Current Affairs of 8 September 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (8 सप्टेंबर 2016)

व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर :

  • भारतात सुलभतेने व्यवसाय करण्याच्या मुद्यावर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वोच्च स्थानी आहे.
  • सिंगापुरातील एशिया काँपिटिटिव्ह इन्स्टिट्यूटने (एसीआय) यासंबंधी अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली.
  • व्यवसाय सुलभता, स्पर्धात्मकता, थेट विदेशी गुंतवणूक इ. अनेक पैलूंच्या बाबतीत राज्यांचा अभ्यास करण्यात आला.
  • विशेष म्हणजे या सर्वच बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे दिसून आले.
  • एसीआयचे रिसर्च फेलो शशिधरन गोपालन यांनी सांगितले की, भारतातील 21 राज्यांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास यात करण्यात आला.
  • अभ्यासातील निष्कर्षानुसार, व्यवसाय सुलभतेच्या बाबतीत महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली एनसीआर, गोवा आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये आघाडीवर आहेत.
  • स्पर्धात्मक वातावरणाच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, गुजरात आणि कर्नाटक ही राज्ये आघाडीवर आहेत.
  • थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र, दिल्ली एनसीआर, तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक ही पाच राज्ये आघाडीवर आहेत.

गुगल विकसित करणार ‘भारत सेव्ह्ज’ वेबसाईट :

  • प्रख्यात अमेरिकी कंपनी गुगल ‘भारत सेव्ह्ज’ या नावाची वेबसाईट तयार करणार आहे.
  • तसेच या वेबसाईटवर भारतातील वित्तीय नियोजनाची सर्व प्रकारची माहिती असेल.
  • भारतात गुगलचा मोठा विस्तार आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
  • आपली वेबसाईट कंपनी भारत सरकारच्या वित्तीय जन-धनसारख्या योजनांशी जोडणार आहे.
  • 2014 रोजी सुरू करण्यात आलेल्या जन-धन योजने24 कोटी नवी बँक खाती उघडण्यात आली आहेत, तसेच 41 हजार कोटी रुपये बँकांत जमा झाले आहेत.
  • वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यासंदर्भात गुगल सध्या सरकारशी चर्चा करीत आहे.
  • कंपनीच्या प्रस्तावावर सरकार विचार करीत आहे. या प्लॅटफॉर्ममुळे वित्तीय साक्षरता निर्माण होण्यास मदत होईल, तसेच वित्तीय योजनांची माहिती मिळण्यास मदत होईल.
  • गुगलच्या प्रवक्त्याने सांगितले की, पंतप्रधानांच्या व्यापक वित्तीय दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या अनेक संस्था आणि औद्योगिक संघटना या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी एकत्र येत आहेत.
  • वित्तीय साक्षरता आणि जाणीव जागृती मोहीम या योजनेचा भागच असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लाओसच्या दौर्‍यावर :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशियन-भारत आणि पूर्व अशिया शिखर परिषदेसाठी (दि.7) येथे आगमन झाले.
  • दक्षिणपूर्व अशियातील या देशांशी भारताचे व्यापारी आणि सुरक्षेचे करार या दौऱ्यात अधिक बळकट केले जातील.
  • मोदी यांची लाओशियन पंतप्रधान थोंगलोऊन सिसौलिथ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहे.
  • तसेच या चर्चेत दहशतवाद, सागरी सुरक्षा, विभागीय सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी आणि अशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य आदींवर चर्चा होईल.
  • 21 सदस्यांच्या खास अशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य गटात समावेश करून घेण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

इस्लामीचा नेता मीर कासीम अली याला फाशी :

  • जमात-इ-इस्लामी या मूलतत्त्ववादी पक्षाचा नेता मीर कासीम अली याला ढाका येथे फाशी देण्यात आली.
  • 1971 मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामावेळी करण्यात आलेल्या मानवतेविरोधातील गुन्ह्यांच्या आरोपांतर्गत अलीला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
  • सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली होती.
  • जमात-इ-इस्लामी या पक्षासाठी आर्थिक पाठबळ जमविणाऱ्या मुख्य नेत्यांमध्ये अलींचा समावेश होता.
  • तसेच यापूर्वी या पक्षाचा प्रमुख निझामी याच्या दोन निकटवर्तीयांचा अशा स्वरुपाच्या दयेचा अर्ज बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी फेटाळून लावला असून त्यांना गेल्या वर्षी (2015) मृत्युदंड देण्यात आला आहे.

दिनविशेष :

  • 1918 : डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्मदिन.
  • 1926 : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
  • 1933 : आशा भोसले, भारतीय पार्श्वगायक यांचा जन्मदिन.
  • 1997 : डॉ. श्रीमती कमला सोहोनी, भारतातील पहिल्या महिला जैवरसायन शास्त्रज्ञ व आहारतज्ञ स्मृतीदिन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

9 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

9 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago