Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास

महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास

Must Read (नक्की वाचा):

मुघल साम्राज्याचा उदय

1. देवगिरीचे यादव घराणे –

 • देवगिरीचे यादव घराणे महाराष्ट्राच्या मध्ययुगीन इतिहासातील सोनेरी पान म्हणून ओळखले जाते.
 • यादव घराण्याच्या काळामध्ये मराठी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा मिळाला.
 • देवगिरीचे यादव हे भगवान श्रीकृष्णाच्या वंशातील असून या घराण्यातील राजा पाचवा भिल्लमने (सन 1178 ते 1193) देवगिरी येथे आपले राज्ये स्थापन केले. त्यानंतरच्या काळात देवगिरी येथे खालील पराक्रमी राजे होवून गेले.
 • भिल्लम पाचवा (सन 1178 ते 1193) – या राजाने दिवगिरी येथे यादव घराण्याची सत्ता स्थापन केली.
 • जतुनी उर्फ जैत्रपाल (सन 1193 ते 1210) हा पाचव्या भिल्लमचा मुलगा असून त्याने गुजरातमधील परमार आणि दक्षिणेतील चोळ राजाचा पराभव केला.
 • सिंघम(सन 1210 ते 1247) – सिंघम या यादव घराण्यातील सर्वात पराक्रमी राजा म्हणून ओळखला जातो. सिंघमने नर्मदा ते तुंगभद्रेपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.
 • महादेव (सन 1260 ते 1271) – महादेव हा कृष्ण याचा सर्वात लहान मुलगा होता.
 • रामदेवराय (सन 1271 ते 1310) – महादेवाच्या निधनांतर त्यांचा मोठा भाऊ रामदेवराय सत्तेत आला. रामदेवरायने राज्यसत्ता ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपल्या राज्याचा विस्तार अर्ध्या भारतावर केला होता.
 • शंकरदेव (सन 1310 ते 1312) – सन 1310 मध्ये रामदेवराय मरण पावल्यानंतर त्याचा मुलगा शकरदेव सत्तेमध्ये आला. शंकरदेवने अल्लाउद्दिनला खंडणी पाठविणे बंद केले. यामुळे अल्लाउद्दीनचा सेनापती मालिक काफुरने सन 1312 मध्ये शंकरदेवचा पराभव करून देवगिरीचे राज्य खिलजी साम्राज्यात केले. त्यानंतर शिवाजी महाराजाची राज्यसत्ता स्थापन होईपर्यंत महाराष्ट्रात मुस्लिमांची सत्ता होती.
 • अल्लाउद्दीन नंतरचे राजे – अल्लाउद्दीन खिलजीच्या काळापासून महाराष्ट्रावर मुस्लिमांच्या सत्तेला सुरुवात झाली. अल्लाउद्दीन खिलजीनंतर दिल्लीच्या तख्तावर मालिककाफुर, मुबारक खिलजी, गियासुद्दीन तुघलक व शेवटी महमंद-बिन-तुघलक इत्यादि सत्ताधीश आले.
 • देवगिरी भारताची राजधानी (1326) – दिल्लीचा बादशहा महमंद-बिन-तुघलकने आपल्या राज्याच्या केंद्रवर्ती ठिकाण म्हणून देवगिरीची तुघलक साम्राज्याची राजधानी म्हणून निवड केली. सन 1326 मध्ये त्याने दिल्लीच्या जनतेसह देवगिरी येथे आगमन केले. यावेळी देवगिरीचे नांव दौलताबाद असे करण्यात आले. परंतु, दौलताबाद येथे साधनांचा अभाव असल्यामुळे पुन्हा त्याने दिल्लीला प्रस्थान केले. या काळात देवगिरीला भारताचा राजधानीचा सन्मान प्राप्त झाला होता.     

2. बहमनी साम्राज्याची स्थापना –

 • महमंद-बिन-तुघलकच्या संशयी स्वभावामुळे त्याच्या बर्‍यास सुभेदारांनी त्याच्या विरूद्ध बंड केले. त्यापैकी हसन गंगू बहमनशाह एक होता.
 • त्याचे सन 1347 मध्ये स्वत:ला दौलताबाद येथे स्वत:चा राज्याभिषेक करून राजा म्हणून घोषित केले बहमनी वंशाची स्थापना केली.
 • हसन गंगूने सत्ता स्थापित केल्याबरोबर दौलताबादची राजधानी गुलबर्गा येथे नेली. बहमनी वंशात खालील राजे होवून गेले.
 • हसन गंगू (1347 ते 1358) – गंगू हसन या राजाने बहमनी वंशाची स्थापना केली.
 • मुहंमदशहा पहिला (1358 ते 1373) – हा राजा कलेचा चाहता होता. गुलबर्गामधील शाही मशीद, व उस्मानाबादमधील शमशूद्दिनची कबर बांधली व प्रशासकीय सुधारणा केल्या. या राजाला इजिप्तच्या खलिफाने दक्षिण भारताचा सुलतान अशी मान्यता दिली होती.
 • मुहंमदशहा दूसरा (1377 ते 1997) – सन 1377 मध्ये महंमदशाह दूसरा सत्ताधीश झाला. त्याला दक्षिणेचा ऑरिस्टॉटल असे म्हणतात आणि प्रसिद्ध इराणचा कवी हाफिज त्याच्या दरबारात होता.
 • फिरोजशहा (सन 1397 ते 1422) – या काळात विजयनगर आणि बहमनी साम्राज्यामध्ये सतत लढाया होत असे. यानंतरच्या काळात बहमनी वंशामध्ये अहमदशहा (1422 ते 1435), अल्लाउद्दीन दुसरा (1435 ते 57) इत्यादि सुलतान होवून गेले. याचा कार्यकाल विजयनगर साम्राज्याचा संघर्षात गेला.
 • हुमायू (1457 ते 1461) – सन 1457 मध्ये महमुद गवान नावाचा वजीर बहमनी वंशामध्ये आला. त्यास हुमायूने आपला वजीर म्हणून नेमले. यानंतरच्या काळात सन 1481 पर्यंत बहमनी वंशाची राज्यकारभाराची सूत्रे महंमद गवानच्या हातात होती.

 

3. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र –

 • बहमनी राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रामध्ये विजापूर(आदिलशाही), अहमदनगरची (निझामशाही), गोवळकोडयांची (कुतुबशाही), बिदरची (बिदरशाही) आणि वर्‍हाडची (इमानशाही) ही पाच स्वतंत्र राज्ये उदयास आली. हे राजे सत्तासंघर्षांकरिता आपआपसात लढाया करीत असे.
 • या कामाकरिता हे राजे लोक मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेत असे. यामुळे महाराष्ट्रात अनेक पराक्रमी घराने उदयास आली.
 • त्यात सिंधखेडचे जाधव, फलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले पराक्रमी घराने होते. या सर्वामध्ये भोसले घराण्याचा विशेष दबदबा होता.
 • कोणताही मराठा सरदार सुलतानकडे गेला की, सुलतान त्यास चाकरीत ठेवत असे व त्यास सरदारकी व जहागिरी देत असे.
 • हे सरदार जहागिरीवर खुश असे आणि स्वत:ला राज्यासारखे समजत असे.
 • शिवाजी महाराजांचा जन्म होण्यापूर्वी भोसले घराण्यात खालील व्यक्ति प्रसिद्धीस आल्या.
 • बाबाजीराजे भोसले – बाबाजी भोसले हे भोसले घराण्याचा मूळ पुरुष मनाला जातो. त्यांच्याकडे वेरूळ गावची पाटिलकी होती. त्यांना मालोजीराजे व विठोजीराजे असे दोन मुले होती.
 • मालोजीराजे भोसले – मालोजीराजे भोसले घराण्यातील पहिला पराक्रमी पुरुष मनाला जातो. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. त्यांना शहाजीराजे व शरीफजी असे दोन मुले होती. शहाजीराजे पाच वर्षाचे असतांना इंदापूरच्या लढाईत मालोजीराजे मारले गेले.
 • शहाजीराजे भोसले – भोसले घराण्यातील सर्वात पराक्रमी व्यक्ति म्हणून शहाजीराजे ओळखले जातात. निजामाने मालोजीराजांची जहागिरी शहाजीराजांच्या नावे करून दिली. सन 1664 मध्ये शिकारीच्या प्रसंगी शहाजीराजेंचे निधन झाले.

