Current Affairs of 18 March 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (18 मार्च 2016)

अर्थसंकल्पीय अधिवेशनात 10 विधेयके मंजूर :

  • संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा (दि.16) संध्याकाळी संपला.
  • संसदेची दोन्ही सभागृह 25 एप्रिलपर्यंत 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली.
  • अधिवेशनाचा पहिला टप्पा सकारात्मक ठरला, 23 फेब्रुवारीपासून अधिवेशन सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात संसदेने 10 विधेयके मंजूर केली.
  • लोकसभेने नऊ विधेयके मंजूर केली तर, राज्यसभेने 11 विधेयके पास केली.
  • मागच्या तीन वर्षात सरकारच्या विविध मंत्रालयांनी परदेश दौ-यांवर 1500 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेला दिली.
  • जानेवारीपासून झालेल्या नव्या नियमानुसार एकावर्षात अधिकारी चारपेक्षा जास्त परदेश दौरे करु शकत नाही तसेच हे दौरे पाच दिवसांपेक्षा जास्त असू नयेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (17 मार्च 2016)

आनंदी देशांमध्ये भारत 118 व्या स्थानी :

  • संयुक्त राष्ट्राने आनंदी देशांची जागतिक यादी जाहीर केली आहे.
  • तसेच या यादीत 156 देशांमध्ये भारत 118 व्या स्थानी आहे.
  • दहशतवादाने ग्रासलेले पाकिस्तान, सोमालिया हे देश आनंदी असण्यामध्ये भारताच्या पुढे आहेत.
  • सोमालिया 76, चीन 83, पाकिस्तान 92, आणि बांगलादेश 110 व्या स्थानी आहे.
  • स्वित्झर्लंडवर मात करुन डेन्मार्कने या यादीत पहिले स्थान मिळवले आहे.

‘एच-1 बी’ व्हिसा 1 एप्रिलपासून :

  • आगामी आर्थिक वर्षासाठी एच-1 बी‘ व्हिसासाठी अर्ज स्वीकारण्यास येत्या 1 एप्रिलपासून सुरवात होणार आहे.
  • अमेरिकी कंपन्यांकडून कुशल परदेशी कर्मचाऱ्यांच्या अमेरिकेतील नियुक्तीसाठी या व्हिसाचा वापर केला जातो.
  • मुख्यत्वे भारतीय कर्मचाऱ्यांना या व्हिसाचा सर्वाधिक लाभ होतो.
  • अमेरिकेतील आर्थिक वर्ष 1 ऑक्‍टोबरपासून सुरू होते.
  • 2017 च्या आर्थिक वर्षासाठी अमेरिकी संसदेने 65,000 ‘एच-1 बी‘ व्हिसा देण्यास मंजुरी दिली आहे.
  • तसेच अमेरिकेतील मास्टर्स किंवा त्यापेक्षा वरची पदवी असलेल्यांसाठी अतिरिक्त 20,000 ‘एच-1 बी‘ व्हिसाची तरतूद करण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील नागरिकत्व आणि स्थलांतरितांविषयक सेवा विभागाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्कार :

  • लोकमत समूहातर्फे सन्मानपूर्वक प्रदान केल्या जाणाऱ्या महाराष्ट्रीयन ऑफ द ईअर पुरस्कारांसाठीचे ज्युरी मंडळ जाहीर झाले असून त्यात विविध क्षेत्रांतल्या अनेक मान्यवरांचा समावेश आहे.
  • लोकसेवा-समाजसेवा, विज्ञान तंत्रज्ञान, परफॉर्मिंग आर्ट, कला, क्रीडा, रंगभूमी, चित्रपट, इन्फ्रास्ट्रक्चर, बिझनेस, प्रशासन आणि सर्वांच्या उत्सुकतेचे क्षेत्र राजकारण अशा 14 कॅटेगरीतील नामांकने ऑनलाइनवर जाहीर झाली आहेत.
  • ज्युरी मंडळात देशाचे माजी गृहमंत्री व राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे अग्रभागी आहेत.
  • शिपाई ते देशाचे गृहमंत्री असा त्यांचा विलक्षण प्रभावी प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरलेला आहे.
  • 20 वर्षे खासदार, अवजड उद्योग मंत्रालय व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे खा. प्रफुल्ल पटेल दुसरे ज्यूरी असतील.
  • टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मधील निवृत्त शास्त्रज्ञ व ‘पद्मभूषण’चे मानकरी प्रा. शशिकुमार चित्रे ज्यूरीत आहेत.
  • पदव्युत्तर शिक्षण परदेशात घेतल्यानंतर आवर्जून मायदेशी परतलेले आघाडीचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ म्हणून ते ओळखले जातात.

मोबाइल बँकिंग 60 हजार कोटींच्या वर :

  • स्मार्टफोनची वाढती संख्या आणि इंटरनेटचा वाढता वेग या दोन्ही गोष्टी बँकिंग उद्योगाच्या पथ्यावर पडल्या असून, यामुळे आर्थिक वर्षात मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून विक्रमी 60 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
  • विशेष म्हणजे, हे व्यवहार रोखीऐवजी ई-पद्धतीने झाल्यामुळे किमान 100 कोटी रुपयांच्या व्यवहार खर्चाची बचत झाली आहे.
  • बँकिंग व्यवहार जलद होतानाच ग्राहकांना बँकेत ज्या-ज्या सुविधा उपलब्ध होतात, त्या सर्व सुविधा मोबाइलद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल व मोबाइल बँकिंग प्रकारावर जोर देण्यास सुरुवात केली आहे.
  • विशेषत: बँकांनी अनेक मोबाइल हँडसेट व सेवा देणाऱ्या कंपन्यांनी करार करीत ही सेवा अधिक सुलभ केल्यामुळे याचा वापर वाढला आहे.
  • मोबाइल बँकिंगची विश्वासार्हता वाढविण्यासाठी बँकांनी आता विशेष मोहीम सुरू केली असून, इंटरनेट बँकिंगमध्ये असलेल्या सर्वच बँकांनी आता स्वत:ची ‘अ‍ॅप’ सुरू केली आहेत.
  • तसेच प्रत्येक व्यवहाराकरिता सुरक्षेच्या विविध पातळ्या निर्माण केल्यामुळे हॅकिंगची शक्यता अतिशय कमी झाली आहे.
  • विशेष म्हणजे मोबाइल बँकिंग या प्रकारात खाजगी बँकांच्या तुलनेत देशातील सरकारी बँका अग्रेसर आहेत.
  • उपलब्ध माहितीनुसार, देशातील सर्वांत मोठी बँक असा लौकिक असलेल्या स्टेट बँकेने मोबाइल बँकिंगमध्येही पहिला क्रमांक कायम राखला असून, या क्षेत्रात बँकेची बाजारातील हिस्सेदारी 36 टक्के आहे.

विजय मल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स संघ संचालकपदाचा राजीनामा :

  • विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या (RCSPL) संचालकपदावरुन राजीनामा दिला आहे.
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने बीसीसीआयला ईमेल पाठवून याबद्दल माहिती दिली आहे.
  • तसेच रुसेल ऍडम्स यांची संचालकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
  • आम्हाला रुसेल ऍडम्स जे आता आरसीबी संघाचे प्रमुख असणार आहेत त्यांच्याकडून ईमेल मिळाला आहे.
  • विजय मल्ल्या यांनी रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदावरुन राजीनामा दिल्याची माहिती या मेलमध्ये देण्यात आली आहे.
  • तसेच त्यांचा मुलगा सिद्दार्थ मल्ल्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असेपर्यंत विजय मल्ल्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून असतील अशी माहितीदेखील मेलमधून दिल्याचं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितलं आहे.

दिनविशेष :

  • 1594 : स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले यांचा जन्म.
  • 1919 : रौलेट अ‍ॅक्ट पास झाला.
  • 1965 : अंतराळवीर अलेक्सी तिओनोवा हा अंतराळात चालला.
  • 1969 : ‘कॉसमॉस’ हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (19 मार्च 2016)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

8 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago