पहिली पंचवार्षिक योजना (First Panchwarshik Scheme) Economics For MPSC Exams
कालावधी : 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956.
मुख्य भर : या योजनेचा भर कृषि क्षेत्रावर होता.
प्रतिमान : हेरोल्ड-डोमर चे प्रतिमान या योजनेत वापरण्यात आले.
योजनेचे उपनाव : पुंनरुस्थान योजना.
अपेक्षा वृद्धी दर : 2.1%.
प्रत्यक्षा वृद्धी दर : 3.6%.
प्रकल्प :
- दामोदर खोरे विकास प्रकल्प (झारखंड-प.बंगाल, दामोदर नदीच्या खोर्यात)
- भाक्रा-नानगल प्रकल्प (हिमाचल प्रदेश–पंजाब, सतलज नदी)
- कोसी प्रकल्प (बिहार, कोसी नदीवर)
- हिराकुड योजन(ओरिसा, महानदी)
कारखाने :
- सिंद्री (झारखंड) खत कारखाना
- चित्तरंजन (प.बंगाल) रेल्वे इंजिन कारखाना
- पेरांबूर (तमिळनाडू) रेल्वे डब्यांचा कारखाना
- HMT(बंगलोर)
- हिंदुस्तान (पिंपरी,पुणे)
मूल्यमापन :
- योजना सर्व बाबतीत यशस्वी झाली कारण, योजनेचा कालावधी मान्सूनला अनुकूल होता, योजनेची लक्षे कमी होती.
- अन्नधान्याचे उत्पादन 52.2 दशलक्ष टनावरून 65.8 दशलक्ष टनापर्यंत वाढले.
- मोठ्या प्रमाणावर जलसिंचन व ऊर्जेचा पायाभूत सोयींना सुरवात.
- राष्ट्रीय उत्पन्न 18% नी तर दरडोई उत्पन्न 11% नी वाढले.
विशेष घटनाक्रम :
- 8 मे, 1952 पासून ओधोगिक विकास व नियमन अधिवेशन 1951 लागू करण्यात आला.
- 2 ओक्टोंबर, 1952 रोजी सामुदायिक विकास कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली.
- हातमाग उधोगाचा विकास करण्यासाठी 1952 मध्ये अखिल भारतील हातमाग बोर्डची स्थापना करण्यात आली .
- 1955 मध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहणी समितीच्या शिफारसीनुसार (गोरवाल समिती) एम्पिरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये करण्यात आले.
- जानेवारी 1955 मध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (ICICI) स्थापन करण्यात आले, ज्याने मार्च 1955 मध्ये आपले कार्य सुरू केले.