Current Affairs of 1 April 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 एप्रिल 2016)

पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी रश्मी शुक्ला :

  • राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांची पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • याआधीचे पोलिस आयुक्त तथा पोलिस महासंचालक के.के. पाठक हे (31 मार्च) निवृत्त झाले.
  • रश्मी शुक्ला या सन 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागात सहआयुक्त तसेच आयुक्तपद भूषविले आहे.
  • मुंबई पोलिस दलातही त्यांनी वेगवेगळया पदांवर कर्तव्य बजावले असून एक शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांची पोलिस दलामध्ये ओळख आहे.
  • पुण्याच्या पोलिस आयुक्त होण्याचा मान मिळवणार्‍या रश्मी शुक्ला या दुसर्‍या महिला पोलिस अधिकारी आहेत.
  • तसेच यापूर्वी पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर यांनी पुण्याचे पोलिस आयुक्तपद भूषवले.
  • आयुक्त रश्मी शुक्ला यांचे भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 मार्च 2016)

आता रेल्वेचे आरक्षित तिकीट फोनवर रद्द करता येणार :

  • 1 एप्रिलपासून केवळ एका फोनवर आरक्षित तिकीट रद्द करता येणे शक्य होणार आहे.
  • फोनद्वारे तिकीट रद्द करण्यासाठी प्रवाशांना 139 क्रमांकावर फोन करावा लागेल.
  • तसेच त्यानंतर आरक्षित तिकिटाची संपूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवाशांना एक पासवर्ड मिळेल.
  • पासवर्ड मिळाल्यानंतर त्याच दिवशी तिकीट काउंटरवर जाऊन तो पासवर्ड सांगितल्यानंतर तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत.
  • रेल्वे तिकिटांचा काळा-बाजार करणाऱ्यांना पायबंद घालण्यासाठी प्रवासभाड्याच्या नियमांमध्ये बदल केले होते.
  • मात्र गरजू प्रवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता, त्यामुळेच आता रेल्वे तिकीट रद्द करण्यासाठी 139 क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

आरोग्य सुविधांसाठी टाटा ट्रस्टशी सामंजस्य करार :

  • दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुपोषण निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनटाटा ट्रस्ट यांच्यात (दि.31 मार्च) विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या उपस्थितीत विधान भवनात नऊ सामंजस्य करार करण्यात आले.
  • वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड तयार करण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्करोगाचे अत्याधुनिक पद्धतीने निदान व उपचार उपलब्ध होणार आहेत.
  • बोनमॅरो रजिस्ट्री स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल, त्यामुळे रक्ताचा कर्करोग, सिकलसेल, थॅलेसेमिया अशा स्वरूपाच्या दुर्धर आजारांच्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल.
  • महाराष्ट्र राज्य औषध पुरवठा महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने लागणारे सर्व तांत्रिक व व्यवस्थापकीय सहाय्य टाटा ट्रस्ट उपलब्ध करून देणार आहे.

राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात वाढ :

  • सफाई कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय आयोगाच्या कार्यकाळात 31-03-2016 च्या पुढे तीन वर्षांची वाढ करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
  • तसेच वाढीव तीन वर्षाच्या कालावधीसाठी सुमारे 13.08 कोटी रुपये एकूण खर्च अपेक्षित आहे.
  • सफाई कर्मचारी तसंच मैला वाहून नेण्याशी संबंधित व्यक्तींना या प्रस्तावाचा लाभ होणार आहे.
  • सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी हा आयोग सरकारला शिफारसी करण्याबरोबरच सध्याच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे मूल्यमापन आणि त्यांचा अभ्यासही करतो.

स्वच्छ भारत मोहिमेला जागतिक बॅंकेची मदत :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहीम या कार्यक्रमाला चालना देण्यासाठी जागतिक बॅंक 1.5 अब्ज डॉलरची (सुमारे 10 हजार कोटी रुपये) मदत करणार आहे.
  • जागतिक बॅंक कर्जाच्या रूपाने ही मदत करणार असून, केंद्र सरकारबरोबरच्या करारावर सह्याही झाल्या.
  • 2019 पर्यंत उघड्यावरील शौचाची समस्या संपविण्याच्या हेतूने बॅंकेने सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
  • जागतिक बॅंक काही राज्य सरकारांना तांत्रिक सहकार्य म्हणून 2.5 कोटी डॉलर (सुमारे 160 कोटी रुपये) देणार आहे.
  • जागतिक बॅंकेचे भारतातील संचालक ओन रूहल व अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक विभागाचे सहसचिव राज कुमार यांनी (दि.30) या संदर्भातील करारावर सह्या केल्या.
  • स्वच्छ भारत अंतर्गत पाच वर्षांदरम्यान ग्रामीण विकासावर ही रक्कम खर्च केली जाईल.

रेडीरेकनरमध्ये 7 टक्के वाढ :

  • राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात फार वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
  • शहर आणि ग्रामीण भागात जागा खरेदी करण्यासाठी शासनातर्फे रेडिरेकनर दरात केवळ 7 टक्के वाढ करण्यात आल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
  • राज्यातील वेगवेगळ्या भागातून रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात अनेक तक्रारी सरकारडे दाखल झाल्या आहेत.
  • 2010 साली या दरात 14, 2011-18, 2013-27 आणि 2014-22 टक्के असा वाढविला होता.

दिनविशेष :

  • 1578 : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे यांचा जन्म.
  • 1882 : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.
  • 1889 : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक यांचा जन्म.
  • 1920 : पंडित रविशंकर यांचा जन्म.
  • 1933 : भारतीय विमानदलाची स्थापना.
  • 1935 : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
  • 1941 : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.
  • 1969 : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.
  • 2004 : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 एप्रिल 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

9 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago