11 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

प्रोजेक्ट चीता ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले:
प्रोजेक्ट चीता ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले:

11 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2020)

अंदमान व निकोबारमधील सागराखाली फायबर प्रकल्प सुरू:

  • अंदमान व निकोबारमधील सागराखाली उभारण्यात आलेल्या ‘ऑप्टिकल फायबर प्रोजेक्ट’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. यामुळे अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील ब्रॉडबँड सेवेचा वेग वाढणार आहे.
  • 30 डिसेंबर 2018 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी 2312 कि.मी. अंतराच्या सागरांतर्गत ऑप्टिकल फायबर प्रोजेक्टची पायाभरणी केली होती. त्यामुळे चेन्नई, अंदमान व निकोबर बेटे एकमेकांशी इंटरनेटने जोडली जाणार आहेत.
  • 224 कोटींचा हा प्रकल्प असून पोर्ट ब्लेअरशिवाय स्वराज द्वीप (हॅवलॉक) लाँग आयलंड,रंगाट, लिटल अंदमान,कमोरटा, कार निकोबार व ग्रेटर निकोबार ही ठिकाणे जोडली जाणार आहेत.
  • ग्रेट निकोबार येथे 10 हजार कोटींचे ट्रान्सशीपमेंट बंदर उभारण्याचा प्रस्ताव असून स्वराज द्वीप, शहीद द्वीप व लाँग आयलंड यासह काही ठिकाणी एरोड्रोम सुविधा देण्यात येणार असून कोची शिपयार्ड बेटांवरील वाहतूक वाढवण्यासाठी चार जहाजे देणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2020)

पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे:

  • एकाच नोकरीत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यासच सध्या ग्रॅच्युईटीचा फायदा कर्मचाऱ्यांना मिळतो. मात्र, सरकारने आता या नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे.
  • या नव्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे.
  • सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, नोकऱ्यांमध्ये असुरक्षितता आणि अन्य कारणांमुळे लोक कायम नोकऱ्या बदलत राहतात. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांचा नियम व्यवहारिक म्हणता येणार नाही.
  • मिंट या वेब पोर्टलच्या वृत्तानुसार, अनेक वर्षांपासून ग्रॅच्युईटीचा नियम बदलण्याची मागणी होत आहे. यावर सरकारने आता विचार सुरु केला आहे.
  • ग्रॅच्युईटीनुसार, कर्मचारी जितकी वर्ष एकाच संस्थेत काम करतो तितक्या वर्षांसाठी प्रत्येक महिन्यातील 15 दिवसांचा पगार त्यांला ग्रॅच्युईटी म्हणून दिला जातो.

प्रोजेक्ट चीता ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले:

  • सैन्य दलांकडून हेरॉन ड्रोनला लेझर गाइडेड बॉम्ब, रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र अशा घातक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्याची मागणी होत आहे.
  • बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या ‘प्रोजेक्ट चीता’ला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्यात आले आहे.
  • या प्रोजेक्ट अंतर्गत सरकारला 3500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘प्रोजेक्ट चीता’ अंतर्गत तिन्ही सैन्य दलांच्या 90 हेरॉन ड्रोन्सना अपग्रेड करण्याची योजना आहे.
  • यामध्ये हेरॉन ड्रोनला लेझर गाइडेड बॉम्ब, हवेतून जमिनीवरील लक्ष्यावर अचूक प्रहार करणारे मिसाइल आणि रणगाडाविरोधी मिसाइल्सनी सुसज्ज करण्याची योजना आहे”
  • शत्रूच्या ठिकाणांवर, हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच हेरॉन ड्रोन्स गरज पडल्यास हल्ला करण्यासही सक्षम असले पाहिजे असे सशस्त्र दलांनी प्रस्तावामध्ये सुचवले आहे.

 अनंतपद्मनाभन यांचा आयसीसी’च्या पंच समितीतसमावेश:

  • केरळचे माजी फिरकीपटू आणि पंच के. एन. अनंतपद्मनाभन यांचा ‘आयसीसी’च्या आंतरराष्ट्रीय पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला आहे.
  • ‘आयसीसी’च्या पंचांच्या समितीत स्थान मिळवणारे अनंतपद्मनाभन हे चौथे भारतीय पंच ठरले आहेत. सी. शामशुद्दीन, अनिल चौधरी आणि विरेंदर शर्मा यांचा यापूर्वी पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला होता.
  • 50 वर्षीय अनंतपद्मनाभन यांनी ‘आयपीएल’ तसेच अनेक स्थानिक स्पर्धामध्ये पंच म्हणून भूमिका बजावली आहे.

RIS ने सुचवले चांगले पर्याय- 327 वस्तुंसाठी चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही:

  • चीनकडून भारत आयात करत असलेल्या वस्तूंमधील तीन चतु्र्थांश किंवा 327वस्तू यांची पर्यायी आयात शक्य आहे.
  • या 327 वस्तुंमध्ये मोबाइल फोन्स, टेलिकॉम उपकरणे, कॅमरा, सौर पॅनल, एसी, पेनिसिलन औषधांचा समावेश होतो.
  • चीनकडून होत असललेल्या एकूण आयातीमध्ये या 327 वस्तुंचा तीन चतुर्थांश वाटा आहे. आरआयएसनुसार या 327 वस्तुंची चीन व्यतिरिक्त अन्य देशांकडून पर्यायी आयात शक्य आहे तसेच भारतातही याचे उत्पादन केले जाऊ शकते.
  • भारतात चीनमधून एकूण 4044 उत्पादने आयात केली जातात. यात 3326 अशी उत्पादने आहेत, ज्यात फार स्पर्धा नाहीय. पण 327सेंसिटिव उत्पादने आहेत.
  • एकूण आयातीमध्ये सेंसिटिव उत्पादने फक्त 10 टक्के आहेत. 76 टक्के सेंसिटिव प्रोडक्टमध्ये मशीन किंवा केमिकलचा समावेश होतो.

दिनविशेष :

  • सन 1943 मध्ये सी.डी. देशमुख हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया चे पहिले भारतीय गव्हर्नर झाले.
  • दादरा व नगर हवेली हा भाग सन 1961 मध्ये भारताचा केन्द्रशासित प्रदेश बनला.
  • सन 1999 बारा वर्षाखालील मुलांच्या राज्यस्तरीय जलद बुद्धीबळ स्पर्धेत नवी दिल्ली येथील सहा वर्षे वयाच्या ‘परिमार्जन नेगी‘ याने विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा जिंकणारा सर्वात छोटा खेळाडू ठरला.
  • डॉ. सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या जनता पक्षाचे 11 ऑगस्ट 2013 मध्ये भारतीय जनता पक्षात विलीनीकरण झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 ऑगस्ट 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.