नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग2)
नागपूर प्रशाकीय विभागाबद्दल माहिती (प्रश्न-उत्तर) (भाग2)
- खनिज कोळसा कोठे मिळतो? – भंडारा व गोंदिया.
- चंद्रपूर पेक्षा अधिक जंगलमय जिल्हा कोणता? – गडचिरोली.
- नागपूर टाईम्स हे दैनिक कोठून प्रसिद्ध होते? – नागपूर.
- ‘नागपूर पत्रिका’ हे नियतकालीक कोठून प्रसिद्ध होते? – नागपूर.
- रामटेक कोणत्या टेकड्यावर वसलेले आहे? – रामगिरी पर्वत.
- कालिदासाने मेघदुत काव्य कोठे लिहिले? – रामटेक.
- ब्राम्हण कालीन शिल्पकलेचा नमुना असलेली राम, लक्ष्मण, सीता यांची मंदिरे कोठे आहेत? – रामटेक.
- फ्यूअल इंस्टूमेंट अँड इंजिनियर्स लि. ही संस्था कोठे आहे? – पांढरकवढा.
- विकर पॉवर संस्था कोठे आहे? – आर्वी.
- नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज कोठे आहे? – नागपूर.
- भांदक बौद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत? – चंद्रपूर.
- उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे? – आर्वी.
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल कोठे आहे? – नागपूर.
- गांधीजीचा सेवाश्रम कोठे आहे? – वर्धा.
- विदर्भातील प्रमुख शैक्षणिक केंद्र कोणते? – नागपूर.
- महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कोठे आहे? – चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर येथे.
- जवसाचे तेल काढण्याच्या गिरण्या मुख्यत: कोणत्या विभागात आहेत? – नागपुर.
- महाराष्ट्रात कागद उद्योग कोठे विस्तारला आहे? – बल्लारपूर.
- मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे? – तुमसर.
- नागपूर जिल्ह्यात एकोडी कशासाठी प्रसिद्ध आहे? – रेशमी कापड.
- रेशमी कापडासाठी प्रसिद्ध असलेले सावली कोणत्या जिल्ह्यात आहे? – चंद्रपूर.
- महाराष्ट्रात कोणत्या नदीचे खोरे खनिज उत्पादनात मोठे आहे? – वर्धा नदी.
- महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी पितळी भांडी तयार केली जातात? – भंडारा.
- कंहान-रामटेक हा कोणत्या प्रकारचा मार्ग आहे? – ब्रॉडगेज.
- महाराष्ट्रात एक्स्प्रेस कोठून कोठे धावते? – गोंदिया-कोल्हापूर.
- विदर्भ एक्स्प्रेस कोणत्या शहरा दरम्यान धावते? – मुंबई-नागपुर.
- मद्रास-दिल्ली मार्गावर कोणते स्टेशन आहे? – वर्धा.
- धुळे-नागपूर-कलकत्ता महामार्ग किती क्रमांकाचा आहे? – सहा.
- वाराणसी-नागपूर-हैद्राबाद महामार्ग किती क्रमांकाचा आहे? – सात.
- नागपूर व भंडारा हे शहरे कोणत्या महामार्गावर आहेत? – मुंबई-कलकत्ता.
- खापरखेडा (नागपूर) येथे कोणते वीज निर्मिती केंद्र आहे? – औष्णिक.
- पेंच जलविद्युत केंद्र कोठे आहे? – नागपूर.
- सर्वाधिक विद्युत उत्पादन करणारा जिल्हा कोणता? – नागपूर.
- महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला पहिला जिल्हा कोणता? – वर्धा.
- चंद्रपूर, गडचिरोली येथे कोणती जमात आढळते? – गोंड.
- नागपूर परिसरात कोणत्या आदिवासी जमातीचे लोक आढळतात? – डोंब-कैकाडी.
- गोंड, मांडिया गोंड, कोंया व हळबा ह्या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात? – चंद्रपूर.
- तुमडी हा लोकनाट्य प्रकार कोणत्या भागात प्रिय आहे? – विदर्भ.
- सर्वात विरळ लोकवस्तीचा जिल्हा कोणता? – गडचिरोली.
- शेतमालाची प्रत व प्रमाणीकरण करणारी भारतातील संस्था कोठे आहे? – नागपूर.