चालू घडामोडी (22 ऑगस्ट 2016)
रिओ ऑलिंपिक 2016 चा समारोप :
- रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून देणारी कुस्तीपटू साक्षी मलिकला समारोप समारंभात ध्वजधारकाचा मान देण्यात आला. साक्षीने मारकाना स्टेडियमवर भारताचा ध्वज फडकावला.
- (दि.21) झालेल्या समारोप सोहळ्यात सर्वच देशांचे खेळाडू आपला ध्वज घेऊन सहभागी झाले होते.
- उद्घाटन सोहळ्यात नेमबाज अभिनव बिंद्रा भारतीय पथकाचा ध्वजधारक होता. साक्षी मलिकने 58 किलो वजनी गटात भारताला ब्राँझपदक मिळवून दिले होते.
- तसेच या ऑलिंपिकमध्ये भारताला फक्त दोन पदक मिळविण्यात यश आले.
- भारताला साक्षीने ब्राँझ आणि बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू रौप्य पदक मिळवून दिले. यामुळे दोन पदकांसह भारत पदकतालिकेत 67 व्या स्थानावर राहिला.
- रिओमध्ये अमेरिकेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अमेरिकेने 121 पदके जिंकून अव्वल स्थान मिळविले.
- अमेरिकेच्या खेळाडूंनी 46 सुवर्ण, 37 रौप्य आणि 38 ब्राँझपदके मिळविली. तर, पदकतालिकेत ग्रेट ब्रिटनने आश्चर्यकारकरित्या दुसऱा क्रमांक मिळविला. ब्रिटनने 27 सुवर्ण, 23 रौप्य आणि 17 ब्राँझ अशी 67 पदके मिळविली.
- चीनला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनने 26 सुवर्ण, 18 रौप्य आणि 26 बाँझ अशी 70 पदके मिळविली.
- रिओला निरोप देत वेलकम टोकियो असे म्हणत पुढील 2020 टोकियो ऑलिंपिकचा ध्वज टोकियाच्या गव्हर्नरांकडे देण्यात आला.
ऑलिम्पिकमध्ये आदिती अशोक 41 व्या क्रमांकावर :
- ऑलिम्पिकमध्ये तब्बल 112 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर समावेश झालेल्या गोल्फ खेळात भारताची 18 वर्षीय अदिती अशोकला 41 व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तीने फाईव्ह ओव्हार 76 गुणांची खेळी केली.
- तसेच यंदा गोल्फसाठी विविध देशांमधून एकूण 64 तर जगातील सर्वोत्कृष्ट 10 गोल्फपटू सहभागी झाले होते.
- रिओमार येथिल ऑलिंम्पिक गोल्फ कोर्सवर झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अदिती पहिल्या 8 क्रमांकात होती, त्यावेळी तीचे गुण 68-68 असे होते.
- तिसऱ्या दिवशी मात्र, आपल्या खेळात सातत्य राखता न आल्यामुळे तीला 79 गुणांवर समाधान मानावे लागले.
- विशेष म्हणजे आदितीला यावेळी एकही बर्डी केलता आली नाही.
- फक्त तीन बोगीज् आणि एक डबल बोगीची खेळी केल्यामुळे तीला सेव्हन ओव्हर 291 गुणांवर समाधान मानावे लागले.
पुढील तीन महिन्यांत ‘इस्रो’कडून चार उपग्रहाचे प्रक्षेपण :
- उपग्रह अवकाशात सोडण्याचा भारतीय अवकाश संशोधन केंद्राचा (इस्रो) धडा कायम असून, पुढील तीन महिन्यांमध्ये आणखी चार उपग्रह अवकाशात झेपावणार आहेत.
- ‘इस्रो’च्या उपग्रह केंद्राचे संचालक मिलस्वामी अण्णादुराई यांनी ही माहिती दिली.
- अण्णादुराई म्हणाले, ‘ऑगस्ट 2015 पासून ऑगस्ट 2016’ पर्यंत भारताने दहा उपग्रह अवकाशात सोडले आहेत.
