Current Affairs of 1 August 2015 For MPSC Exams

 चालू घडामोडी (1 ऑगस्ट 2015)

मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा :

  • मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या धर्तीवर आता मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग बांधण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • तब्बल 30 हजार कोटी रुपयांत उभारला जाणारा हा महामार्ग 2019 पर्यंत बांधला जाणार असून, या महामार्गावर ऑप्टिक फायबरचे जाळे असेल.
  • घोटी, औरंगाबाद, अमरावती या मार्गांवरून पुढे जाणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला “कम्युनिकेशन सुपर एक्‍स्प्रेस हायवे” संबोधले जाणार आहे.
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
  • प्रकल्प माहिती :

  • मुंबई ते नागपूर सहापदरी द्रुतगती मार्ग
  • अंतर दहा तासांत पार होणार
  • मागास भागातून जाणाऱ्या या रस्त्यावर आयटी पार्क, स्मार्ट सिटी, शैक्षणिक संकुले

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 जुलै 2015)

आता फेसबुक करणार इंटरनेटचा प्रसार :

  • जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग साइट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक आता इंटरनेटचा प्रसार करणार असून, यासाठी प्रथमच सौरऊर्जेवर उड्डाण करणाऱ्या ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे.
  • यामुळे इंटरनेट कनेक्‍शनपासून दूर असणाऱ्या विकसनशील देशातील दुर्गम भागात लेसरच्या माध्यमातून वायरलेस इंटरनेट उपलब्ध होऊ शकेल.
  • फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी आज या ड्रोनच्या निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा केली.
  • “इंटरनेट डॉट ओरजी”च्या सहकार्याने फेसबुकने हा प्रकल्प राबविला आहे.
  • “ऍक्विला” असे या ड्रोनचे नाव असून, त्याच्या पंखांचा विस्तार “बोइंग-737” विमानाएवढा असेल.
  • पण त्याचे वजन मात्र एका कारपेक्षाही कमी असून हे ड्रोन तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ हवेत तरंगू शकेल असे म्हटले आहे.

क्षयरोगग्रस्त देशांच्या क्रमवारीमध्ये भारत चौदाच्या स्थानी :

  • जागतिक पातळीवर 22 क्षयरोगग्रस्त (टीबी) देशांच्या क्रमवारीमध्ये भारत चौदाच्या स्थानी आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील क्षयरोगग्रस्त रुग्णांची संख्या 26 लाख एवढी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी लोकसभेत बोलताना दिली.
  • तसेच “एमडी-आर” क्षयरोग झालेल्यांची संख्या केवळ 61 हजार एवढीच असून, त्यांना बहुविध प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांचा पुरवठा केला जात आहे.

नेस्ले इंडिया ‘मॅगी’चे पुन्हा परीक्षण करण्यास तयार :

  • नेस्ले इंडियाने स्वतंत्र प्रयोगशाळेत ‘मॅगी’चे पुन्हा तज्ज्ञ शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत परीक्षण करण्यास तयार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे.
  • भारतीय अन्न सुरक्षा मानदंड प्राधिकरणाने (फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऍथॉरिटी ऑफ इंडिया) ‘मॅगी’च्या 9 विविध प्रकारच्या नूडल्सवर बंदी घातली होती.

ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची पुस्तके काही महिन्यांत प्रकाशित :

  • माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची अनेक पुस्तके प्रकाशनाच्या रांगेत असून, ती येत्या काही महिन्यांत प्रकाशित होत आहेत.

  • ‘इग्नायटेड माइंड्स’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा त्यात समावेश आहे.
  • पफिन बुक्स ‘इग्नायडेड माइंडसचा’ दुसरा भाग ‘माय इंडिया-आयडियाज फॉर द फ्युचर’ या नावाने प्रसिद्ध करणार आहे.
  • कलाम यांच्या राष्ट्रपतिपदाच्या कारकीर्दीनंतरच्या भाषणांचा त्यात समावेश आहे.
  • त्यात सात भाग असून मुलांसाठी, प्रौढांसाठी असे वर्गीकरण केले आहे.
  • तसेच आयआयएम शिलाँग येथे त्यांचे जे भाषण होणार होते त्यावर ‘क्रिएटिंग अ लिव्हेबल प्लॅनेट’ अर्थ हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.

नासाने परग्रहावरील मानवासाठी अंतराळात मेसेज पाठविले :

  • नासाने परग्रहावरील मानवासाठी म्हणजेच एलियन्ससाठी अंतराळात मेसेज पाठविले असून, त्यात साउंड क्लाऊडवर पाठविलेल्या ऑडिओमध्ये मराठी व हिंदी संदेश पाठविण्यात आले आहे.
  • नासाने 1977 साली प्रक्षेपित केलेल्या एका यानात साउंड क्लाऊडवर पृथ्वीवरील अनेक आवाज पाठविले आहेत.
  • त्यात हिंदी, मराठीसह अनेक भाषांतील स्वागतपर शब्द आहेत. तसेच पृथ्वीवरील विविध आवाजांत पावसाची झिम्मड, आई व मुलाचे बोलणे, विविध पक्ष्यांचा चिवचिवाट, हृदयाची धडधड यांचा समावेश आहे.
  • एखाद्या ग्रहावर खरेच एलियन्स असतील तर ते या आवाजाला प्रतिसाद देतील, काही आवाज त्यांच्या ओळखीचे असतील. साउंड क्लाऊडवर पाठविलेले संदेश 55 भाषांत असून, प्रत्येक भाषेतील अभिवादन या तंत्रासाठी निवडण्यात आले आहे.
  • तसेच भारतीय भाषांत मराठी, हिंदीखेरीज बंगाली भाषेचाही समावेश आहे.

रविचंद्रन अश्विनला अर्जुन पुरस्कार प्रदान :

  • भारताचा आघाडीचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनचा केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अर्जुन पुरस्कार प्रदान करुन गौरव केला.
  • अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर 29 ऑगस्ट 2014 रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी अश्विन इंग्लंड दौऱ्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करीत असल्याने अनुपस्थित होता.

दिनविशेष :

  • सैन्य दिन – अँगोला, चीन, लेबेनॉन.

  • मुक्ती दिन – त्रिनिदाद व टोबेगो, बार्बेडोस.
  • राष्ट्र दिन – बेनिन, स्वित्झर्लंड.
  • मातृ-पितृ दिन – कॉँगो.
  • उत्सव दिन – निकाराग्वा.
  • 1920लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी
  • 1960बेनिनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

 

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago