चालू घडामोडी (5 मार्च 2016)
दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर :
- ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांना (दि.4) प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला.
- सुवर्ण कमळ, दहा लाख रुपये रोख आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
- ‘हरियाली और रास्ता’, वो कौन थी, हिमालय की गोदमे, दो बदन, उपकार, पत्थर के सनम, पूरब और पश्चिम, शहीद, रोटी कपडा और मकान आणि क्रांती हे त्यांचे गाजलेले काही चित्रपट.
- चित्रपट सृष्टीत सर्वात मानाच्या पुरस्कारांपैकी हा एक पुरस्कार आहे.
- मनोज कुमार यांचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या अबोटाबादमध्ये 1937 मध्ये झाला.
- हरिकृष्ण गिरी गोस्वामी हे त्यांचे पूर्ण नाव आहे, ‘कांच की गुडिया’ याद्वारे त्यांनी 1960 मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
- ‘उपकार’ या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
- तसेच 1992 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानीत करण्यात आले होते.
सेतू भारतम प्रकल्पाचे उद्घाटन :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.4) महत्त्वाकांक्षी ‘सेतू भारतम्’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.
- किमान 50 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 2019 पर्यंत सर्व राष्ट्रीय महामार्ग रेल्वेक्रॉसिंगपासून मुक्त केले जातील.
- तसेच या प्रकल्पांतर्गत एकूण 208 मार्गांवरील पूल उभारले जाणार असून, महाराष्ट्रातील 12 पुलांचा त्यात समावेश आहे.
- विदर्भातील नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर क्षेत्रातील सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर-गोंडखैरीसह 6 मार्गांचा त्यात समावेश आहे.
- केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
- देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर रस्त्यांचा विकास अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
- रेल्वेमार्गावर क्रॉसिंग पूल तसेच आवश्यकता असेल तेथे अंडरब्रीज उभारण्यासाठी ‘सेतू भारतम्’ योजना तयार करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणार :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षी लवकरच इस्त्राएलला भेट देणार आहेत, गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्त्राएलला भेट दिली होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्या देशाच्या दौऱ्यावर गेले होते.
- नरेंद्र मोदी हे इस्त्राएलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.
- डेविड ओकोव आणि उपवाणिज्य दूत निमरोद असुलिन यांनी (दि.4) लोकमच्या मुंबई कार्यालयाला भेट दिली.
- तसेच त्यावेळी त्यांनी भारत-इस्त्राएल संबंध आणि महाराष्ट्र-इस्त्राएल सहकार्य याविषयी सविस्तर चर्चा केली.
- कृषी, वाहननिर्मिती अशा अनेक क्षेत्रात येत्या काही वर्षांत दोन देशांतील कंपन्यांमध्ये आपणास सहकार्य पाहायला मिळू शकेल.
- भारतासारख्या देशाशी चांगले संबंध असणे इस्त्राएलला आवश्यक वाटत आहे, असे सांगताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील चांगल्या बदलांचा आणि आर्थिक विकास दराच्या वाढीचा आवर्जून उल्लेख केला.
अशोक सराफ यांना नाट्य परिषदेचा पुरस्कार :
- नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार अभिनेते अशोक सराफ यांना तर नाट्यलेखक जयंत पवार यांना वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार जाहीर झाला आहे.
- ज्येष्ठ लेखिका सुषमा अभ्यंकर यांना बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.
- 27 मे रोजी नाशिकमध्ये पुरस्कार वितरण होईल.
- कानेटकर व शिरवाडकर पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी 25 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र, तर सावंत पुरस्काराचे स्वरूप 5 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे आहे.
- पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकरांपासून मधुकर तोरडमल हे शिरवाडकर लेखन पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
- ततसेच डॉ. श्रीराम लागूंपासून प्रशांत दामले हे कानेटकर रंगकर्मी पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी नटराजन चंद्रशेकरन :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.4) रिझर्व्ह बँकेच्या संचालकपदी तीन जणांच्या नियुक्त्या केल्या.
- मंत्रिमंडळाच्या नियुक्त्या विषयक समितीने (एसीसी) या तिघांच्या नावांना मंजुरी दिलेली आहे.
- नवनियुक्त संचालकांमध्ये टाटा कन्सल्टन्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक नटराजन चंद्रशेकरन, महिंद्रा अँड महिंद्राचे अ-कार्यकारी चेअरमन भारत दोषी आणि सुधीर मंकड यांचा समावेश आहे.
- तसेच ते रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर बोर्डावर जातील, त्यांची नियुक्ती अर्धवेळ असून बिगर सरकारी संचालक म्हणून ते रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय बोर्डावर चार वर्षांसाठी काम पाहतील.
- चंद्रशेकरन आणि भारत दोषी यांना उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधी म्हणून बोर्डावर घेण्यात आले आहे.
- सुधीर मंकड हे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी असून 2005 मध्ये मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा ते त्या राज्याचे मुख्य सचिव होते.
पहिली कर्करोग प्रतिबंधक लस विकसित :
- कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याची शास्त्रज्ञांनी सांगितली आहे.
- तसेच ही लस शरीरातील इम्यून सिस्टिम सक्रिय करेल व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोगाच्या गाठी नष्ट होतात.
- या लसीचा प्रयोग कर्करोग झालेल्या एका महिलेवर करण्यात आला आहे.
- एखाद्या रुग्णाला लस दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे, रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कर्करोगाचा नायनाट करण्याचे या संशोधनामागे सूत्र आहे.
- या लसीत एक खास प्रकारचे प्रोटीन एन्झाईम असून तो कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो.
- तसेच या इंजेक्शनमुळे शरीरात अशा अॅन्टीबॉडिज बनतील की त्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतील.
दिनविशेष :
- समता दिन
- 1931 : महात्मा गांधीजीनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा