राज्य सहकारी बँका

राज्य सहकारी बँका (State Co-operative Banks)

स्वरूप –

 • राज्य सहकारी बँक सहकारी त्रिस्तरीय रचनेच्या शिरोभागी असते. म्हणून तिला शिखर बँक असेही म्हणतात. ती एका बाजुला जिल्हा मध्य. बँका तर दुसर्‍या बाजुला RBI व NABARD यांच्यात दुव्याचे कार्य करते.

 

सदस्यत्व –

 • राज्यापरत्वे रा.स. बँकेची रचना वेगवेगळी आहे. मात्र साधारणपणे तिच्या सदस्यांमध्ये जि.म.स. बँकांचे प्रतिनिधी तसेच वैयक्तिक भागधारक यांचा समावेश होतो.

 

नियंत्रण –

 • रा.स. बँकांवर NABARD चे नियंत्रण असते. NABARD त्यांना 1. पुनर्वित्त पुरवठा करते, 2. पुनर्वटवणुकीच्या सोयी प्राप्त करून देते, 3. सहकारी चळवळीबद्दल महत्वाची माहिती पुरवते.

 

कार्ये –

 • 1. जि.म.स. बँकांना व त्यांच्या माध्यमातून प्राथमिक सहकारी संस्थांना वित्तपुरवठा करणे, तसेच त्यांच्या कार्याचे नियंत्रण व पर्यवेक्षण करणे.
 • 2. शिखर बँक शहरी भागातून ठेवी गोळा करून जि.म.स. बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात पसरविण्याचे कार्य करतात.
 • 3. शिखर बँकेला सामन्यत: व्यापारी बँक विषयक कार्ये करण्यास मनाई असते. मात्र सध्या (फेब्रुवारी 2010) 31 राज्य सह. बँकांपैकी 15 बँकांना रिझर्व्ह बँकेने व्यापारी बँक व्यवसायाचा परवाना दिला आहे.
 • 4. शिखर बँक जि.म.स. बँकांमधील समतोल राखणारे केंद्र (Balance Centre) म्हणून कार्य करते. काही जि.म.स. बँकांकडील अतिरिक्त निधी इतर गरजू जि.म.स. बँकांकडे वळविण्याचे कार्य ती करते. जि.म.स. बँकांना आपापसात कर्जे घेण्यादेण्यास संमती नाही.

 

भांडवल उभारणी –

 • स्वस्वामित्व निधी:यात भाग-भांडवल व राखीव निधीचा समावेश होतो. भाग-भांडवल पुरवठा सदस्य जि.म.स. संस्था, इतर सदस्य सह. संस्था, वैयक्तिक सदस्य व राज्य सरकारमार्फत केला जातो.
 • ठेवी: जि.म.स. बँका, सहकारी संस्था, व्यक्ती, स्थानिक संस्था इत्यादींच्या.
 • कर्जे: NABARD, SBI, व्यापारी बँका, राज्य सरकार इ. कडून मिळालेली.

 

विस्तार –

 • भारतात मार्च 2010 मध्ये 31 रा.स. बँका होत्या व त्यांच्या 986 शाखा होत्या. त्यांच्या एकूण ठेवी 68 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त होत्या.
 • महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक म्हणून कार्य करते. तिचा स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच 11 ऑक्टोबर, 1911 रोजी करण्यात आली होती. तिची चार प्रादेशिक कार्यालये आहेत – औरंगाबाद, नाशिक, पुणे व नागपूर. मार्च 2008 अखेर म.रा.स. बँकेचे 67,000 सभासद होते. तिच्या ठेवी 16,509 कोटी रुपये होते.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.