राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1
राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1
- इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले.
- इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी ‘स्वराज्य’ हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावरून ‘स्वराज्य’ या ध्येयाची प्रथमच घोषणा. याच अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला.
- 1907 च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.
- व्हाईसरॉय कर्झनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय बनला.
- भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून रिपनला ओळखतात.
- हार्डिंगने ब्रिटिशांची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलवली.
- भारतमंत्री मॉन्टेंग्यूच्या रोपोर्टनूसार व्हाईसरॉय चेम्सफोर्डने प्रांतात वैध प्रशासनाचा (व्दिदल शासनपद्धती) प्रारंभ केला.
- 1919 ला पंजाब प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.
- 13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग हत्याकांड घडले.
- लखनौ अधिवेशन (1916): या अधिवेशनात काँग्रेस 1907 नंतर सांधली गेली. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजूमदार. या अधिवेशनात 1909 च्या मॉर्ले मिंटो कायद्याव्दारे मुस्लिमांना दिलेल्या स्वतंत्र मतदार संघाची तरतूद काँग्रेसने मान्य केली.
- होमरूल चळवळ म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळणे होय.
- होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.
- होमरूल चळवळ भारतात सुरू करण्याचे श्रेय आयरिश विदुषी अॅनी बेझेंटकडे जाते.
- 1 सप्टेंबर 1916 पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.
- एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे स्वतंत्रपणे होमरूल चळवळीसाठी संघटना स्थापन केली.