सह्याद्रि पर्वत आणि पश्चिम घाट (Sahyadri Mountain and West Pier

सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

स्थान : महाराष्ट्राच्या पश्चिम भागातअरबी समुद्राला समांतर 40 ते 80 km. अंतरावर दक्षिनोत्तर सह्याद्रि पसरला आहे.

यालाच पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते.

विस्तार : उत्तरेस तापी नदीच्या खोर्‍यापासुन दक्षिणेस कन्याकुमारीपर्यन्त

लांबी : दक्षिणोत्तर = 1600 km., महाराष्ट्रातील लांबी = 440 km.

उंची : सरासरी उंची 900 ते 1200 मी.

उतार : या पर्वताचा पश्चिम उतार अतिशय तीव्र व पूर्व उतार एकदम मंद स्वरूपाचा आहे.

रुंदी : सह्याद्रीची रुंदी उत्तरेस जास्त व दक्षिणेस कमी आहे. तसेच उत्तरेस उंची जास्त व दक्षिणेस कमी आहे.

सह्याद्रि पर्वत :

सह्याद्रि पर्वताची निर्मिती ‘प्रस्तरभंग’ प्रक्रियेतून झाली. या प्रक्रियेत दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील भाग मोठ्या प्रमाणात खचला. त्याचबरोबर

पश्चिम किनारा व किनार्‍यालगतचा सागरतळ मोठ्या प्रमाणावर खचला.

स्थान : दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि.

यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.

सह्याद्रि पर्वतावरील भुरुपे :

सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत.

उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.

शिखरे (महाराष्ट्रातील) (उंचीनुसारक्रम) :

शिखर ———–ऊंची ———जिल्हा

 1. कळसूबाई—-1646मी. ——अहमदनगर
 2. साल्हेर ——1567मी.—— नाशिक
 3. महाबळेश्वर –1438मी.—— सातारा
 4. हरिश्चंद्रगड –1424मी. ——-नगर
 5. सप्तश्रुंगी —-1416मी.——- नाशिक
 6. तोरणा——-1404मी.——- पुणे
 7. अस्तंभा ——   –    ———नंदुरबार
 8. त्र्यमबकेश्वर- 1304मी.——- नाशिक
 9. तौला ——-1231मी. ——–नाशिक
 10. बैराट ——1177मी. ——–गविलगड टेकड्या अमरावती
 11. चिखलदरा –1115मी.——– अमरावती
 12. हनुमान—- 1063मी.——— धुले

किल्ले :

सह्याद्रि पर्वताच्या अनेक दुर्गम भागात घाटमाथ्यावर शिवाजी महाराज्यांच्या काळात किल्ले बांधले गेले.

 1. नाशिक : गाळणा, अलंग-कुलंग, मुंगी- तुंगी, चांदवड, साल्हेर-मुल्हेर, अंकाई-टंकाई, मदनगड-बीदनगड, घोडप.
 2. अहमदनगर: हरिश्चंद्रगड, रतनगड.
 3. पुणे : सिंहगड , पुरंदर, राजगड, तोरणा, विसापूर, राजमाची, शिवनेरी, वज्रगड, प्रचंडगड, लोहगड.
 4. कोल्हापूर : पन्हाळा, विशालगड, भुदरगड, गगनगड.
 5. सातारा : प्रतापगड, पांडवगड, अजिंक्यगड, सज्जनगड, वर्धनगड, कळमगड, वैराटगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड.

घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.

घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)

 1. मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर
 2. नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान
 3. कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत
 4. वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड
 5. कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर
 6. चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे
 7. सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर
 8. बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा
 9. मांजरसुभा घाट बीड बीड – नगर
 10. अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर
 11. ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण
 12. धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई
 13. बोर घाट पुणे पुणे – मुंबई
 14. ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा
 15. दिवा घाट पुणे पुणे – बारामती
 16. कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण
 17. आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी
 18. आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव
 19. फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी
 20. पसरणी घाट सातारा वाई – महाबळेश्वर

पठारे (थंड हवेचे ठिकाण)

सह्याद्रि पर्वताच्या व त्यांच्या शिखरांच्या काही भागात उंच ठिकाणी सपाट पठारी प्रदेश आहेत; त्यांनाच घाटमाथा असे म्हणतात.

ठिकाण जिल्हा पर्वतप्रणाली

 1. आंबोळी सिंधुदुर्ग सह्याद्रि
 2. महाबळेश्वर सातारा सह्याद्रि
 3. पाचगणी सातारा सह्याद्रि
 4. माथेरान रायगड सह्याद्रि
 5. पन्हाळा कोल्हापूर पन्हाळा डोंगर
 6. तोरणमाळ नंदुरबार तोरणमळा डोंगर
 7. चिखलदरा अमरावती गाविलगड टेकड्या
 8. नर्नाळा अकोला गाविलगड टेकड्या
 9. म्हैसमाळ औरंगाबाद वेरूळ डोंगर

सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व – पश्चिम दिशेत (वायव्य – आग्नेय)

A. सातमाळा – अजिंठा डोंगररांगा :

पूर्व – पश्चिम दिशेत

जिल्हा – नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.

उंची200 ते 300 मीटर

ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.

पश्चिमेकडील भागास‘सातमाळा’

पूर्वेकडील भागास‘अजिंठा’ म्हणतात.

या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्‍यात अजिंठा लेण्या आहेत.

या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.

 1. धुळे – गाळणा डोंगर
 2. नांदेड – निर्मल डोंगर
 3. औरंगाबाद – वेरूळ डोंगर
 4. हिंगोली – हिंगोली डोंगर
 5. नांदेड – मुदखेड डोंगर
 6. यवतमाळ – पुसद टेकड्या
 7. सातमाला – सप्तश्रुंगी(1416 मी. ), तौला – (1231 मी.), अंकाई – टंकाई – (961 मी.), सुरपालनाथ – (958 मी.),
 8. सतमाळा – (945 मी.)
 9. अजिंठा – शिरसाळा (885 मी.), बुलढाणा (546 मी.)
 10. पठार – मालेगाव व बुलढाणा पठार.

B. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर :

आग्नेय : वायव्य दिशेत.

जिल्हा : पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर.

नाणे घाटापासून(हरिश्चंद्र – 1424) पूर्वेकडे उंची कमी होत जाते. ही डोंगररांग पुढे आग्नेयेस हैद्राबादपर्यंत जाते.

पश्चिमेकडील भागात : हरिश्चंद्र गड व पूर्वेकडील भागास – बालाघाट.

या डोंगर रांगेत पुढील डोंगररांगांचा समावेश होतो.

अहमदनगर – हरिश्चंद्र डोंगर, पुणे – तसूमाई डोंगर, अहमदनगर – बाळेश्वर डोंगर इ.

बीड, लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यात बालाघाट डोंगर पसरली आहे.

बालाघाट डोंगर रांगेत तुळजाभवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर व नळदुर्ग येथे नळराजांनी बांधलेला किल्ला आहे.

C. महादेव डोंगर रांगा :

वायव्य ते आग्नेय दिशेत.

महाबळेश्वर – पाचगणीपासून आग्नेयेस.

आग्नेयकडे कर्नाटककाकडे कमी होते.

या डोंगररांगेत शंभू महादेवाचे पवित्र देवालय आहे. (शिखर शिंगनापुर)

या रांगेत पुढील डोंगर आहेत. सातारा -बामणोली, कर्हाड – आगाशीव डोंगर.

या रांगेत सासवड पठार, औंध पठार, खानापूर पठाराचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर

1) कोल्हापूर-पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर

2) नंदुरबार – सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर

3) अमरावती – गाविलगड टेकड्या व मेलघाट डोंगर

4) नागपूर – गरमसुर, अंबागड व मनसर टेकड्या

5) गडचिरोली – भामरागड, सुरजगड, चिरोली, चीमुर टेकड्या

6) भंडारा – दरेकसा, नवेगाव टेकड्या

7) गोंदिया – दरेकसा, नवेगाव टेकड्या

8) चंद्रपुर – चांदूरगड, पेरजागड.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.