चालू घडामोडी (12 जानेवारी 2017)
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा नागरी सत्कार :
- सर्वांच्या सदिच्छेच्या बळावर तीनदा महाराष्ट्र केसरी पद मिळविले. आता हिंदकेसरी किताब पटकाविण्याचे लक्ष्य असल्याचे विजय चौधरी यांनी स्पष्ट केले.
- महाराष्ट्र केसरीचा सलग तिसऱ्यांदा बहुमान मिळविण्याची हॅट्रिक करणाऱ्या पैलवान विजय चौधरी यांचा चिंचवड येथे नागरी सत्कार करण्यात आला.
- उद्योजक बाळासाहेब गवारे यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
- सत्काराला उत्तर देताना, चौधरी म्हणाले, खान्देशातील मातीत घडलेला मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. हिंद केसरीची तयारी सुरु केली आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर तीन वेळा महाराष्ट्र केसरी झालो. महाराष्ट्रातील जनेतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. कुस्ती या खेळावर प्रेम करण्याऱ्या महाराष्ट्रातील जनतेला हिंद केसरीच्या रूपाने आणखी एक आनंद देण्याचा प्रयत्न राहिल. सत्कार हा माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.
सरकारी सेवांसाठी आधार कार्ड बंधनकारक होणार :
- भविष्यात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवातानाही आधार कार्ड बंधनकारक होणार आहे.
- केंद्र सरकारने सर्व सरकारी सुविधा, सेवा, अनुदान आणि लाभ घेणा-या आधार कार्ड बंधन करण्याची तयारी सुरु केली आहे.
- केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटवर सूट देताना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि ईपीएफसाठी आधार कार्ड बंधनकारक केले होते.
- आता लवकरच केंद्र सरकार सर्व प्रकारच्या सरकारी सेवांसाठी ओळखपत्र म्हणून आधार कार्ड बंधनकारक करणार आहे.
- संसदेने मंजूर केलेल्या आधार कार्ड विधयेकानुसार कोणतेही अनुदान, लाभ किंवा सेवेसाठी भारत सरकारच्या निधीतून खर्च होत असल्यास त्यासाठी आधार कार्ड बंधनकारक असणार आहे.
- आधार कार्डचे फायदे लक्षात घेता प्रत्येक विभागाला आधार कार्डचा वापर करावा लागेल.
रेल्वे स्थानकांवर कॅशलेस सुविधा उपलब्ध :
- नोटाबंदीनंतर लोकलचा पास काढण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर कॅशलेस सुविधा सुरू करण्यात आली.
- उपनगरीय लोकल स्थानकांवरील तिकीट खिडक्यांवर पास काढण्यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करून पासाचे शुल्क भरण्यासाठी पीओएस मशिन बसवण्यात आल्या. त्याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून 15 दिवसांत 96 लाखांची कमाई झाली आहे.
- रेल्वेने मेल-एक्स्प्रेसचे तिकीट काढण्यासाठी स्थानकांवर टप्प्याटप्प्यात कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिन बसवण्यास सुरुवात केली. या मशिन बसवल्यानंतर लोकल प्रवाशांनाही पास काढण्यासाठी ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
- मध्य रेल्वेवर 624 तर पश्चिम रेल्वेवर 324 मशिन बसवण्यात आल्या. तसेच 26 डिसेंबरपासून ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
दिनविशेष :
- 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड येथे जिजाबाई शहाजी भोसले यांचा जन्म झाला.
- 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतात.
- 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 12 जानेवारी 1936 रोजी धर्मांतराची घोषणा केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा