Current Affairs of 14 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (14 जानेवारी 2016)

‘इंडिया स्टार्ट अप’ला पाठिंबा :

  • कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘यूपीए‘ सरकारने ‘स्टार्ट अप’ची योजना सुरू केली होती व चार हजार कंपन्यांमध्ये आलेल्या 90 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीत दोन हजार कंपन्या ‘स्टार्ट अप’ होत्या, असा दावा कॉंग्रेसने केला आणि सरकारतर्फे 16 जानेवारी रोजी जाहीर केल्या जाणाऱ्या ‘इंडिया स्टार्ट अप’ योजनेला पाठिंबा जाहीर केला.
  • या योजनेसाठी सहा सूचनाही सरकारला केल्या असून, पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी याबाबत विशेष प्रयत्नशील असल्याचेही पक्षाने म्हटले.
  • राहुल गांधी यांनी बंगळूर आणि दिल्ली येथे या संदर्भात 27 कंपन्यांबरोबर चर्चा केली असून, या संकल्पनेला त्यांनी कॉंग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांना सांगितले, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी दिली.
  • ‘स्टार्ट अप’मध्ये प्रामुख्याने ई-कॉमर्स, अन्न तंत्रज्ञान, वाहतूक सुविधा व त्यास साह्यभूत सेवा, बॅंकिंग, आरोग्यसेवा, कृषी, मॅन्युफॅक्‍चरिंग आदी क्षेत्रांचा समावेश होतो.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 16 जानेवारीला ‘स्टार्ट अप इंडिया’ धोरण किंवा योजना जाहीर करणार आहेत.
  • कॉंग्रेसच्या सहा सूचना
  • नेट न्यूट्रॅलिटी कायम राखण्याचे स्पष्ट आश्‍वासन आणि इंटरनेटची सार्वत्रिक उपलब्धता.
  • सरकारी इमारती, सार्वजनिक विद्यापीठे आणि शाळा यामध्ये ऑफिससाठी जागा, वीज कनेक्‍शन, माहिती तंत्रज्ञान उपलब्धता ‘स्टार्ट अप’ साठी पुरविणे.
  • कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी निधी ‘स्टार्ट अप’ साठी वापरण्याची मुभा द्यावी, त्याबाबत आधीच्या ‘यूपीए’ सरकारने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची संहिता लागू करावी.
  • पेटंट नोंदणीबाबत ‘स्टार्ट अप’ कंपन्यांना अनेक अडचणी येत असतात त्या दूर करणे व त्यासाठी पेटंट नोंदणी कार्यालयांची संख्या वाढविणे.
  • प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सरकारी निधीचा पुरवठा केवळ सामाजिक क्षेत्रापुरताच मर्यादित ठेवण्यात यावा.
  • ‘यूपीए’ सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाला अर्धकुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी साह्य करण्यात यावे.

लेफ्टनंट जनरल जेकब यांचे निधन :

  • भारत-पाकिस्तान यांच्यातील 1971 च्या युद्धात पाकिस्तानच्या शरणागतीत मोलाची भूमिका बजावणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल जे. एफ. आर. जेकब (वय 92) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले.
  • लेफ्टनंट जनरल जॅक फराज राफेल जेकब यांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतातील कोलकता शहरात जानेवारी 1923 मध्ये झाला.
  • 1942 मध्ये महू येथील अधिकारी प्रशिक्षण केंद्रातून (ओटीएस) लष्करी शिक्षण पूर्ण केल्यावर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांची नियुक्ती इराकमधील किर्कुक येथे झाली होती.
  • 1943 मध्ये लेफ्टनंट जनरल जेकब यांची नियुक्ती उत्तर आफ्रिकेत जर्मन जनरल अर्विन रोमेल यांच्या ‘आफ्रिका कोअर’ला तोंड देणाऱ्या ब्रिटिशांच्या तोफखाना ब्रिगेडमध्ये झाली.
  • भारताच्या फळणीनंतर ते भारतीय लष्करात दाखल झाले. पाकिस्तानबरोबरच्या 1965च्या युद्धात लेफ्टनंट जनरल जेकब यांनी पायदळाच्या एका डिव्हिजनचे नेतृत्व केले.
  • फिल्ड मार्शल सॅम माणकशॉ यांच्या काळात जेकब 1967 मध्ये मेजर जनरल झाले आणि 1967 मध्ये ते पूर्व विभागाचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ झाले.
  • 1971च्या युद्धात पाकिस्तानची फाळणी होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली.
  • या युद्धात पाकिस्तानच्या शरणागतीसाठी तेव्हा लष्कराच्या पूर्व विभागाचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ असलेल्या लेफ्टनंट जनरल जेकब यांनी मोलाची कामगिरी बजावली होती.

इस्रो नव्या वर्षात सोडणार पीएसएलव्ही :

  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) गेल्या वर्षी मिळालेल्या यशानंतर इस्रो आता पुन्हा नव्याने येत्या 20 जानेवारीला इस्रो पीएसएलव्ही- सी 31 आणि दूरसंचारसाठीचा आयआरएनएसएस- 1 ई हे दोन उपग्रह आकाशात सोडणार आहे.
  • तसेच चेन्नईपासून 80 किलोमीटरवर असलेल्या श्रीहरीकोटा येथून हे उपग्रह सोडण्यात येणार आहेत.
  • इस्रोने आतापर्यंत 32 पीएसएलव्हीचे यशस्वी उपग्रह सोडले असून, आता पीएसएलव्ही – सी 31 हा 33 वा उपग्रह अवकाशात सोडणार आहे.

विद्यापीठाच्या नामांतराला 22 वर्षे पूर्ण :

  • महाराष्ट्राच्या विधीमंडळाने नामांतराचा ठराव 1978 मध्ये एकमताने मंजूर केला. परंतु, या नामांतराला प्रखर विरोध झाला आणि आंबेडकरवादी जनतेला तब्बल 16 वर्षे संघर्ष करावा लागला.
  • अखेर 14 जानेवारी 1994 मध्ये आंदोलक व विरोधकांमध्ये समन्वय झाला आणि विद्यापीठाचे नाव केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर न ठेवता पुढे मराठवाडा जोडायचे ठरले. या नामांतराला आज 22 वर्षे पूर्ण झाली.
  • जवळपास दोन वर्षे या आंदोलनाला हिंसेचा सामना करावा लागला. मराठवाड्यातल्या जवळपास 1200 गावांना झळ पोचली होती.
  • ज्या महापुरुषाने देशातल्या शोषितांसाठी लढा दिला, स्त्रियांच्या स्वातंत्र्याची ध्वजा खांद्यावर मिरवली त्या उच्चविद्याविभुषित बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आज विद्यापीठाला मिळाले.

सानिया-हिंगीसचा विक्रमी विजय :

  • भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिची स्विस जोडीदार मार्टिना हिंगीस या अव्वल जोडीने बुधवारी यंदाच्या मोसमातील दुसऱ्या विजेतेपदाकडे कूच करताना सिडनी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
  • विशेष म्हणजे सानिया-हिंगीस यांनी सलग 28 वा विजय मिळवताना महिला दुहेरीच्या जागतिक विक्रमाची बरोबरी केली आहे.
  • सानिया-हिंगीस यांचा धडाका पाहता हा विक्रम नक्कीच मोडीत निघेल, याची खात्री टेनिसप्रेमींना आहे.
  • गतवर्षी एकत्र आलेल्या सानिया-हिंगीस यांनी एकामागोमाग एक विजेतेपदांचा धडाका लावताना 10 डब्ल्यूटीए दुहेरी स्पर्धा जिंकल्या.

आयडीबीआयकडून अर्थसाहाय्यात वाढ :

  • देशाच्या बँकिंग उद्योग अग्रगण्य असलेल्या आयडीबीआय बँकेने सूक्ष्म व्यवसाय, अल्पसंख्याक समाज आणि समाजातील दुर्बल घटकांना आणि त्यांचा व्यावसायिक हुरुप वाढविण्याच्या हेतूने आर्थिक सहाय्य वाढविण्याची घोषणा केली आहे.
  • तळागाळातून उद्योजकता वाढीस लागावी व अनेक लहान मोठ्या उद्योगांनाही वित्तसहाय्यामुळे उद्योगात भक्कमपणे उभे राहता यावे यासाठी, बँकेने वाढीव अर्थसहाय्याचे धोरण स्वीकारले आहे.
  • बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी किशोर खरात यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
  • घाऊक व किरकोळ व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक आणि स्वयंरोजगार, वैद्यकीय व्यावसायिक आणि मोठ्या तसेच मध्यम आकाराच्या कॉर्पोरेट विक्रेत्यांसाठी आयडीबीआय बँकेच्या काही योजना आहेत.
  • त्या योजनेअंतर्गत दुर्गम भागातील लोकांपर्यंत बँकेने केलेल्या आर्थिक तरतुदी व्यवस्थितपणे पोहोचविण्यासाठी बीसी/बीएफ चॅनल सुरू करण्यात आले आहे.
  • तसेच या माध्यमातून विविध मेळावे घेऊन गरजूंपर्यंत कर्ज पोहोचविण्यात येत असल्याचे बँकेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

एच-वन बी, एल-वन व्हिसा शुल्क अमेरिकेने वाढविले :

  • एच-वन बी आणि एल-1 व्हिसावरील काही ठराविक वर्गातील शुल्क अमेरिकेने वाढविले आहे. ही अतिरिक्त वाढ 4 हजार अमेरिकी डॉलरपर्यंत करण्यात आली असून, त्याचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसणार आहे.
  • व्हिसा शुल्क वाढीची घोषणा यूस सिटीझनशिप अ‍ॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसतर्फे (यूएससीआयएस) करण्यात आली.
  • एच-वन बी व्हिसात काही विशिष्ट वर्गासाठी अर्ज करणाऱ्यांना 4 हजार अमेरिकी डॉलर इतके अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
  • 18 डिसेंबर 2015 नंतर हे व्हिसा शुल्क लागू झाले आहे.

पंतप्रधान पिक विमा योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी :

  • नविन पीकविमा धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असल्याची माहीती केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. या योजने मार्फत प्रीमियम कमी, जास्त विम्याची हमी मिळनार आहे.
  • शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी मोबाईलचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला विनाविलंब भरपाई मिळणार आहे.
  • नवीन विमा योजनेचा अधिक लाभ बुंदेलखंड, पूर्व उत्तरप्रदेश, उत्तर बिहार, सौराष्ट्र आणि महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, ओडिशामधील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
  • नवी कृषी विमा योजना देशभरात येत्या जून महिन्यापासून म्हणजेच खरीप हंगामापासून लागू करण्यात येणार आहे.

‘केप्लर’च्या दुसऱ्या टप्प्यात शंभर बाह्य़ग्रहांचा शोध :

  • नासाच्या केप्लर दुर्बिणीने आतापर्यंत वेगळ्या ताऱ्यांभोवती फिरणारे 100 ग्रह शोधून काढले आहेत.
  • केप्लर दुर्बिणीत अलीकडे तांत्रिक बिघाड झाला होता पण नंतर ती दुरुस्त करण्यात आली. के 2 मोहिमेत ती दुरुस्त करण्यात आली.
  • या दुर्बिणीने अधिक्रमणाच्या माध्यमातून ग्रह शोधून काढले यात ग्रह मातृताऱ्यासमोरून जातो तेव्हा प्रकाश अडला जातो, त्यावरून ग्रहांचे अस्तित्व कळते.
  • ही अवकाशदुर्बीण आकाशाचा मोठा पट्टा 80 दिवस बघत असते व त्यातून ग्रह व इतर घटकांचा शोध लागला आहे, असे स्पेस डॉट कॉम या संकेतस्थळाने म्हटले आहे.
  • पहिल्या पाच के 2 मोहिमांत 100 बाह्य़ग्रहांचा शोध लागला, असे अ‍ॅरिझोना विद्यापीठाचे आयन क्रासफील्ड यांनी सांगितले.

दिनविशेष :

  • भूगोल दिन आणि मकरसंक्रांत.
  • ख्रिस्ती बालयेशूचा महोत्सवास प्रारंभ झाला.
  • 1993 : मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
  • 1999 : एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांची ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी निवड झाली.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago