नवीन धार्मिक प्रवाहाबद्दल माहिती
नवीन धार्मिक प्रवाहाबद्दल माहिती
Must Read (नक्की वाचा):
जैन धर्माचा उदय :
- उत्तर वैदिक काळामध्ये यज्ञयागाच्या कर्मकांडामध्ये पूरोहित लोकांचे वर्चस्व वाढले आणि ज्ञानदानाचे हक्क मोजक्या लोकांच्या हातात आले.
- जातीव्यवस्था कठीण होत जावून उच्च-नीच्च भेदभाव सुरू झाला.
- व्यक्तीचा दर्जा हा कर्तव्यावर नसून जन्मावर असल्याची संकल्पना रूढ झाली. या कारणामुळे समाजव्यवस्थेतील बहुतांशी वर्ग हा ज्ञानापासून दूर ढकलला गेला.
- या वर्गाला अंधकारातून वर काढण्याचा पहिला प्रयत्न जैन धर्माने केला.
भगवान वर्धमान महावीर (इ.स.पूर्व 599 ते 527) :
- भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसावे तिर्थकर असून, त्याचा जन्म बिहारमधील कुंडग्राम येथे झाला.
- त्यांनी सर्व इंद्रियांवर ताबा मिळविला म्हणून त्यांना लोक जिन म्हणू लागले. ते स्थानिक अर्धमाधवी भाषेमध्ये धर्मप्रचार करू लागले.
- महावीरांना जातीभेदभाव मान्य नव्हता. यामुळे धर्मज्ञानापासुन दूर राहिलेले लोक त्याच्याकडे आकृष्ट होवून त्यांचे अनुयायी झाले.
जैन धर्माची शिकवण :
- पंचमहाव्रते (अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रम्हचर्य) आणि त्रिरत्न (सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान व सम्यक चारित्र) ही भगवान माहावीराच्या प्रवचनाची मुख्य तत्वे होती.
- या सर्वामध्ये त्यांनी अहिंसेला सर्वात जास्त महत्व दिले.
- आपले सर्व आयुष्य महावीरांनी सामान्य जनतेला उपदेश करण्यात घालविले त्याचे वयाच्या बहात्तराव्या वर्षी पावापुरी येथे निधन झाले.
गौतम बुद्ध (इ.स.पूर्व 533 ते 483) :
- बहुजन समाजाला यज्ञयागाच्या कर्मकांडापासून दूर नेणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. बौद्ध धर्माची स्थापना भगवान गौतम बुद्धाने केली.
- भगवान गौतम बुद्ध यांचे मूळ नाव सिद्धार्थ आहे. त्यांचा जन्म आजच्या नेपाळमध्ये असलेल्या लुंबिनी येथील राजघराण्यात झाला.
- संसारातील दुख:बघून त्यांनी राजघराण्याचा त्याग केला आणि ज्ञान प्राप्तीकरिता बाहेर पडले.
- बिहारमधील गया या ठिकाणी एका बोधीवृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्त झाले. तेव्हापासून ते बुद्ध म्हणून ओळखल्या जावू लागले.
धम्मचक्रप्रवर्तन :
- ज्ञान प्राप्तीनंतर भगवान गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसीजवळील सारनाथ येथे दिले. त्यांचे हे प्रवचन धम्मचक्रप्रवर्तन म्हणून ओळखले जाते.
- आपला उपदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा म्हणून त्यांना सामान्य लोकांना समजेल अशा पाली भाषेमध्ये प्रवचन दिले.
- सोपी भाषा आणि कर्मकांडाचा व जातीभेत नसल्यामुळे बहुजन समाज गौतम बुद्धाकडे आकर्षिला गेला.
बौद्ध धर्माची शिकवण :
- गौतम बूद्धांनी निर्मानाच्या प्राप्तीकरिता अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम आणि मादक पदार्थाचे सेवन करू नयेत या पंचशिलाचे पालन करण्यास संगितले.
गौतम बूद्धांनी दुख: निवारण्याकरिता अष्टांग मार्गाचे महत्व सांगितले.
बौद्ध संघ :
- जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला उपदेश पोहचावा म्हणून गौतम बूद्धांनी बौद्ध संघाची स्थापना केली. त्यांनी आपल्या बौद्ध संघामध्ये महिलांनाही सहभागी करून घेतले. यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला.
- बहुजन समाजाच्या हिताकरिता आयुष्य खर्च करणार्या या महान व्यक्तीचे इसनपूर्व 483 मध्ये निर्वाण झाले.