समास व त्याचे प्रकार
समास व त्याचे प्रकार
Must Read (नक्की वाचा):
- काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो. त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्याचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो. जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.
उदा.
- वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव.
- पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट
- कांदेपोहे – कांदे घालून तयार केलेले पोहे.
- पंचवटी – पाच वडांचा समूह
समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.
- 1. अव्ययीभाव समास
- 2. तत्पुरुष समास
- 3. व्दंव्द समास
- 4. बहुव्रीही समास
ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
- अ) मराठी भाषेतील शब्द
उदा.
- गावोगाव– प्रत्येक गावात
- गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
- दारोदारी – प्रत्येक दारी
- घरोघरी – प्रत्येक घरी
मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
- ब) संस्कृत भाषेतील शब्द
उदा.
- प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन
- आ (पर्यत) – आमरण
- आ (पासून) – आजन्म, आजीवन
- यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.
वरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपस्वर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे.
- क) अरबी व फारसी भाषेतील शब्द
उदा.
- दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.
- गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
- हर (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा
- बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक
वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.
ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेला शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात. थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा.
- महामानव – महान असलेला मानव
- राजपुत्र – राजाचा पुत्र
- तोंडपाठ – तोंडाने पाठ
- गायरान – गाईसाठी रान
- वनभोजन – वनातील भोजन
वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.
तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.
- 1. विभक्ती तत्पुरुष
ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.
उदा.
- कृष्णाश्रित – कृष्णाला आश्रित – व्दितीया – देशगत, प्रयत्नसाध्य
- तोंडापाठ – तोंडाने पाठ – तृतीया – गुणदोष, बुद्धिजड, भक्तिवश, द्यार्द्र, ईश्वरनिर्मित
- क्रीडांगण – क्रीडेसाठी अंगण – चतुर्थी – गायरान, पोळपाट, वाटखर्च, पूजाद्रव्य, बाइलवेडा
- ऋणमुक्त – ऋणातून मुक्त – पंचमी – सेवानिवृत्त, गर्भश्रीमंत, जातिभष्ट, चोरभय, जन्मखोड
- राजपुत्र – राजाचा पुत्र – षष्ठी – देवपुजा, राजवाडा, घोडदौड, धर्मवेड, आंबराई
- घरजावई – घरातील जावई – सप्तमी – स्वर्गवास, वनभोजन, पोटशूळ, कूपमंडूक, घरधंदा
- 2. अलुक तत्पुरुष
ज्या विभक्ती तत्पुरुष समासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात. अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा.
- तोंडी लावणे
- पाठी घालणे
- अग्रेसर
- कर्तरीप्रयोग
- कर्मणी प्रयोग
- 3. उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष
ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.
उदा.
- ग्रंथकार – ग्रंथ करणारा
- शेतकरी – शेती करणारा
- लाचखाऊ – लाच खाणारा
- सुखद – सुख देणारा
- जलद – जल देणारा
वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.
नंतर दुसर्याद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.
इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.
- 4. नत्र तत्पुरुष समास
ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात. म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात. उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)
उदा.
- अयोग्य – योग्य नसलेला
- अज्ञान – ज्ञान नसलेला
- अहिंसा – हिंसा नसलेला
- निरोगी – रोग नसलेला
- निर्दोष – दोषी नसलेला
- 5. कर्मधारय तत्पुरुष समास
ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.
उदा.
- नील कमल – नील असे कमल
- रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
- पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
- महादेव – महान असा देव
- पीतांबर – पीत असे अंब ज्याचेपीत (पिवळे,अंबरवस्त्र)
- मेघशाम – मेघासारखा काळा
- चरणकमळ – चरण हेच कमळ
- खडीसाखर – खडयसारखी साखर
- तपोबळ – तप हेच बळ
कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.
उदा.
- महादेव – महान असा देव
- लघुपट – लहान असा पट
- रक्तचंदन – रक्तासारखे चंदन
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारेय असे म्हणतात.
उदा.
- पुरुषोत्तम – उत्तम असा पुरुष
- मुखकमल – मुख हेच कमल
- वेशांतर – अन्य असा वेश
- भाषांतर – अन्य अशी भाषा
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधरय असे म्हणतात.
उदा.
- लालभडक – लाल भडक असा
- श्यामसुंदर – श्याम सुंदर असा
- काळाभोर – काळा भोर असा
- पांढराशुभ्र – पांढरा शुभ्र असा
- हिरवागार – हिरवागार असा
- कृष्णधवल – कृष्ण धवल असा
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते. उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
- वज्रदेह – वज्रासारखे देह
- चंद्रमुख – चंद्रासारखे मुख
- राधेश्याम – राधेसारखा शाम
- कमलनयन– कमळासारखे नयन
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
- मुखचंद्र – चंद्रासारखे मुख
- नरसिंह – सिंहासारखा नर
- चरणकमल – कमलासारखे चरण
- हृदयसागर – सागरासारखे हृदय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.