- आता सप्टेंबरमध्ये इन्सॅट 3 डी आर आणि स्कॅटसॅट-1 हे उपग्रह, तर ऑक्टोबरमध्ये जीसॅट-18 आणि नोव्हेंबरमध्ये रिसोर्ससॅट-2 ए हे उपग्रह सोडले जातील.
- तसेच पुढील तीन वर्षांत 70 उपग्रह अवकाशात सोडण्याचे ‘इस्रो’चे नियोजन असून, त्यानुसार काम सुरू आहे.
केंद्र सरकारकडून एक नवा कायदा मंजूर होणार :
- केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेला एक नवा कायदा मंजूर झाल्यास सिने कलावंत आणि खेळाडू ज्या वस्तूंची जाहिरात करतात त्या चाचणीमध्ये निकृष्ट दर्जाच्या आढळल्यास या ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना तुरुंगात जावे लागेल.
- 1986 च्या ग्राहक संरक्षण कायद्यात आमुलाग्र सुधारणा करण्यासाठी ‘ग्राहक संरक्षण विधेयक’ नावाचे एक नवे विधेयक केंद्र सरकार तयार करीत असून त्यात निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’ना पहिल्या गुन्ह्यासाठी दोन वर्षांच्या व नंतरच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षेच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे.
- अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या दुरुस्ती विधेयकाचा मूळ मसुदा तयार केला होता.
- तसेच गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे विधेयक लोकसभेत मांडले गेल्यावर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठविले गेले होते.
- समितीने इतर बाबींसोबत निकृष्ठ मालाची जाहिरात करणाऱ्या ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याची शिफारस केली होती.
- केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाकडे हे विधेयक मतासाठी पाठविले गेले.
- तसेच या मंत्रीगटानेही ‘ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर’ना शिक्षा करण्याच्या तरतुदीस अनुकुलता दर्शविली आहे.
ब्रिटनचा मो फराहाची ऑलिंपिकमध्ये एतिहासिक कामगिरी :
- ब्रिटनचा धावपटू मो फराहने रिओ ऑलिंपिकमध्ये 5000 मीटर धावण्याच्या शर्यतीतही सुवर्णपदक जिंकल्याने त्याचे या ऑलिंपिकमधील दुसरे सुवर्णपदक ठरले आहे.
- तसेच यापूर्वी त्याने लंडन ऑलिंपिकमध्येही दोन 5000 आणि 10000 हजार मीटर शर्यतीत सुवर्ण मिळविली होती.
- सलग दोन ऑलिंपिकमध्ये या दोन्ही शर्यतीत सुवर्णपदक जिंकण्याचा मान यापूर्वी फिनलँडच्या लॅसी विरेन यांच्या नावावर आहे. त्यांनी 1972 आणि 1976 च्या ऑलिंपिकमध्ये या दोन्ही शर्यतीत सुवर्णपदके मिळविली होती.
- आता फराहने या विक्रमाची बरोबरी केली आहे. फराहने 5000 मीटरची ही शर्यत 13 मिनिटे 03.30 सेकंदांत पूर्ण करत आपले वर्चस्व राखले.
- तर अमेरिकेच्या चेलिमो पॉल याने 13.03.90 सेकंदांसह रौप्य आणि इथिओपियाच्या गेब्रीहेवेट हॅगोस याने 13.04.35 सेकंदांसह ब्राँझपदक मिळविले.
दिनविशेष :
- 1647 : डेनिस पॅपिन, प्रेशर कुकरचा शोध लावणारे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1864 : जीन हेन्री यांनी आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना केली.
- 1907 : भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना तयार करुन मॅडम भिकाजी कामा यांनी तो प्रदर्शित केला.
- 1982 : विवेकानंद केंद्राचे आद्य प्रवर्तक एकनाथजी रानडे स्मृतीदिन.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा