चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2015)
गुगलच्या सीईओ पदी सुंदर पिचई यांचे नाव जाहीर :
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी “व्याघ्रदूत” बनण्यास होकार :
अमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा “नासा” चा प्रतिष्ठेचा पुरस्कार :
- उत्तर प्रदेशमधील नोएडा जिल्ह्यात असलेल्या अमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या पथकाला अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था “नासा”चा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला



आहे. - “नासा”ने आयोजित केलेल्या “इंटरनॅशनल स्पेस सेटलमेंट डिझाइन” या अत्यंत प्रतिष्ठेच्या वार्षिक स्पर्धेत या पथकाने हे देदीप्यमान यश मिळविले आहे.
- दोन ते चार ऑगस्ट या काळात झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील चार तुकड्यांमधून जगभरातील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
- पृथ्वीबाहेर मानववस्तीसाठी उपयुक्त ठरणारी रचना तयार करण्याच्या या स्पर्धेत या पथकाने मंगळावरील वस्तीची प्रतिकृती तयार केली.
- यामध्ये त्यांनी ऍल्युमिनिअम ऑक्सिनायट्राइड या पारदर्शी पदार्थाचा वापर करून 24 हजार नागरिकांना सामावून घेणाऱ्या आणि अतिरिक्त तीन हजार नागरिकांची तात्पुरती सोय करणाऱ्या दोन मुख्य वस्त्या आणि चार इतर वस्त्यांची रचना तयार केली.
हनुमान चालिसाचे उर्दूत भाषांतर केले :
गुजरात निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य :
- गुजरात सरकारने राज्यातील स्थानिक निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
- गुजरात स्थानिक कायदा 2009 संशोधक अॅक्ट अंतर्गत हा निर्णय घेतला असून स्थानिक निवडणुकीत मतदान बंधनकारक करणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरलं आहे.
- गुजरातमध्ये गतवर्षी स्थानिक निवडणुकीत केवळ 50 ते 60 टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
- गुजरात पंचायत निवडणूक नियम (संशोधन) 2015 आणि नगर पालिका निवडणूक नियम (संशोधन) 2015] अंतर्गत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला 100 रुपये दंड केला जाणार आहे.
- निवडणुकीत मतदान न करणाऱ्या व्यक्तीला मॉनिटरी दंड आणि सोशल सर्विस अंतर्गत शिक्षा दिली जाऊ शकते.
- तसेच त्या व्यक्तीला सरकारी योजनेपासूनही वंचित ठेवण्याचा सरकार पातळीवर विचार सुरु आहे.
- मतदान यादीत नाव असलेल्या पण मतदान न करणाऱ्या व्यक्तींना निवडणूक अधिकारी मतदानानंतर नोटीस बजावतील.
- महिनाभराच्या आत त्या व्यक्तीला मतदान न करण्याचे कारण सांगावे लागेल.
- दोषी आढळल्यास 15 दिवसात त्या व्यक्तीला 100 रुपये दंड भरावा लागेल.
आता होणार मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन :
- अमेरिकी अवकाश संशोधन संस्थेने (नासा) क्युरिऑसिटी रोव्हर या मंगळ यानाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मंगळ ग्रहाची सफर ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.


- यानाने केलेला मंगळप्रवास त्यामुळे अनुभवता येईल. मुख्य म्हणजे यामुळे नवोदित संशोधक, विद्यार्थी आणि जिज्ञासूंना हा खजिना उपलब्ध होणार आहे.
- ‘क्युरिऑसिटी रोव्हर’ मंगळाची अद्भूत सफर केली आहे.
- त्यातून ‘नासा’कडे मोठ्या प्रमाणावर छायाचित्रे व माहिती संकलित झाली आहे.
- शिवाय 50 वर्षांतील अन्य यानाच्या मदतीने मिळालेली माहितीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- ‘मार्स ट्रेक’ हे वेबबेस्ड अॅप्लिकेशन असून, ते नेटकरांना विनामूल्य उपलब्ध असेल.
- मंगळावर पहिली मानवी मोहीम 2030 मध्ये आखली जाणार आहे.
- त्यासाठी इच्छुकांची नोंदणी करण्यासाठी व अन्य माहितीची आदानप्रदान करण्यासाठी ‘मार्स ट्रेक’चा वापर सध्या केला जातो.
- 6 ऑगस्ट 2012 रोजी नासाने क्युरिऑसिटी रोव्हर हे यान मंगळावर सोडले.
- कारच्या आकाराचे हे यान यशस्वीपणे मंगळावर उतरलेच पण त्याच्यावर सोपविण्यात आलेले कामही ते चोख पार पाडते आहे. या यानाकडून मिळालेली माहिती, मातीचे नमुने, प्रतिमा अतिशय महत्त्वाच्या आहेत.
दिनविशेष :
- 2008 : भारताच्या अभिनव बिंद्राला सुवर्णपदक.