11 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

11 September 2018 Current Affairs In Marathi

11 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 सप्टेंबर 2018)

BHIM अॅप ऑफर:

  • BHIM अॅपद्वारे घरगुती विमान प्रवासाचं तिकीट बुक केल्यास तुम्हाला 5 हजार रुपयांची सूट मिळू शकते.
  • इंडिगो आणि गोएअर कंपनीने 20 लाख सीटसाठी सेल ऑफर सुरू केली आहे.
  • याशिवाय स्पाइस जेटचे तिकीट बुक केल्यावरही तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. तसंच, स्पाइस
  • जेटच्या वन वे ट्रिपवर 500 रुपये आणि राउंड ट्रीपवर 1000 रुपयांची सूट देखील तुम्ही मिळवू शकता.
  • यासाठी तुम्हाला केवळ भीम अॅपद्वारे तिकीट बुक करावं लागेल.
  • तर 31 डिसेंबरपर्यंत ही ऑफर आहे. पण, 1 ते 10 नोव्हेंबर आणि 31 डिसेंबर रोजी ही ऑफर मिळणार नाही.

अंध बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचे संजय कवळेकर विजेते :

  • गोव्याचे संजय कवळेकर यांनी येथील कालिकादेवी सभागृहात आयोजित पश्चिम विभागीय राष्ट्रीय मानांकित अंध बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपदाचा मान मिळविला. तर महाराष्ट्राचे अमित देशपांडे हे द्वितीय स्थानी राहिले.
  • नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि राष्ट्रीय दृष्टिहीन संघ यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सहा राज्यातील शंभरपेक्षा अधिकखेळाडूंनी सहभाग तर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे 25 पुरूष आणि पाच महिला खेळाडूंची गुजरात येथे 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रीय ब स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
  • त्यात महाराष्ट्राच्या अमित देशपांडे, सचिन वाघमारे, अमोल सकपाळ, विकास शितोळे, वैशाली सालावकर, अनिरूध्द खुंटे, दत्तात्रय वाडेकर, कार्तिक दामले, सुनील ससाणे, रोशन दिवारे, सतीश वाहुळे, आशिष रोकडे, तीजन गवर, शोभा
    लोखंडे, रितू टेंभूर्णीकर, मृणाली पांडे यांचा समावेश आहे.

‘मिस युनिव्हर्स’चं कर्करोगाने निधन :

  • बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने 1995 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा किताब पटकावलेल्या चेल्सी स्मिथच्या निधनावर शोक व्यक्त केला.
  • कर्करोगाने त्रस्त असलेल्या चेल्सीचं वयाच्या 45व्या वर्षी निधन झालं.
  • अमेरिकेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या चेल्सीने 1995 मध्ये ‘मिस युनिव्हर्स’चा मुकूट आपल्या नावावर केला होता.

‘बिम्सटेक’चा पहिला लष्करी युद्धसराव सुरू :

  • बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अ‍ॅण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी पुण्यात ‘मिलेक्स 18 हा पहिला लष्करी युद्धसराव घेण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ
    सोमवारी औंध येथील मिलिटरी स्टेशनवर मराठा लाइट इंन्फ्रटीचे प्रमुख मेजर जनरल संजीव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू झाला.
  • तर नेपाळने सरावात सहभागी न होण्याचा निर्णय ऐनवेळी घेतला.
  • तसेच बिम्सटेकच्या स्थापनेवेळी लष्करी सरावाचा करार झाला नव्हता. त्यामुळे यात सहभागी होऊ शकत नाही, असे नेपाळकडून सांगण्यात आले आहे. सरावात त्यांचे अधिकारी निरीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत.

दिनविशेष :

  • 11 सप्टेबर 1756 मध्ये होप हिरा चोरला गेला.
  • म. गांधींनी द. आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द 11 सप्टेमबर 1906 मध्ये पहिल्यांदा वापरला.
  • आझाद हिंद सेनेने जन गण मन 11 सप्टेबर 1942 मध्ये राष्ट्रगीत म्हणून गायले.
  • 11 सप्टेबर 1885 मध्ये इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.