आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती

आहारशास्त्राविषयी संपूर्ण माहिती

 समतोल आहार :

 • शरीरांची कार्यक्षमता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात आणि परिमाणात वेगवेगळ्या अन्नपदार्थ्यांचा समावेश की ज्यातून स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे मिळतील असा आहार म्हणजे ‘समतोल आहार’ होय.

 अन्नातील पोषक तत्वे/घटक :

 1. स्थूल पोषक तत्वे शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)
 2. सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.

 अन्नपदार्थांचे वर्गीकरण :

 1. प्राणीज (प्राण्यांपासून मिळणारे – अंडी, मांस, दुध)
 2. वनस्पती (वनस्पतीपासून मिळणारे धान्य, फळे, भाज्या)

रासायनिक रचनेवरून –

 1. प्रथिने
 2. मेद पदार्थ
 3. कर्बोदके
 4. क्षार
 5. जीवनसत्वे

प्रमुख कार्यावरून –

 1. उर्जा / शक्तीचा पुरवठा करणारे अन्न
 2. शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक अन्न
 3. संरक्षण.

अन्नपोषक मुल्यांवरून –

 1. एकदल धान्य
 2. व्दिदल धान्य
 3. हिरव्या पालेभाज्या
 4. फळे
 5. तेल/मेद
 6. साखर गूळ
 7. मसाले व तिखट
 8. तेलबिया
 9. इतर

 प्रथिने (प्रोटीन्स) :

 • प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.
 • शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.
 • त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.
 • (लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)
 • अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

 प्रथिनांची कार्ये :

 • शरीराची वाढ आणि विकास करणे.
 • ऊतींच्या डागडुजीसाठी / दुरुस्तीसाठी.
 • प्रतिपिंडे (अॅंटीबॉडीज), विकरे (एन्झाइम्स), संप्रेरके (हामोन्स) यांच्या निर्मितीमध्ये.
 • रक्तनिर्मितीमध्ये.
 • कधी-कधी प्रथिनांपासून उर्जादेखील मिळते.

 प्रथिनांची साधने :

 • प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.
 • वनस्पतीज साधने –
 1. डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन  
                  
 2. धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.
 3. तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.
 • डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.
 • सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)
 • दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%
 • अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%
 • मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%
 • मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%
 • प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.