भारतरत्न पुरस्कार विषयी माहिती

भारतरत्न पुरस्कार विषयी माहिती

 • भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो.
 • 1954 मध्ये हा सन्मान सुरू झाला. आतापर्यंत 45 जणांना हा पुरस्कार मिळाला आहे.
 • वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो.
 • पंतप्रधान भारतरत्नासाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात. इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते.
 • एका वर्षात तीन जणांना भारतरत्न देता येते.
 • भारतरत्न मिळालेल्या व्यक्तिला सनद (प्रमाणपत्र) व पदक दिले जाते.
 • राज्यघटनेच्या कलम 18 (1) अनुसार पुरस्कार हा नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो.
 • भारतरत्न सन्मान राष्टपतीच्या हस्ते सामान्यत: 26 जानेवारी रोजी प्रदान करतात.
You might also like
1 Comment
 1. आमसिद्ध says

  गणितातील चित्रकोडे स्पष्टीकरण हवे आहे

Leave A Reply

Your email address will not be published.