Current Affairs of 2 October 2015 For MPSC Exams

चालू घडामोडी (2 ऑक्टोंबर 2015)

सानिया आणि मार्टिना ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेच्या उपांत्यफेरीत :

  • भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वीत्झर्लंडची मार्टिना हिंगीस या जोडीने ओपन डब्ल्यूटीए स्पर्धेची उपांत्यफेरी गाठली.
  • अव्वल मानांकित सानिया आणि हिंगीस यांनी उपांत्यपूर्व फेरीत पाचव्या मानांकित प्राप्त अमेरिकेच्या राकेल कोप्स जोन्स आणि एबिगेल स्पीयर्सचा 6-2, 6-2 असा पराभव केला.
  • दुसऱ्या फेरीत त्यांनी क्लाउडिया जान्स इग्नासिक आणि अनास्तासिया रोडियोनोव्हा यांचा 6-3, 6-2 असा पराभव केला होता, तर पहिल्या फेरीत त्यांना बाय मिळाला होता.
  • सानिया-हिंगीस जोडीने या वर्षी विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन विजेतेपद पटकावलेले आहे.

देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी राष्ट्रीय धोरण :

  • देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी पुढील वर्षी नवे सर्वंकष राष्ट्रीय धोरण आणण्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणमंत्री थावरचंद गहलोत यांनी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येथे आयोजित कार्यक्रमात केली.
  • लवकरच नवे राष्ट्रीय धोरण अवलंबले जाईल.
  • समाजाने वृद्धांकडे लक्ष देण्याची आवश्यकता लक्षात घेता नवे धोरण त्या दिशेने ठोस पाऊल टाकणारे ठरेल.
  • समाजातील बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे नव्या राष्ट्रीय धोरणाची गरज प्रतिपादित करताना त्यांनी वृद्धांना अधिक सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले.
  • सरकारने याआधीच स्वयंसेवी संस्था आणि अन्य घटकांकडून सूचना आणि शिफारशी मागितल्या आहेत.
  • 1999 मध्ये अवलंबण्यात आलेल्या राष्ट्रीय धोरणाची जागा नव्या सर्वसमावेशक धोरणाने घेतलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला :

  • विदर्भाच्या कॅलिफोर्नियातील संत्रा उत्पादकांची ससेहोलपट थांबविण्यासाठी वरूड तालुक्यात राज्यातील पहिला डिहायड्रेशन प्रकल्प उभारला जाणार आहे.
  • तसेच मोर्शी तालुक्यात संत्रा रस प्रक्रिया केंद्रही सुरू केली जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे आयोजित राष्ट्रीय कृषी व संत्रा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.
  • युती शासन जलयुक्त शेतशिवाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संरक्षित सिंचन देण्याचा प्रयत्न करीत आहे.
  • सहा हजार गावांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे.
  • संत्र्याला बाजारपेठ मिळाली पाहिजे, याकरिता राज्यातील 10 शहरांमध्ये जागा उपलब्ध करुन देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत :

  • मकरंद अनासपुरे, नाना पाटेकर, अक्षय कुमार यांच्यापाठोपाठ आता अभिनेते प्रशांत दामले यांनीही दुष्काळग्रस्तांना मदत दिली आहे.
  • प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 1 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला असून जलयुक्तशिवार योजनेसाठी ही मदत वापरली जाणार आहे.
  • पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात भीषण दुष्काळाचे सावट असून दुष्काळग्रस्तांसाठी सिने व क्रीडा क्षेत्रातील मंडळी सरसावली आहेत मकरंद अनासपुरे व नाना पाटेकर यांनी ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून दुष्काळग्रस्तांना मदत करायला सुरुवात केली आहे.
  • अक्षय कुमारनेही दुष्काळग्रस्तांना 90 लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
  • या यादीत आता प्रशांत दामले यांचाही समावेश झाला आहे. दामले यांनी एक लाख रुपयांची मदत दिली आहे.

दिनविशेष :

  • 1869 : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरातमधील पोरबंदर येथे जन्म
  • 1904 : माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्म.

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago