TET परीक्षा Paper 1 Syllabus व महत्वाची माहिती
TET परीक्षा Paper 1 Syllabus व महत्वाची माहिती
परीक्षेचा दिनांक व पुनआर्ययोजना :
- राज्य सरकार मार्फत वर्षातून किमान एक वेळा या परीक्षेचे आयोजन केले जाईल. या संदर्भातील जाहिरात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत प्रकाशित केली जाईल.
- निश्चित दिनांकास परीक्षेचे आयोजन करून 60% व त्यापेक्षा अधिक गुण मिळवणार्या सर्व परिक्षार्थीना प्रमाणपत्र देण्यात येईल ज्याच्या आधारे उमेदवार रिक्त जागी नोकरीसाठी अर्ज करू शकतील.
परीक्षेसाठी अर्ज :
- अर्ज जमा करण्यासंदर्भातील सर्व माहिती विविध स्तरांवरील वर्तमानपत्रांतून, रोजगार पत्रीकांतून प्रकाशित केली जाते.
- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने प्रकाशित केलेल्या प्रकटनानुसार शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दिनांक 14 डिसेंबर 2014 रोजी केलेले आहे.
परीक्षेसाठी आवश्यक पात्रता : (इयत्ता 1 ली ते 5 वी साठी)
- मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यतापात्र संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदविका (उदा. डी.टी.एड) उत्तीर्ण
किंवा
- राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (NCTE) च्या परिपत्रकानुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान 45% गुणांसह उच्च माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षांची पदविका.
किंवा
- मान्यताप्राप्त मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेची चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (BE.Ed.)
किंवा
- मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किमान 50% गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षांची पदविका (विशेष शिक्षण)
किंवा
- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मयताप्राप्त संस्थेची दोन वर्षांची पदविका उत्तीर्ण
किंवा
- शासन निर्णय शिक्षण व क्रिडा विभाग क्र.टी.सी.एम.-2009/36/09 माशि-4 दि.10 जून 2010 अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील (Horticulture and Crop Science) आणि आरोग्य वैधकीय सेवागटातील (Crench and Pre School Management) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण संस्थेची शिक्षणशास्त्रात दोन वर्षांची पदविका.
पात्रता गुणांचे निकष व सुट :
- सर्वसामान्य गटातील उमेदवारांना या परीक्षेमध्ये पात्र होण्यासाठी किमान 60% गुण (म्हणजे 150 पैकी 90 गुण) (इयत्ता 1 ते 5) व (6 ते 8 साठी) घेणे अनिवार्य राहील.
तथापि
- अनुसुचीत जाती/अनुसुचीत जमाती/विमुक्त व भटक्या जमाती/इतर मागास वर्ग/शारीरिक अपंग इत्यादी प्रवर्गाच्या उमेदवारांना पात्रता गुणांमध्ये 5% सुट देण्यात येईल म्हणजेच उत्तीर्णते साठी 55% गुण (150 पैकी 83 गुण) अनिवार्य राहतील.
- परीक्षा कोणामार्फत आयोजीत केली जाईल ?
- महाराष्ट्र राज्यकरिता शिक्षक पात्रता परीक्षा घेणे व प्रमाणपत्र प्रदान करण्याची जबाबदारी ‘महाराष्ट्र राज्य परीक्षा पुणे’ यांच्यावर सोपवलेली आहे.
प्रश्नपत्रिका आराखडा व प्रश्नांचे स्वरूप:
- पेपर 1 : (इयत्ता 1 ते 5)
- एकूण गुण : 150
- कालावधी : 2 तास 30 मिनीटे
अ.क्र. | विषय (सर्व अनिवार्य) | गुण | प्रश्नसंख्या | प्रश्नांचे स्वरूप |
1. | बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र | 30 | 30 | बहुपर्यायी |
2. | भाषा – 1 | 30 | 30 | बहुपर्यायी |
3. | भाषा – 2 | 30 | 30 | बहुपर्यायी |
4. | गणित | 30 | 30 | बहुपर्यायी |
5. | परिसर अभ्यास | 30 | 30 | बहुपर्यायी |
एकूण | 150 | 150 | 150 | 150 बहुपर्यायी प्रश्न |
- नकारात्मक गुणदान योजना आहे का ?
- या परीक्षेमध्ये नकारात्मक गुणांची तरतुद नाही (minus system).
- विषय निहाय अभ्यासक्रम कोणता आहे ?
1. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र : या विषयाचा अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र व 6 ते 14 वयोगटाच्या विध्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील याच वयोगटातील विशेष गरज असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये यांवर आधारित असतील. (शिक्षण पदविका अभ्यासक्रम-पाठ्यक्रमाधारित.)
2. भाषा – 1 इयत्ता 1 वी ते 5 वी चा प्रचलित अभ्यासक्रम
3. भाषा – 2 इयत्ता 1 वी ते 5 वी चा प्रचलित अभ्यासक्रम
4. गणित : गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्यांवर आधारित असेल. गणित विषयाची व्याप्ती इयत्ता 1 ते 5 वी च्या प्रचलित अभ्यासक्रमावरील असेल.
5. परीसर अभ्यास : परीसर अभ्यासारखे प्रश्न इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबोध व अध्यापनशास्त्रीय ज्ञान यावर आधारित. इयत्ता- 3 ते 5 चा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान पाठ्यक्रम.