चालू घडामोडी 2 जुलै 2015
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेस मंजुरी :
- देशातील शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी मोदी सरकारने घोषणा केलेल्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान कृषी सिंचन योजनेस मंजुरी देण्यात आली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- देशात लागवडीखाली असलेल्या 142 दशलक्ष हेक्टर क्षेत्रापैकी 65 टक्के क्षेत्रावर सिंचनाची व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ मॉन्सूनवर अवलंबून राहावे लागते. परिणामी, क्षमता असूनही जलसिंचनाच्या सोयीअभावी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडतात.
- ही परिस्थिती बदलण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कृषी सिंचन योजनेची घोषणा केली होती. बुधवारी झालेल्या निर्णयानंतर आता ही योजना राबविण्यास सुरवात होणार आहे.
- तसेच पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत विविध पद्धतींद्वारे सिंचन क्षमता वाढविली जाणार आहे.
3 जुलैपासून मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी कार्यान्वित :
- येत्या 3 जुलैपासून कोणताही क्रमांक कोणत्याही सेवापुरवठादाराकडे हस्तांतरिक करण्यासाठी मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी कार्यान्वित होईल, असे एका ज्येष्ठ दूरसंचार अधिकाऱ्याने सांगितले.
- त्यामुळे भारतातील मोबाईलधारकांना मोबाईल क्रमांक न बदलता कोणत्याही सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करता येणे शक्य होणार आहे.
- पूर्ण नंबर पोर्टेबिलिटी सुरुवातीला 3 मे अंमलबजावणी करणे अपेक्षित होते. मात्र, सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (सीओएआय) तांत्रिक बदल करण्यासाठी आणखी काही कालावधीसाठी परवानगी मागितली होती.
- यापूर्वी एखादा क्रमांक अन्य सेवापुरवठादाराकडे हस्तांतरित करण्यासाठी मर्यादा होत्या. मूळ सेवापुरवठादाराच्या सेवा ज्या परिक्षेत्रात उपलब्ध आहेत तेथेच मोबाईल क्रमांक अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरीत करता येणे शक्य होते.
- मात्र, ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार कोणताही ग्राहक कोणत्याही सेवापुरवठादाराकडील कोणताही क्रमांक भारतातील कोणत्याही ठिकाणी अन्य सेवापुरवठादारांकडे हस्तांतरित करू शकेल.
‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाचा प्रारंभ :
- ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी योजनेत सुमारे साडेचार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, त्यातून 18 लाख युवकांना रोजगार मिळेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केला.
- तसेच माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीत देशाला पुढे नेणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘डिजिटल इंडिया’ सप्ताहाचा प्रारंभ करताना ते बोलत होते.
- तसेच मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्स इंडस्ट्रिजने डिजिटल क्षेत्रात 2.50 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.
- तर टाटा समूह 60 हजार तंत्रज्ञांची भरती करील, असे सायरस मिस्त्री यांनी जाहीर केले.
- भारती एन्टरप्राईजेसने येत्या पाच वर्षांत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली.
प्रवाशांसाठी 138 नंबरची हेल्पलाइन सुरू :
- रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी 138 नंबरची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
- तसेच आपत्कालीन, स्वच्छता, खानपान तसेच कॅटरिंग, कोचमधील दुरुस्ती, बेडरोल इत्यादींसाठी असेल.
- चौकशी तसेच तक्रार या हेल्पलाइनवर प्रवासी करू शकतात.
- सध्या रेल्वेकडून सुरक्षेसाठी 182 आणि 139 ही हेल्पलाइन उपलब्ध आहे.
राष्ट्रपती दक्षिणेच्या दौऱ्यावर :