उदा.
- सुयोग – सु (चांगला) असा योग
- सुपुत्र – सु (चांगला) असा पुत्र
- सुगंध – सु (चांगला) असा गंध
- सुनयन – सु (चांगला) असा डोळे
- कुयोग – कु (वाईट) असा योग
- कुपुत्र – कु (वाईट) असा पुत्र
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
- विधाधन – विधा हेच धन
- यशोधन – यश हेच धन
- तपोबल – ताप हेच बल
- काव्यांमृत – काव्य हेच अमृत
- ज्ञांनामृत – ज्ञान हेच अमृत
- 6. व्दिगू समास
ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात.
उदा.
- नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
- पंचवटी – पाच वडांचासमूह
- चातुर्मास – चार मासांचा समूह
- त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
- त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह
- सप्ताह – सात दिवसांचा समूह
- चौघडी – चार घडयांचा समुह
- 7. मध्यमपदलोपी समास
ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारेय समास असेही म्हणतात.
उदा.
- साखरभात – साखर घालून केलेला भात
- पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी
- कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे
- घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार
- बालमित्र – बालपणापासूनचा मित्र
- चुलत सासरा – नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा
- लंगोटी मित्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र
ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
उदा.
- रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
- विटीदांडू – विटी आणि दांडू
- पापपुण्य – पाप आणि पुण्य
- बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
- आईवडील – आई आणि वडील
- स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
- कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
- ने-आण – ने आणि आण
- दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर
व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.
- 1. इतरेतर व्दंव्द समास
ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
- आईबाप – आई आणि बाप
- हरिहर – हरि आणि हर
- स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
- कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
- पशुपक्षी – पशू आणि पक्षी
- बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
- डोंगरदर्यात – डोंगर आणि दर्यात
- 2. वैकल्पिक व्दंव्द समास
ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
- खरेखोटे – खरे आणि खोटे
- तीनचार – तीन किंवा चार
- बरेवाईट – बरे किंवा वाईट
- पासनापास – पास आणि नापास
- मागेपुढे – मागे अथवा पुढे
- चुकभूल – चूक अथवा भूल
- न्यायान्याय – न्याय अथवा अन्याय
- पापपुण्य – पाप किंवा पुण्य
- सत्यासत्य – सत्य किंवा असत्य
- 3. समाहार व्दंव्द समास
ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.
उदा.
- मिठभाकर – मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी
- चहापाणी – चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ
- भाजीपाला – भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु
- अंथरूणपांघरून – अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्या वस्तु व इतर कपडे
- शेतीवाडी – शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता
- केरकचरा – केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ
- पानसुपारी – पान, सुपारी व इतर पदार्थ
- नदीनाले – नदी, नाले, ओढे व इतर
- जीवजंतू – जीव, जंतू व इतर किटक
ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा.
- नीलकंठ – ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)
- वक्रतुंड – ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)
- दशमुख – ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)
बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.
- 1. विभक्ती बहुव्रीही समास
ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा.
- प्राप्तधन – प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती
- जितेंद्रिय – जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती
- जितशत्रू – जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती
- गतप्राण – गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती
- पूर्णजल – पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती
- त्रिकोण – तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती
- 2. नत्र बहुव्रीही समास
ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.
उदा.
- अनंत – नाही अंत ज्याला तो
- निर्धन – नाही धन ज्याकडे तो
- नीरस – नाही रस ज्यात तो
- अनिकेत – नाही निकेत ज्याला तो
- अव्यय – नाही व्यय ज्याला तो
- निरोगी – नाही रोग ज्याला तो
- अनाथ – ज्याला नाथ नाही असा तो
- अनियमित – नियमित नाही असे ते
- अकर्मक – नाही कर्म ज्याला ते
- अखंड – नाही खंड ज्या ते
- 3. सहबहुव्रीही समास
ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.
उदा.
- सहपरिवार – परिवारासहित असा जो
- सबल – बलासहित आहे असा जो
- सवर्ण – वर्णासहित असा तो
- सफल – फलाने सहित असे तो
- सानंद – आनंदाने सहित असा जो
- 4. प्रादिबहुव्रीही समास
ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा.
- सुमंगल – पवित्र आहे असे ते
- सुनयना – सु-नयन असलेली स्त्री
- दुर्गुण – वाईट गुण असलेली व्यक्ती
- प्रबळ -अधिक बलवान असा तो
- विख्यात – विशेष ख्याती असलेला
- प्रज्ञावंत – बुद्धी असलेला.
समास म्हणजे काय आसायमेन्ट
Nice
वैकल्पीक द्वंद समासचे10 उदाहरने
10th all marathi व्याकरण pathava
Sir Marathi sub chya purn notes dya plz
Thanks you
So nice
Your brilliant mam and thanku very much mam
Thank you