Current Affairs of 15 September 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (15 सप्टेंबर 2015)

नेपाळला हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची मागणी फेटाळली :

  • नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करण्याची मागणी येथील संसदेने फेटाळून लावली आहे.
  • नव्या राज्यघटनेच्या मसुद्यावरील मतदानावेळी संसदेने हा निर्णय घेतल्यानंतर देशभरात हिंसक आंदोलने उसळली आहेत.
  • नेपाळ हे अनेक शतके हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जात होते.
  • मात्र, 2006 मध्ये राजेशाही संपुष्टात आल्यानंतर या देशाने धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार केला होता.
  • नेपाळमध्ये नवी राज्यघटना अस्तित्वात येणार असल्याने नव्या मसुद्यामध्ये नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची अनेक संघटनांची मागणी होती.

प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी यदु श्रीराम जोशी यांची निवड :

  • महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम राज्य अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी यदु श्रीराम जोशी यांची सोमवारी बहुमताने निवड झाली.
  • अधिस्वीकृती समितीच्या सर्व 27 सदस्यांनी गुप्त मतदान पद्धतीने मतदान केले.
  • त्यामध्ये जोशी यांना 18 तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांना 9 मते मिळाली.
  • निवृत्त निवासी उपजिल्हाधिकारी आर.एन. गरुड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

होरमुसजी एन.कामा यांची पीटीआय अध्यक्षपदी निवड :

  • ‘बॉम्बे समाचार’चे संचालक होरमुसजी एन. कामा यांची सोमवारी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे (पीटीआय) अध्यक्ष आणि ‘मल्याळम मनोरमा’चे संचालक रियाद मॅथ्यू यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
  • जागरणप्रकाशनचे अध्यक्ष आणि प्रबंध संचालक महेंद्र मोहन गुप्ता हे आधिचे अध्यक्ष होते.
  • कंपनीच्या 67 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर घेण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत कामा आणि मॅथ्यू यांनी निवड करण्यात आली.
  • कामा हे भारतात 1855 पासून सतत प्रकाशित होत असलेल्या ‘बॉम्बे समाचार’ या सर्वांत जुन्या दैनिकाचे संचालक असून ते दोन वेळा इंडियन न्यूजपेपर सोसायटीचे अध्यक्ष होते.
  • सध्या ते रीडरशीप स्टडीज कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत.

राज्यातील पाच संस्थांचा राजभाषा पुरस्कार सन्मान :

  • केंद्र सरकारच्या अखत्यारीतील राज्यातील पाच संस्थांचा राजभाषा पुरस्काराने राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.
  • गृहमंत्री राजनाथसिंह, राज्यमंत्री किरण रिज्जू व हरिभाई चौधरी आदी उपस्थित होते.
  • पुरस्कारप्राप्त संस्थांमध्ये महाराष्ट्रातील कोकण रेल्वे महामंडळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट, राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, नगर राजभाषा कार्यान्वय समिती आणि माझगाव डॉक लिमिटेडचा समावेश आहे.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे विज्ञान भवनात आयोजित हिंदी दिवस कार्यक्रमात केंद्र सरकारची विविध मंत्रालये, विभाग व संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते 2014-15च्या राजभाषा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातून कोकण रेल्वे महामंडळाला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • मंडळ, स्वायत्त संस्थांच्या श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या राजभाषा विभागाचे सहायक व्यवस्थापक संतोष कुमार पाठक यांनी, तर दुसरा पुरस्कार मुंबईच्याच राष्ट्रीय आद्यौगिक अभियांत्रिकी संस्थेचे अध्यक्ष अशोक कुंडीर यांनी स्वीकारला.
  • राजभाषा कार्यान्वय समिती श्रेणीत नाशिकच्या नगर राजभाषा कार्यन्वयन समितीला मिळालेला तृतीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष व महाव्यवस्थापक सुरेश प्रजापती यांनी स्वीकारला.

सुलभ व्यापार करण्यासाठी भारतात गुजरात पहिल्या क्रमांकावर :

  • सुलभ व्यापार करण्यासाठी भारतात गुजरात पहिल्या क्रमांकावर असल्याचा निर्वाळा देणाऱ्या जागतिक बँकेच्या अहवालात महाराष्ट्राचा मात्र आठवा क्रमांक लागला आहे.
  • भारतातील कोणती राज्ये उद्योगांसाठी चांगली आहेत याबाबतचा अहवाल जागतिक बँकेने सोमवारी सादर केला.
  • बँकेने दिलेल्या मानांकनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दशकाहून अधिक काळ नेतृत्व केलेला गुजरात पहिल्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळवला आहे.
  • महाराष्ट्र या यादीत आठव्या क्रमांकावर फेकला गेला असून अरुणाचल प्रदेश यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे.
  • या राज्यांना लालफीतशाहीचा अडथळा दूर करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी राज्यांची क्रमवारी ठरवली जाते.
  • जगातील देशांची क्रमवारी लावणारा जागतिक बँकेचा तो अहवाल पुढील महिन्यात जाहीर होणे अपेक्षित आहे.

देशातील 393 जिल्ह्यांमध्ये ईएसआयसी सुविधांचा विस्तार :

  • देशातील 393 जिल्ह्यांमध्ये ईएसआयसी सुविधांचा विस्तार केला जाणार असून, ऑगस्ट 2015 पासून देशातील इमारत बांधकामगारांना ही सुविधा लागू करण्यात आली आहे.
  • याचा लाभ देशातील 7 कोटी 40 लाख इमारत बांधकामगारांना होईल.
  • येत्या काळात ऑटोचालक, हातगाडीचालक, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, शेजमजूर यांना ईएसआयसीची सुविधा दिली जाईल.
  • तसेच या सुविधेसाठी 15 हजारांवरून 25 हजार रुपये पगाराची मर्यादा करण्यावर विचार केला जाणार आहे.

कॅनडातील क्वीन्स विद्यापीठातील संशोधन :

  • चुंबकीय क्षेत्र व जास्त वस्तुमान असलेला द्वैती तारा वैज्ञानिकांना सापडला आहे.
  • ‘एपसिलॉन ल्युपी’ असे त्याचे नाव असून त्यातील दोन्ही ताऱ्यांना चुंबकीय क्षेत्र आहे.
  • द्वैती तारा ही एक तारकाप्रणाली असून त्यात दोन किंवा जास्त तारे असतात, ते त्यांच्या सामायिक वस्तुमान केंद्राभोवती फिरत असतात.
  • गेल्या काही वर्षांत विविध वर्गातील ताऱ्यांच्या द्वैती व चुंबकीय आंतरक्रिया तपासण्याच्या प्रकल्पात ताऱ्यांचे चुंबकीय गुणधर्म तपासले जात आहेत.
  • आता कॅनडा- फ्रान्स व हवाई येथील दुर्बीण वापरून हा द्वैती तारा शोधण्यात आला आहे.
  • मंथली नोटिसेस ऑफ रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
  • एपसिलॉन ल्युपीची वैशिष्ट्ये :
  • ताऱ्याचे नाव एप्सिलॉन ल्युपी
  • चुंबकीय क्षेत्राचे अस्तित्व
  • निर्मितीच्या काळातील चुंबकीय क्षेत्र बाहेरच्या थरात बद्ध
  • दोन्ही ताऱ्यांचे चुंबकीय ध्रुव वेगळे
  • जास्त वस्तुमानाच्या 10 टक्के ताऱ्यांमध्ये चुंबकीय क्षेत्र

दिनविशेष :   

  • अभियंता दिन : भारतात मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून पाळला जातो.
  • 1935 : भारतातील दून स्कूलची स्थापना.
  • 1935 : जर्मनीने देशातील ज्यू व्यक्तींचे नागरिकत्व रद्द केले.
  • 1944 : दुसरे महायुद्ध-पेलेल्यूची लढाई.
  • 1968 : सोवियेत संघाच्या झाँड 5 या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • 1981 : व्हानुआतुला संयुक्त राष्ट्रांचे सदस्यत्व मिळाले.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago