7 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2022)
जन्मगावात लता मंगेशकर यांचा स्वरठेवा जतन :
मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या लता दीनानाथ मंगेशकर ग्रामोफोन रेकॉर्ड संग्रहालयात लता मंगेशकर यांनी गायलेल्या गीतांच्या 7,600 ग्रामोफोन ध्वनिमुद्रिका (रेकॉर्ड ) आहेत.
इंदूर येथेच 28 सप्टेंबर 1929 रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला होता.
सुमन चौरसिया यांनी 2008 मध्ये पिग्दाम्बर परिसरात 1600 चौरस फूट जागेत हे संग्रहालय उभारले असून तेथे हा अमूल्य ठेवा जतन केला आहे.
लता मंगेशकर 32हून अधिक भारतीय आणि परकीय भाषा- बोलींत गायल्या आहेत. त्यातील अनेक दुर्मीळ गाणी या संग्रहात आहेत.
त्याशिवाय लता मंगेशकर यांची छायाचित्रे, त्यांच्याशी संबंधित पुस्तके यांचाही ठेवा येथे आहे.
टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धात बोपण्णा-रामनाथन जोडीला जेतेपद :
रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी ल्युक सेव्हिल आणि जॉन-पॅट्रिक स्मिथ या अग्रमानांकित ऑस्ट्रेलियन जोडीवर मात केली.
बोपण्णाच्या कारकीर्दीतील हे एकूण 21वे, तर रामनाथनचे दुसरे एटीपी दुहेरी जेतेपद ठरले.
तसेच एकत्रित खेळताना हे त्यांचे दुसरे एटीपी जेतेपद आहे.
त्यांनी जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेपूर्वी झालेली अॅडलेड आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती.
भारत-वेस्ट इंडिज हजाराव्या सामन्यात भारत विजयी :
यजुर्वेद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीमुळे 1000व्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला सहा गडी आणि 132 चेंडू राखून धूळ चारली.
तर या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
विंडीजने दिलेले 177 धावांचे लक्ष्य भारताने कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि पदार्पणवीर दीपक हुडा यांच्या योगदानामुळे 28 षटकांत गाठले.
विराट कोहलीने रचला इतिहास :
भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात केवळ चार चेंडू खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
पण त्याआधीच त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
तर हा विक्रम करणारा विराट कोहली आता जगातील पहिला फलंदाज बनला आहे, ज्याने भारतातच 5000 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
तसेच विराट कोहलीने 96 व्या डावात हा पराक्रम केला, तर याआधी हा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर होता.
दिनविशेष:
आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँन्ड्रयूज यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1873 रोजी झाला होता.
बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट सन 1920 मध्ये पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
सन 1974 मध्ये ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना सन 2003 या वर्षी श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.