कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

 • भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.
 • प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.
 • बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.
 • अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

2. सर वॉरन हेस्टिंग (सन 1772 ते 1773) :-

 • सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.

  भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले.

3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

 • लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

 • लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.
 • तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.
 • सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

 • मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.
 • जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

6. लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-

 • लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.
 • भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.
You might also like
1 Comment
 1. santosh nalband says

  please …. please…… please….. upload the information of begining of modern indian history
  1 ) decline of mughal empire
  2) treaty of allhabad
  3) plassy and buxar
  4) subsidiary alliances
  5) all of the governers and his work
  plz………… sir

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World