3 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 जून 2022)
शेरिल सँडबर्ग यांचा राजीनाम्याचा निर्णय :
फेसबुकची मालकी असलेल्या ‘मेटा’च्या दुसऱ्या क्रमांकाच्या अधिकारी शेरिल सँडबर्ग यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
‘स्टार्टअप’च्या स्वरूपातील या व्यवसायाचे डिजिटल जाहिरातीच्या साम्राज्यात रूपांतर करण्याचे श्रेय सँडबर्ग यांना असून, त्याच्या अनेक चुकीच्या निर्णयांचा दोषही त्यांनी स्वत:कडे घेतला होता.
‘फेसबुक’ या बडय़ा समाजमाध्यमात सँडबर्ग यांनी मुख्य परिचालन अधिकारी (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) म्हणून 14 वर्षे काम पाहिले.
फेसबुकला सार्वजनिक स्वरूप आले त्याच्या चार वर्षे आधी, म्हणजे 2008 साली गूगलमधून त्या येथे आल्या होत्या.
प्रसिद्ध संतूर वादक भजन सोपोरी यांचे गुरुवारी कर्करोगाच्या आजाराने निधन झाले.
वयाच्या पाचव्या वर्षीच त्यांनी संतूर वादनाचा सार्वजिनक कार्यक्रम केला.
वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले, तर वडिलांकडून हिंदूस्थानी संगीताचे शिक्षण घेतले. त्यांना 2004 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.
त्यापूर्वी संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि जम्मू- काश्मीर राज्य जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धात स्वप्निलला रौप्यपदक :
भारताच्या स्वप्निल कुसळेने बाकू (अझरबैजान) येथे सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली.
तर हे भारताचे या स्पर्धेतील दुसरे पदक होते.
सुवर्णपदकाच्या लढतीत स्वप्निलला युक्रेनच्या सेरहिय कुलिशकडून 10-16 असा पराभव पत्करावा लागला.
महाराष्ट्राच्या स्वप्निलचे हे ‘आयएसएसएस’ विश्वचषक स्पर्धेतील पहिले वैयक्तिक पदक ठरले.
फिनलंडच्या अलेक्सी लेप्पाने 407.8 गुणांसह तिसरे स्थान मिळवले. त्यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धात आनंदचा सलग दुसरा विजय :
भारताचा माजी विश्वविजेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे स्पर्धेतील दमदार कामगिरी सुरू ठेवताना पारंपरिक (क्लासिकल) विभागातील दुसऱ्या फेरीत बल्गेरियाच्या व्हेसेलिन टोपालोव्हवर मात केली.
तर या कामगिरीसह त्याने जागतिक क्रमवारीतही अव्वल दहा खेळाडूंमध्ये पुनरागमन करताना नवव्या स्थानी झेप घेतली.
आनंदने पहिल्या फेरीत मॅक्सिम वाशिये-लॅग्रेव्हला पराभूत केले होते.
त्यानंतर बुधवारी रात्री उशिराने झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत त्याने टोपालोव्हचा 36 चालींमध्ये पराभव करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
त्यामुळे दोन फेऱ्यांअंती सहा गुणांसह आनंद गुणतालिकेत अग्रस्थानावर आहे.
दिनविशेष:
3 जून 1916 मध्ये महर्षी कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
हिन्दूस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना 3 जून 1947 मध्ये जाहीर झाली.
जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी 3 जून 1998 मध्ये झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.