4. हिंदवी स्वराज्याची स्थापना –

 • हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्यावर झाला.
 • शिवनेरी किल्यातील शिवाई देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले.
 • शहाजी महाराजांनी जिजामाता व शिवाजीराजे यांचेकडे पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी सोपविली. त्यापूर्वी ही जबाबदारी दादाजी कोंडदेव यांच्या कडे होती.
 • ते कोढाण्याचे सुभेदार होते व शहाजीराजांचे इनामी सेवक होते.
 • शहाजीराजे व जिजामातेवर त्याची निष्ठा होती.
 • पुण्यातील जहागिरीचा कारभार – पुण्यात शिवाजी महाराज व जिजामाता यांना राहण्याकरिता लाल महाल बांधण्यात आला.
 • स्वराज्याची स्थापना (सन 1645) – जिजामातेने शिवाजी राजांना दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. सन 1645 मध्ये शिवाजी महाराज व दादाजी नरसप्रभू, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, कान्होजी जेधे इत्यादि सवंगड्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली.
 • राजधानीची स्थापना – स्वराज्याच्या स्थापनेनंतर शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम तोरणा व रोहिंडा हे किल्ले ताब्यात घेतले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी निवडली.
 • प्रतापगडची लढाई (सन 1659) – शिवाजी महाराजांचा हा प्रताप पाहून आदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला व या कामगिरीवर वाईचा सुभेदार अफजलखानास पाठविण्यात आले. नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज व अफजलखान यांच्यात झालेल्या भेटीमध्ये शिवाजी महाराजांकडून खान मारला गेला. या भेटीत वेडा सय्यदच्या हल्यापासून जिवा महालने महाराजांना वाचविले.
 • सिद्दी जौहरची स्वारी (सन 1660) – सन 1660 मध्ये आदिलशाहाने कर्नुल प्रांताचा सरदार सिद्दी जौहर याच महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. आदिलशहाने त्यास सलाबतखान हा किताब दिला होता. यावेळी शिवाजी महाराज पन्हाळयावर होते म्हणून सिद्दीने प्रचंड फौजेनिशी पन्हाळ्यात वेढा घातला. सिद्दी जौहरची नजर चुकवून शिवाजी महाराज पन्हाळ्यावरुन निसटले. विशालगडाकडे कूच केले. 14 जुलै 1660 रोजी महाराज आपल्या सवगंड्यासहित विशालगडावर जात असतांना बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या निवडक सहकार्‍यांना सोबत्यासह गजापुरजवळील घोडखिंडीमध्ये सिद्दी जौहरच्या सेनेसोबत झुंज दिली व या लढाईत ते धारातीर्थी पडले. आज ही खिंड पावनखिंड म्हणून ओळखली जाते.
 • मुघलांशी संघर्ष –
 • शाहीस्तेखानची स्वारी (सन 1660) – याच काळात औरंजेबाने प्रचंड फौजेनिशी शहिस्तेखानास स्वराज्यावर आक्रमण करण्यास पाठविले. तीन वर्षे त्याचा मुक्काम पुण्याच्या लाल महालमध्ये होता. शिवाजी महाराजांनी एप्रिल 1663 मध्ये आपल्या सवंगड्यासह रात्री लाल महालात प्रवेश करून शहिस्तेखानाची बोटे छाटली.
 • मिर्झाराजे जयसिंग (सन 1665) – शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याकरिता औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंग यांना महाराष्ट्रात पाठविले. मिर्झाराजे जयसिंगने महाराष्ट्रात आल्यानंतर सेनेनिशी पुरंदरला वेढा दिला.
 • आग्रावरून सुटका (सन 1666) – तहानुसार महाराजांनी औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आग्रास भेट देण्याचे काबुल केले आणि आग्र्यात महाराजांच्या संरक्षणाची जाबाबदारी मिर्झाराजे यांचा मुलगा रामसिंगने स्वीकारली. 5 मार्च 1666 रोजी शिवाजी महाराज राजपुत्र संभाजी, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, हिरोजी फर्दर, मदारी मेहतर, प्रतापराव गुर्जर व बर्हीजी नाईक इत्यादिस सहकार्‍यांना घेवून ते आग्रास पोहचले. 18 ऑगस्ट 1666 रोजी महाराज बादशाच्या हातावर तुरी देवून महाराष्ट्रात परतले. सन 1670 मध्ये तानाजी मालसरेंनी प्राणाची बाजी लावून कोंढाणा जिंकला.

5. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक (सन 1674) –

 • स्वराज्य स्थापन करण्यात आले हे जगजाहीर व्हावे म्हणून शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रोजी रायगडावर आपला राज्यशिषेक करवून घेतला.
 • काशीचे पंडित गागाभट्ट यांनी राज्यशिषेक समारंभाचे पौरोहित्य केले. या दिवसापासून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली.
 • सोन्याचा होन व तांब्याची शिवराई नाणे सुरू करण्यात आले.
 • शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश तयार केला.
 • अष्टप्रधान मंडळ – राज्यभिषेकच्या निमित्ताने स्वराज्याच्या राज्यकारभार चालविण्याकरिता अष्टप्रधान मंडळ स्थापन करण्यात आले आणि प्रत्येकावर स्वतंत्र जाबबदारी सोपविण्यात आली.
 • मुलकी व्यवस्था – शिवाजी महाराजांनी स्वराज्याची बारा सुभ्यामध्ये राज्याची विभागणी केली आणि प्रत्येक सुभ्यावर सुभेदार नावाचा अंमलदार नेमला.
 • सैन्य व्यवस्था – स्वराज्याच्या संरक्षणार्थ महाराजांनी घोळदळ व पायदळ हे सैन्य विभाग तयार केले आणि सागरी किनार्‍याच्या संरक्षणाकरिता आरमार उभारले.
 • किल्याची व्यवस्था – शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी त्यांच्याकडे 300 च्यावर किल्ले होते. त्या किल्याच्या संरक्षणाकरिता किल्लेदार, सबनीस व कारखानीस इत्यादि अधिकारी नेमले.

6. दक्षिणेची मोहीम (1677) –

 • राज्यभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी राज्यविस्ताराच्या उद्देशाने दक्षिणेकडील मोहीम हाती घेतली.
 • यामोहिमेत त्यांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशासोबत मैत्रीचा तह केला.
 • कर्नाटकाच्या मोहिमेत त्यांनी जिंजी व वेल्लोर जिंकले.
 • उत्तरेकडील हिंदी कवि भूषण यांनी शिवाजी महाराजांच्या नावावर शिवराज भूषण या नावाने काव्य लिहिले.
 • दक्षिणेच्या मोहिमेत दगदग झाल्याने ज्वराने आजारी पडून 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचे निधन झाले.
Must Read (नक्की वाचा):

विजयनगर व बहमनी राज्ये

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World