नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)
नाशिक प्रशासकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग 2)
- श्रीरामपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? – मोसंबी.
- भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे? – प्रवरानगर.
- प्रवरा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? – गोदावरी.
- रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – अहमदनगर.
- हरिषचंद्र डोंगररांग कोणत्या दोन जिल्ह्याच्या सीमेवरून जाते? – नगर व पुणे.
- नंदूरबार जिल्ह्यातून नर्मदा नदी किती कि.मी. वाहते? – 58 कि.मी.
- नंदुरबार जिल्ह्यातून जाणार्या पर्वत रांगेस काय म्हणतात? – तोरणमाळ पठार.
- तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? – नंदुरबार.
- जळगावला पूर्वी काय म्हणत असत? – पूर्व खानदेश.
- राज्यात सर्वाधिक आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आहे? – नंदुरबार.
- नाशिक जिल्ह्यातील कोणते गाव सूतगिरण्यासाठी प्रसिद्ध आहे? – मालेगाव.
- पितांबरासाठी प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील गाव कोणते? – येवले.
- नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? – नाशिक.
- भंडारदरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? – अहमदनगर.
- राळेगण सिद्धी हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? – अहमदनगर.
- आर्मड कोअर सेंटर कोठे आहे? – अहमदनगर.
- महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? – अहमदनगर.
- पोकरी औष्णिक वीज केंद्र कोठे आहे? – भुसावळ.
- मुंबई-हावडा ब्रॉडगेज कोणत्या जिल्ह्यातून जातो? – जळगाव.
- आदिवासी लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्याचा कितवा क्रमांक लागतो? – पहिला.
- कोणता जिल्हा रस्त्याच्या मार्गाने गुजरात व मध्यप्रदेश राज्यांशी जोडला आहे? – नंदुरबार.
- 6 व्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? – धुळे-नागपूर.
- मुंबई-आग्रा हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो? – धुळे.
- सूरत-धुळे-नागपूर हा माहामार्ग कोणत्या क्रमांकाचा आहे? – 6.
- राजवाडे वस्तुसंग्रहालय कोठे आहे? – धुळे.
- अस्थंबा शिखर कशासाठी प्रसिद्ध आहे? – अश्वथामाचे निवास.
- पोलिस उपनिरीक्षिक प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? – नाशिक.
- राष्ट्रीय महामार्ग क्र. 50 कोठून कोठे जातो? – पुणे-नाशिक.
- महाराष्ट्रात सुरू होणारा व महाराष्ट्रात संपणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता? – पुणे-नाशिक (क्र.50) न्हावासेवा-पळसपे (क्र.4ब), धुळे-सोलापूर (क्र.211).