वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी
वासुदेव बळवंत फडके यांची कामगिरी
- यांना महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते.
- वासुदेव फडक्यांनी 1879 मध्ये रामोशी, कोळी, ठाकर अशा जमतीच्या लोकांना हाताशी धरून इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
- सार्वजनिक काकांनी फडक्याचे वकीलपत्र घेतले होते.
- जानेवारी 1880 मध्ये वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
- 17 फेब्रुवारी 1883 रोजी फडक्यांचे क्षय रोगाने एडनच्या तुरुंगात निधन झाले.
चाफेकर बंधु
- 1896-97 मध्ये दामोदर हरी चाफेकर व बाळकृष्ण हरी चाफेकर यांनी पुण्यात व्यायाम मंडळाची स्थापना केली.
- 1897 मध्ये पुण्यात ब्युबॉनिक प्लेगची साथ पसरली होती.
- 22 जून 1897 रोजी दामोदर व बाळकृष्ण चाफेकर या बंधूनी जुलमी प्लेग कमिशनर रॅड व इंग्रज अधिकारी आर्यहस्ट यांची हत्या केली.
- द्रवीड बंधूनी रॅड हत्या कटाची माहिती सरकारला दिली.
- चाफेकर बंधूना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
- वासुदेव चाफेकर व महादेव आपटे यांनी द्रवीड बंधूची हत्या केली.
दहशतवादाच्या उदयाची कारणे :
- इ.स. 1857 ची प्रेरणा
- प्रबोधन चळवळ
- युरोपातील घटना
- बंगालची फाळणी
- रशिया जपान युद्ध
- प्रखर राष्ट्रवाद
- राष्ट्रसभेची नेमस्त वाटचाल
- इंग्रजी भाषा
- इंग्रज अधिकार्यांचे उद्दात वर्तन
- अहिंसात्मक तत्वज्ञान
- क्रांतीकारकांचे आदर्श
- जहालाची कार्यप्रणाली