जागतिक प्रादेशिक संघटना

जागतिक प्रादेशिक संघटना

1. सार्क (SAARC) :-

  • सप्टेंबर 1983 मध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, नेपाळ, श्रीलंका व भूतान या सात देशांच्या परराष्ट्र मंत्र्याची बैठक नवी दिल्ली येथे भरली होती.
  • या बैठकीतमध्ये सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. नुकते अफगाणीस्थानला सुद्धा या संघटनेचा आठवा सदस्य म्हणून मान्यता दिली आहे.
  • स्थापना :सप्टेंबर 1983

उद्देश :

  • सर्व राष्ट्रांच्या एकमताने या संघटनेची खालील उद्दिष्टे ठरविण्यात आली.

 

  • दक्षिण आशियाई क्षेत्रातील लोकांच्या जीवनामध्ये सुधारणा घडवून आणणे.

 

 

  • दक्षिण आशियाई प्रदेशातील आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक सुधारणा करणे.

 

 

  • या प्रदेशातील देशांमध्ये सामूहिकरित्या स्वावलंबनाची प्रक्रिया वृदिंगत करणे.

 

 

  • सदस्य राष्ट्रांमध्ये आर्थिक, सामाजिक, तांत्रिक, वैज्ञानिक क्षेत्रात परस्परांना सहकार्य करणे.

 

  • दक्षिण आशियाई संघटनेतील समान हित संबंधाबाबत आंतरराष्ट्रीय व्यासपिठावर सहकार्य करणे.
  • बैठक : या संघटनेची बैठक दरवर्षी बोलाविण्यात येते.

2. साप्ता (SAFTA) :- 

  • मे 1995 मध्ये सार्क सदस्य राष्ट्रांची बैठक दिल्ली येथे भरली होती. भारताचे पंतप्रधान नरसिंहराव हे या बैठकीचे अध्यक्ष होते.
  • या बैठकीमध्ये अध्यक्षीय पासदावरून बोलतांना नरसिंहराव यांनी जगातील बदलत्या आर्थिक परिस्थितीची कल लक्षात घेता सार्क देशा अंतर्गत आर्थिक समुदाय स्थापन करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पानेला सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिली.
  • या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानुसार सार्क प्राधान्यकृत व्यापार करार या संघटनेची स्थापना करण्यात आली.
  • डिसेंबर 1995 पासून साप्ताच्या कामकाजाला सुरुवात झाली.
  • साप्ता कराराअंतर्गत सदस्य राष्ट्रांनी एकूण 226 वस्तूंच्या जकाती विषयक निर्णय घेण्यात आले.
  • या कराअंतर्गत सन 2000 पर्यंत सदस्य राष्ट्रामध्ये व्यापार खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

3. राष्ट्रकुल परिषद (COMMONWEALTH) :

  • ब्रिटनच्या वसाहतीखाली असलेल्या राष्ट्रांची राष्ट्रकुल ही संघटना स्थापन करण्यात आली. ब्रिटनची राणी या संघटनेची कायम स्वरूपी अध्यक्ष आहे. या संघटनेची दर दोन वर्षानी बैठक बोलाविण्यात येते.
  • या बैठकीमध्ये सदस्य राष्ट्रांच्या आर्थिक, राजकीय प्रश्नावर चर्चा करण्यात येते.
  • स्थापना : 1926
  • मुख्यालय : लंडन
  • सदस्य राष्ट्रे : 53

4. यूरोपियन आर्थिक समुदाय :

  • युरोप खंडात येणार्‍या राष्ट्रांमध्ये व्यापर व्यवसाय वाढीला लावणे आणि जकात विषयक धोरण निश्चित करण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
  • स्थापना : 1958
  • मुख्यालय : ब्रूसेल्स (बेल्जियम)
  • सभासद राष्ट्र : युरोप खंडातील बेल्जियम, जर्मनी, पोर्तुगीज, नेदरलँड, इंग्लंड, ग्रीस, लॅक्झेबर्ग, डेन्मार्क, स्वीडन, इटली, आयर्लंड, फिनलँड, फ्रान्स, स्पेन व ऑस्ट्रिया असे एकूण 15 राष्ट्र सदस्य आहेत.

5. ओपेक (OPEC) :

  • तेल उत्पादन करणारे राष्ट्र या संघटनेचे सदस्य असून जागतिक तेल उत्पादनाच्या किंमती या संघटनेव्दारे नियंत्रीत केल्या जातात.
  • स्थापना : 14 नोव्हेंबर 1960 (बगदाद)
  • मुख्य कार्यालय : व्हिएन्ना (ऑस्ट्रिया)
  • एकूण सदस्य : 18
  • उद्देश : खनिज तेल निर्माण करणार्‍या राष्ट्रांचे हितसंबंध जपणे.

6. एशियन (ASEAN) :

  • दक्षिण पूर्व आशिया खंडात येणार्‍या राष्ट्रामध्ये आर्थिक सुधारणा घडवून आणणे व स्थैर्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.
  • स्थापना : 8 ऑगस्ट 1967
  • मुख्यालय : जकार्ता (इंडोनेशिया)

7. आशियाई विकास बँक :

  • जपान, अमेरिका, भारत व इंग्लंड संस्थापक राष्ट्रांनी ही बँक स्थापन केली आहे.
  • स्थापना : 1966
  • मुख्यालय : मनिला (फिलिपाईन्स)
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.