयोग – प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य
  • अभावी होणारे परिणाम – केस, हाडे कमकूवत होतात
  • खनिज – फ्लोरिन
  • उपयोग – दातांचे रक्षण करण्याकरिता,
  • अभावी होणारे परिणाम – याच्या अभावी दंतक्षय होतो.
  • खनिज – सोडीयम
  • उपयोग – रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.
  • अभावी होणारे परिणाम – रक्तदाबावर परिणाम होतो.  
  • खनिज – आयोडीन  
  • उपयोग – थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता
  • अभावी होणारे परिणाम – गलगंड नावाचा आजार होतो.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.