Current Affairs of 19 December 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (19 डिसेंबर 2016)

भारताचे नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल बिपिन रावत :

  • भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली आहे.
  • नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी.एस. धनोआ यांचेही नाव सरकारने जाहीर केले आहे.
  • 1978 मध्ये गोरखा रायफल्समधून रावत यांनी लष्करातील सेवेस सुरवात केली होती. रावत यांना उंचावरील लढायांचा आणि घुसखोरीविरोधी मोहिमांचा मोठा अनुभव आहे.
  • हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अरूप राहा हे 31 डिसेंबरला निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागी धनोआ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तसेच बी.एस. धानोआ सध्या हवाई दलाचे उपप्रमुख आहेत.

देशातील पहिला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प :

  • नागपूर महापालिका व महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने भांडेवाडी येथे 130 एमएलडी क्षमतेचा सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प उभारण्यात आला असून देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच मोठा प्रकल्प ठरला आहे.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचे 18 डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले.
  • जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेद्वारे उभारण्यात आलेल्या 195 कोटींच्या या प्रकल्पातील पाणी महानिर्मितीच्या कोराडी येथील वीज प्रकल्पाकरिता वापरण्यात येणार आहे.
  • तसेच यामुळे 130 एमएलडी शुद्ध पाण्याची बचत होऊन सुमारे नऊ लाख लोकांना पुरेल एवढे पाणी उपलब्ध झाले आहे; सोबतच वैनगंगा नदीचे प्रदूषण कमी होण्यास मदत झाली आहे.
  • देशात सर्वप्रथम नागपूर महापालिकेने सांडपाणी पुन:चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्प सुरू केला असून, पर्यावरणाच्या दृष्टिकोणातून नदीचे प्रदूषण कमी होऊन शुद्ध पाण्याची बचत होणार आहे.

भारताने जिंकला हॉकी ज्युनियर विश्वचषक :

  • भारताच्या ज्युनिअर संघाने जबरदस्त सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना बलाढ्य बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून दुसऱ्यांदा ज्युनिअर विश्वचषक हॉकीचे जेतेपद पटकावले.
  • खचाखच भरलेल्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये संपूर्ण सामन्यात ‘इंडिया.. इंडिया’ असा जयघोष सुरू होता. भारतीयांच्या प्रत्येक हालचीलीवर प्रेक्षकांनी जबरदस्त जल्लोष करताना खेळाडूंचा उत्साह वाढवला.
  • विशेष म्हणजे, याआधी 2013 मध्ये दिल्लीला झालेल्या स्पर्धेत भारताला दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले होते, तर 2005 मध्ये स्पेनमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताला कांस्यपदकाच्या लढतीत पराभवास सामोरे जावे लागल्याने चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
  • प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर मेहनत घेतलेल्या युवा भारतीयांनी शानदार खेळ करताना अभिमानाने तिरंगा फडकावला.

विजेंदर सिंगला ‘आशिया-पॅसिफिक सुपर मिडलवेट’ स्पर्धेत अजिंक्‍यपद :

  • भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने टांझानियाच्या फ्रान्सिस चेका याचा निर्णायक पराभव करत जागतिक मुष्टियुद्ध संघटनेचे “आशिया-पॅसिफिक सुपर मिडलवेट” अजिंक्‍यपद कायम राखण्यात यश मिळविले.
  • सुपर टांझानियाच्या माजी जागतिक विजेत्या फ्रान्सिस चेकाला 10 मिनिटांमध्ये लोळवून मिडलवेट किताब यशस्वीपणे आपल्याकडे राखत विजेंदरने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आपली विजयी घोडदौड कायम राखताना सलग 8 वा विजय मिळवला.
  • डब्ल्यूबीओ आशिया प्रशांत किताब जिंकून त्याचे यशस्वी संरक्षण केल्यानंतर भारताचा स्टार बॉक्सर विजेंदर सिंगची नजर आता नव्या किताबावर आहे.

आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्र हिंदी महासागर :

  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची नियुक्ती झाल्याने आंतंरराष्ट्रीय राजकारणात अस्थिरता वाढली आहे.
  • राजनैतिक अधिकाऱ्यांना ट्रम्प यांच्याबाबत अंदाज बांधणे अवघड झाले आहे. त्यामुळे भारताला चौकटीबाहेर जाऊन आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करावा लागेल.
  • तसेच त्यात हिंदी महासागराला आंतरराष्ट्रीय स्थरावर मोठे महत्त्व प्राप्त झाले असून भविष्यात हिंदी महासागराकडे संघर्षाचे, सहकार्याचे आणि विकासाचा केंद्रबिंदू म्हणून पाहिले जाणार आहे, असे मत इंडिया फाऊंडेशनचे संचालक राम माधव यांनी व्यक्त केले.
  • सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सिंबायोसिस स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या (एसएसआयएस) वतीने आयोजित ‘भारत आणि भारतीय सागरी सीमा:शाश्वतता, सुरक्षा आणि विकास’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

9 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

9 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago