Current Affairs of 31 August 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2015)

डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या :

  • ज्येष्ठ कन्नड साहित्यिक, स्पष्टवक्‍ते आणि पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या केली.
  • ते 77 वर्षांचे होते.
  • डॉ. कलबुर्गी हे कन्नड साहित्य विश्‍वातील महत्त्वाचे लेखक होते.
  • त्यांच्या पुस्तकांना राज्य आणि केंद्र साहित्य अकादमीचे पुरस्कार लाभले आहेत.
  • डॉ. कलबुर्गी यांच्या “मार्ग 4” या संशोधनात्मक लेखांच्या पुस्तकाला 2006 या वर्षीचा केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला होता.
  • याशिवाय त्यांना राज्य साहित्य अकादमी, पंप पुरस्कार आणि यक्षगान पुरस्कार लाभला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 ऑगस्ट 2015)

“रामचरितमानस”च्या डिजिटल कॉपीचे उद्‌घाटन :

  • प्रसारभारतीने तयार केलेल्या “रामचरितमानस”च्या डिजिटल कॉपीचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
  • संत तुलसीदासांच्या या रामचरित्राचे गायन भोपाळ घराण्याच्या दिग्गज गायकांनी केले असून, गेल्या अनेक वर्षांपासून ते आकाशवाणीवर प्रसारित होत आहे.
  • आकाशवाणी भोपाळने 1980 मध्ये तत्कालीन स्टेशन संचालक समर बहादूर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम रामचरितमानसचे रेकॉर्डिंग केले.

भूसंपादन विधेयकाचे नव्याने अध्यादेश जारी करणार नसल्याचे जाहीर :

  • वादग्रस्त भूसंपादन विधेयकाची मुदत सोमवारी संपत असल्याने आता सरकार त्याबाबत नव्याने अध्यादेश जारी करणार नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आकाशवाणीवरील ‘मन की बात’मध्ये जाहीर केले.
  • शेतकऱ्यांच्या भल्यासाठी या विधेयकामध्ये विविध सूचनांचा समावेश करण्याची सरकारची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी 13 नियम आजपासून लागू होणार आहेत.

कनिष्ठ स्तरावरील पदांसाठी मुलाखती बंद :

  • काही सरकारी पदांसाठी मुलाखती घेण्याची प्रथा बंद करण्यात येईल त्यात विशेषत कनिष्ठ स्तरावरील पदांचा समावेश असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात सांगितले.
  • त्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणातही ही घोषणा केली होती.

घरगुती वापराचा गॅस ऑनलाइन बुकिंग :

  • ग्राहकांना आता घरगुती वापराचा गॅस ऑनलाइन बुक करता येणार असून, त्यासाठीचे पैसेही ऑनलाइनच भरता येतील.

  • “सहज” या उपक्रमान्वये केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या ऑनलाइन सेवेला प्रारंभ करण्यात आला.
  • केंद्र सरकारच्या mylpg.in या वेबपोर्टलवरून ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

लाईट एमिटिंग डायोडची किंमत कमी करणारे तंत्रज्ञान :

  • एलईडी दिव्यांचा वापर दिवसेंदिवस वाढत असतानाच आता वैज्ञानिकांनी या दिव्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाईट एमिटिंग डायोडची किंमत कमी करणारे तंत्रज्ञान शोधले आहे.
  • नवीन एलईडीमधील हे प्रकाशोत्सर्जक डायोड हे कार्बन व अकार्बनी पदार्थाचे बनलेले आहेत.
  • या संशोधनात भारताचे गणेश बडे, शिन शान व जुनकिआंग या फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांचा समावेश आहे.
  • अ‍ॅडव्हान्स्ड मटेरियल्स या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.
  • संशोधनाची वैशिष्टय़े
  • एलईडीमध्ये रासायनिक पदार्थाचा एक थर पुरेसा
  • उत्पादन खर्च कमी होणार
  • आताच्या एलईडीपेक्षा प्रक्रिया सोपी
  • भारतीय संशोधक गणेश बडे यांचाही सहभाग

मंगळ ग्रहावर राहण्याचा सराव सुरू :

  • अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था “नासा”ने मंगळ ग्रहावर राहताना येऊ शकणाऱ्या अडचणींची प्राथमिक माहिती घेण्यासाठी एक सराव सुरू केला आहे.

  • हवाई बेटांवरील एका मृत ज्वालामुखीजवळ एक तंबू उभारून “नासा”मधील शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ तब्बल एक वर्ष येथे राहणार आहेत.
  • इतका काळ अशा प्रकारचा सराव करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.
  • मंगळावर प्रत्यक्ष मानवाला पाठविण्याच्या मोहिमेची तयारी “नासा” करत आहे.
  • त्याचाच एक भाग म्हणून “नासा”च्या शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांचा सहा जणांचा गट ज्वालामुखीजवळील निर्जन भागात तंबू ठोकून राहणार आहेत.
  • फ्रान्स आणि जर्मनीचा प्रत्येकी एक आणि अमेरिकेच्या चार जणांचा यामध्ये समावेश आहे.

केंद्र सरकारकडून 125 रूपये मुल्याचे विशेष नाणे जारी :

  • भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारकडून 125 रूपये मुल्याचे विशेष नाणे जारी केले जाणार आहे.

  • पुढील वर्षी 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांची सव्वाशेवी जयंती साजरी केली आहे.
  • काँग्रेसने याआधीच बाबासाहेबांच्या जयंती वर्षानिमित्त वर्षभरात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
  • या सर्व कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक समितीदेखील स्थापन केली होती. या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा असेल.
  • याशिवाय, त्यांच्या स्मरणार्थ केंद्र सरकारकडून एका टपाल तिकिटाचे लोकार्पणही करण्यात येणार आहे.
  • तसेच यापुढे 14 एप्रिल ‘राष्ट्रीय बंधुत्व व समरसता दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.

अभिलाषा म्हात्रे हिला राष्ट्रीय ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान :

  • नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या क्रीडा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिला शनिवारी दिल्ली येथे मानाचा राष्ट्रीय ‘अर्जुन पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत या पुरस्कार वितरणाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
  • रेडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिलाषा म्हात्रेने 2012 साली झालेल्या महिला विश्वचषक तसेच 2014 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली
  • तसेच टेनिसस्टार सानिया मिर्झा हिला शनिवारी राष्ट्रीय क्रीडादिनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका सोहळ्यात देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या ‘राजीव गांधी खेलरत्न’ने सन्मानित करण्यात आले.
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सानियाला पदक, प्रमाणपत्र आणि साडेसात लाख रुपये रोख प्रदान केले.

  • तसेच अभिलाषासह एकूण 17 खेळाडूंचा राष्ट्रपतींनी अर्जुन पुरस्काराने गौरव केला.
  • पुरस्कार विजेते
  • राजीव गांधी खेलरत्न : सानिया मिर्झा (टेनिस)
  • अर्जुन पुरस्कार : पी आर. श्रीजेश (हॉकी), दीपा करमाकर (जिम्नॅस्टिक), जीतू रॉय (नेमबाजी), संदीप कुमार (तिरंदाजी), मनदीप जांगडा (बॉक्सिंग), बबिता (कुस्ती), बजरंग (कुस्ती), रोहित शर्मा (क्रिकेट), के. श्रीकांत (बॅडमिंटन ), स्वर्णसिंग विर्क (कुस्ती), सतीश शिवालिंगम (वेटलिफ्टिंग), सांतोई देवी (वुशू), शरद गायकवाड (पॅरासिलिंग) एम. आर. पूवम्मा (अ‍ॅथलेटिक्स), मनजीत चिल्लर (कबड्डी), अभिलाषा म्हात्रे (कबड्डी), अनूपकुमार यामा (स्केटिंग)
  • द्रोणाचार्य पुरस्कार : नवल सिंग : पॅरा अ‍ॅथलेटिक्स, अनुपसिंग : (कुस्ती), हरबंससिंग (अ‍ॅथलेटिक्स आजन्म), स्वतंत्रराज सिंग : बॉक्सिंग आजन्म, निहार अमीन जलतरण आजन्म. ध्यानचंद पुरस्कार : रोमियो जेम्स : (हॉकी), शिवप्रकाश मिश्रा (टेनिस), टीपीपी नायर (व्हॉलीबॉल)

इयान बेल याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा :

  • इंग्लंडचा मधल्या फळीतील शैलीदार फलंदाज इयान बेल याने वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • मधल्या फळीतील या विश्वसनीय फलंदाजाने इंग्लंडकडून वन डेत सर्वात जास्त धावा केल्या आहेत.
  • त्याने 161 वन डेत चार शतकांसह 5 हजार 416 धावा केल्या आहेत.
  • याशिवाय 115 कसोटी सामने खेळताना 22 शतकांसह जवळपास 43 च्या सरासरीने 7 हजार 569 धावा केल्या आहेत.
  • इंग्लंडकडून फक्त चार फलंदाजांनी त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago