Current Affairs of 1 January 2016 For MPSC Exams

चालू घडामोडी (1 जानेवारी 2016)

आयटी पार्कला तीन ‘एफएसआय’ :

  • माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगातील खासगी आणि सार्वजनिक आयटी पार्कला आता तीन चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • आयटी पार्कमधील आयटीशी संबंधित उद्योगांचाही विस्तार करण्याची मुभा देण्यात आली आहे.
  • परिणामी, पुण्यासह राज्यातील आयटी उद्योग दुपटीने वाढेल, असा राज्याच्या उद्योग खात्याचा अंदाज आहे.
  • रोजगारनिर्मिती करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून आयटी उद्योगाला सवलती दिल्या जात आहेत.

‘नमों’च्या जंबो जेटचा तीस देशांना वळसा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षभरात तीसपेक्षाही अधिक देशांना भेटी देऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • या वर्षीच्या अखेरच्या टप्प्यामध्ये त्यांनी अचानक पाकिस्तानच्या लाहोरमध्ये थांबा घेत दक्षिण आशियातील राजकारणाला वेगळीच कलाटणी दिली होती. विरोधकांनी मोदींच्या परदेश दौऱ्यावर कितीही टीका करो, त्यांच्या या दौऱ्यामधून फार मोठे संचित देशाच्या हाती लागले आहे.
  • मोदींनी आतापर्यंत विविध देशांना भेटी देऊन 120 करार केले आहेत, यामध्ये प्रामुख्याने संरक्षण आणि अणुऊर्जा क्षेत्राचा समावेश होतो.

स्पीच बेस्ड आयओटी‘तंत्रज्ञान ‘सी-डॅक‘तर्फे विकसित :

  • तुम्हाला पाहिजे असणाऱ्या एखाद्या विषयाची माहिती संगणक किंवा स्मार्टफोनमार्फत चक्क भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये ऐकता येणार आहे.
  • यापूर्वी इंटरनेटची जोडणी असणाऱ्या संगणक किंवा मोबाईलसमोर बोलल्यानंतर ती माहिती ‘सर्च इंजिन‘ मध्ये टाइप होऊन त्याची माहिती इंग्रजीमध्ये ‘स्क्रीन‘वर पाहता येत होती.
  • मात्र, आता तुम्ही बोललेली माहिती टाइप होऊन उत्तर स्वरूपात ती माहिती पाहण्यासोबतच ऐकता येईल.
  • त्यामुळे तुम्ही ‘मला नागपूरला जायचे आहे‘ एवढे बोलले की नागपूरपर्यंत पोचण्याची सर्व माहिती पाहण्यासोबतच ऐकता येईल.
  • प्रगत संगणन विकास केंद्रामार्फत (सी-डॅक) विकसित होणाऱ्या ‘स्पीच बेस्ड आयओटी‘ तंत्रज्ञानातून ही किमया साधता येईल. या सुविधेचा फायदा ‘स्मार्ट सिटी‘सोबत ग्रामीण भागात प्रभावीरीत्या करता येईल.
  • केंद्र सरकारच्या ‘नॅशनल सुपरकॉम्प्युटिंग मिशन‘अंतर्गत (एनएसएम) ‘स्पीच बेस्ड आयओटी‘ (भाषणावर/बोलण्यावर आधारित) प्रणाली विकसित होत आहे.

‘आयएसओ’ अंगणवाड्यांमध्ये राज्यात औरंगाबाद अव्वल :

  • देशातील पहिली आयएसओ अंगणवाडी औरंगाबादेतील अब्दीमंडी येथील आहे. यात भर घालत लोकसहभागातून जिल्ह्यात अनेक अंगणवाड्यांचे चित्र पालटले आहे.
  • जिल्ह्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत 3 हजार 178 अंगणवाड्या आहेत. यातील 478 मिनी अंगणवाड्या आहेत. दोन हजार 50 अंगणवाड्यांना स्वतःच्या इमारती आहेत. यातील तब्बल 835 अंगणवाड्यांना “आयएसओ‘ प्रमाणपत्र मिळालेले आहे.

50 हजारांवरील व्यवहारांना पॅनकार्ड बंधनकारक :

  • आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे.
  • प्रधानमंत्री जन धन योजनेचा अपवाद वगळता बॅंक खात्यांसाठी पॅनकार्ड यापूर्वीच बंधनकारक केले आहे.
  • आता नववर्षापासून 50 हजारांवरील सर्व रोख व्यवहारांना पॅनकार्ड द्यावे लागणार आहे.
  • दोन लाखांवरील अधिक रकमेच्या व्यवहारांना, तसेच स्थावर मालमत्तेतील दहा लाखांहून अधिक रकमेच्या व्यवहारांनाही पॅनकार्ड द्यावे लागणार आहे.

पाक गायक यांना भारतीय नागरिक :

  • पाकिस्तानी गायक सामी अदनान यांच्यासाठी नवीन वर्ष विशेष असणार आहे.
  • त्यांनी भारतीय नागरिकत्वासाठी केलेला अर्ज केंद्रीय गृहमंत्रालयाने मान्य केला असून, सामी हे भारताचे नागरिक असतील.
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने 1 जानेवारी 2016 पासून अदनान हे भारताचे नागरिक असतील असे स्पष्ट केले आहे.

10 हजार कॉलेजांत होणार ‘कौशल्य विकास’ :

    • ‘स्किल इंडिया’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या देशभरातील 10 हजार महाविद्यालयांना यात सहभागी करून घेण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे.
    • त्यानुसार स्थानिक बेरोजगार तरुणांसाठी सुयोग्य असे रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेशी (एआयसीटीई) संलग्न 10 हजार महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.
    • सुवर्णपदक पटकावले :

  • बजरंग पुनिया आणि रितू फोगट या भारताच्या अव्वल कुस्तीपटूंनी राष्ट्रीय सिनिअर कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखताना आपापल्या गटात अपेक्षित सुवर्णपदक पटकावले.

स्मार्ट सिटी विकासासाठी ब्लूमबर्गशी करारास मान्यता :

  • स्मार्ट सिटीचा विकास करण्यासाठी नागरी विकास मंत्रालय व ब्लूमबर्ग यांच्यातील समझोता करारास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
  • केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यात न्यूयॉर्कमधील ब्लूमबर्ग संस्थेशी करारावर शिक्कामोर्तब झाले.

 

दिनविशेष :

  • ख्रिस्ती वर्षारंभ दिन.
  • 1862 : इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
  • 1894 : सत्येंद्रनाथ बोस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांच्या जन्मदिन.
  • 1919 : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमंलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
  • 1932 : ना. भि. परुळेकर (नारायण भिकाजी परुळेकर) यांनी ‘सकाळ’ हे वृत्तपत्र सुरु केले.

नवीन वर्षाच्या सर्व MPSC World वाचकांना हार्दिक शुभेच्या..

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago