Current Affairs of 14 September 2015 For MPSC Exams

 चालू घडमिडी (14 सप्टेंबर 2015)

सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला टेनिस स्पर्धेतील विजेतेपद :

  • सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याच्यावर पुन्हा एकदा मात करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले.
  • जोकोविचच्या टेनिस कारकिर्दीतील हे 10 वे आणि या वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विजतेपद आहे.
  • अग्रमानांकन असलेल्या जोकोविचने फेडररचा 6-4, 5-7, 6-4, 6-4 असा पराभव केला.
  • जोकोविचने यंदा ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.
  • त्यानंतर त्याचे या वर्षातील हे तिसरे विजेतेपद आहे.
  • नोव्हाक जोकोविचची कारकीर्त :

  • काउंटडाऊन – फेडरर वि. जोकोविच
  • फेडडर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत 42 सामने. जोकोविच 22, तर फेडरर 20 वेळा विजयी
  • ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील यापूर्वीच्या सामन्यात जोकोविच विजयी. विंबल्डनच्या अंतिम सामन्यात जोकोविचची सरशी
  • जोकोविचचे कारकिर्दीतील 10 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद
  • टूरवरील यापूर्वीच्या सामन्यात फेडररची सरशी. ऑगस्टमध्ये सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फेडररचा विजय
  • फेडररची पुरुष एकेरीत सर्वाधिक 17 विक्रमी विजेतीपदे
  • फेडररचे यापूर्वीचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद 2012 मध्ये. तेव्हा तो विंबल्डनमध्ये विजेता
  • फेडरर अमेरिकन स्पर्धेत सलग पाच वेळा विजेता. 2004 ते 2008 मध्ये ही कामगिरी. 2009 मध्ये फेडररला उपविजेतेपद

मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा 130 फूट जाडीचा थर सापडला :

  • मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा 130 फूट जाडीचा थर सापडला असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
  • हा थराचा तुकडा कॅलिफोर्निया व टेक्सास यांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा आहे.
  • लाखो वर्षांपूर्वी मंगळावर बर्फवृष्टी झाली होती त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर म्हणजेच एमआरओ या अवकाशयानावरील दोन उपकरणांनी हे संशोधन केले आहे.
  • मंगळावर एक विवर भांडय़ासारखे गोलाकार नाही बाकीची सगळी विवरे भांडय़ासारखी खोलगट व गोलाकार आहेत.
  • मंगळावरील अर्काडिया प्लॅनशिया भागात अशी विवरे आहेत, ती वेगवेगळ्या काळात तयार झालेली असून तेथे कशाचा तरी वर्षांव झाल्याच्या खुणा आहेत.
  • एमआरओच्या जास्त विवर्तन असलेल्या प्रतिमा विज्ञान प्रयोगात (हायराइज) संशोधकांनी या विवराचे त्रिमिती प्रारूप तयार केले त्यामुळे त्यांना त्यांची खोली समजू शकली.

जर्मनीच्या महापौरपदी अशोक श्रीधरन यांची नियुक्ती :

  • जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणारे भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांना बॉनच्या महापौरपदासाठी निवडणूकपूर्व मतदानोत्तर चाचणीमध्ये सर्वाधिक पसंती असल्याचे समोर येत आहे.
  • मात्र अद्याप या तिघांपैकी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे याबद्दलचा निर्णय जवळपास 26 टक्के म्हणजेच 2.45 लाख मतदारांनी घेतला नसल्याने खरा निकाल यानंतर लागणार आहे.

पत्रकारांसाठी फेसबुकचे मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध :

  • पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले
  • अ‍ॅप व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांची माहिती दिली आहे.
  • पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले असून त्याच्या माध्यमातून पत्रकारांना त्यांच्या अनुसारकांशी संवाद साधता येईल.
  • शिवाय त्यांचे लेखनही पोहोचवता येईल.
  • पत्रकार या माध्यमातून जास्त माहिती वाचक व अनुसारकांपर्यंत पोहोचवू शकतील.
  • या अ‍ॅपचे उत्पादन व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांनी सांगितले की, पत्रकारच नव्हे तर इतरांनाही ही सुविधा उपलब्ध राहील.
  • फेसबुकने जुलै 2014 मध्ये मेन्शन्स अ‍ॅप सुरू केले होते पण ते वलयांकित म्हणजे सेलिब्रिटी व्यक्तींसाठी होते.
  • जर फेसबुक वापरकर्त्यांने द रॉक असे स्टेटस अपडेट केले तर तो वापरकर्ता त्याची नवीन माहिती मेन्शन्स अ‍ॅपमध्ये टाकू शकेल व त्यावर प्रतिसादही मिळू शकेल.
  • मेन्शन्स अ‍ॅप :
  • तुमचे फेसबुक खाते असेल तर एक ऑनलाईन फॉर्म भरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल
  • त्यासाठी तुमचे फेसबुक खाते खरे असले पाहिजे
  • लाइव्ह माहिती, छायाचित्रे, प्रश्नोत्तरे या सुविधा
  • पत्रकारांसाठी माहिती देवाणघेवाणीचे एक साधन
  • अर्थात यात कुणीही खोटी माहिती देणे दिशाभूल करणारे ठरू शकते.
  • वृत्तपत्र व पत्रकाराला समाजाचा प्रतिसाद समजेल

टी-20 क्रिकेट विश्वचषक रवी शास्त्री यांना संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय :

  • पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
  • रविवारी याबाबतीत अधिकृतरीत्या जाहीर करताना बीसीसीआयने शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवताना संजय बांगर, भरत अरुण आणि श्रीधर या सहाय्यक प्रशिक्षकांच्या कार्यकाळामध्येही टी-20 विश्वचषकपर्यंत वाढ केली आहे.
  • सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या वतीने हा निर्णय घण्यात आला.

दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय :

  • फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे.
  • उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन 13 देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या ‘इन्फोसिस’च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे.
  • आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
  • नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला 52 लाख डॉलरची मदत केली आहे.
  • त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.
  • त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.

जे. मंजुळा यांची डीआरडीओच्या महासंचालकपदी नियुक्ती

  • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे स्वीकारली.
  • मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
  • या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील ‘डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे.
  • मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
  • हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात 26 वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे.
  • यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
  • मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व 2011 मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.

दिनविशेष :

  • हिंदी दिवस
  • 1917 : रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
  • 1960 : ओपेकची स्थापना.
  • 1999 : किरिबाटी, नौरू व टोंगाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago